Video | लसीने भरलेले इंजेक्शन पाहून महिलेला फुटला घाम, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 01, 2021 | 7:54 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. सध्याच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तर अनेक व्हिडीओ चर्चेचा विषय़ ठरत आहेत. लस घेतानाचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले जात आहेत. यातील काही व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना चांगलेच हसू फुटले आहे. सध्या तर एक अगदीच मजेदार व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये एक महिला लस घेताना दिसतेय. लस […]

Video | लसीने भरलेले इंजेक्शन पाहून महिलेला फुटला घाम, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच
WOMEN CORONA VACCINATION VIRAL VIDEO
Follow us

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. सध्याच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तर अनेक व्हिडीओ चर्चेचा विषय़ ठरत आहेत. लस घेतानाचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले जात आहेत. यातील काही व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना चांगलेच हसू फुटले आहे. सध्या तर एक अगदीच मजेदार व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये एक महिला लस घेताना दिसतेय. लस घेताना या महिलेची उडालेली धांदल या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आली आहे. (Women reaction while taking Corona vaccine jab went viral on social media)

समोर इंजेक्शन पाहून महिला चांगलीच घाबरली

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेला कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. लस घेताना समोर इंजेक्शन पाहून ही महिला चांगलीच घाबरली आहे. विशेष म्हणजे महिला लसीला घाबरत असल्यामुळे तिला सांभाळण्यासाठी तिच्या भोवती नर्सेसने गर्दी केली आहे. नर्सेस या महिलेला समजाऊन सांगत आहेत. तर काही नर्सेसने या महिलेला गच्च धरले आहे.

योग्य संधी साधत नर्सने महिलेला इंजेक्शन

एवढं सारं करुनही व्हिडीओतील महिला कोणालाही ऐकायला तयार नाही. ती समोर इंजेक्शन पाहून चांगलीच घाबरली आहे. मात्र, शेवटी आणखी एका नर्सने घाबरत असलेल्या महिलेचा हात धरला आहे. तसेच योग्य संधी साधत दुसऱ्या नर्सने या महिलेला इंजेक्शन दिले आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, इंजेक्शन देऊन झाल्यानंतर घाबरलेल्या महिलेने सुटकेचा निश्वास टाकला आहे. लस घेतल्यानंतर ही महिला हसताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, त्याबबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला आयपीएस ऑफिसर रुपीन शर्मा यांनी ट्विट केले असून त्यांनी मजेदार कॅप्शनसुद्धा दिले आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video | नवरीने प्रेमाने रसगुल्ला खायला दिला, पण नवरदेवाने भलतंच काहीतरी केलं, व्हिडीओ व्हायरल

Video | वय झालं तरी तारुण्य संपलं नाही, आजोबांचा नातीसोबत जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

तिचा UPSC चा निकाल लागला, पेपरात फोटो आला पण पावसात बॉयफ्रेंडसोबत फिरतानाचा, पुढं त्या मुलीचं-मुलाचं नेमकं काय झालं?

(Women reaction while taking Corona vaccine jab went viral on social media)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI