चंद्रग्रहणात बाळाला जन्म देणार नाही; सरकारी रुग्णालयात महिलांची मागणी, डॉक्टर हैराण
एका सरकारी रुग्णालयात चंद्रग्रहणाच्या वेळी प्रसूतीच्यावेदनांनी त्रस्त असलेल्या गर्भवती महिलांनी प्रसूती करण्यास नकार दिला. यामुळे आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका निर्माण झाला. अखेरीस, डॉक्टरांनी परिस्थिती हाताळली आणि महिलांची प्रसूती केली.

७ सप्टेंबर रोजी 2025 या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होते. हे चंद्रग्रहण अनेकांनी पाहिले. मात्र एका जिल्हात चकीत करणाऱ्या गोष्टी घडल्या. येथील सरकारी रुग्णालयात काही महिलांना प्रसूतीसाठी आणणत्यात आले होते. प्रचंड वेदना होत असताना देखील महिलांनी चंद्र ग्रहणात बाळाला जन्म देणार नाही असे डॉक्टरांना सांगितले होते. त्यामुळे महिला आणि तिचे बाळ यांच्या जीवाला धोकाला निर्माण झाला होता. डॉक्टरांनी कसेबसे या महिलांना समजावले.
एकीकडे प्रसूतीच्या वेदनांनी कळवळणाऱ्या महिलांच्या प्रसूतीसाठी तयार करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी धावपळ करत होते. तर दुसरीकडे, महिला चंद्रग्रहण संपेपर्यंत थांबण्याची विनवणी करत होत्या. डॉक्टरांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की, जर वेदना सुरू झाल्यावर तात्काळ प्रसूती केली नाही तर आई आणि बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो. ही घटना कर्नाटकमधील बेल्लारी जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील आहे.
वाचा: चंद्र ग्रहणामुळे कोणत्या राशींचा होणार फायदा? कोणत्या राशींवर येणार संकट?
चंद्रग्रहणादरम्यान प्रसूतीस नकार
रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रग्रहणाच्या वेळी रुग्णालयात अनेक गर्भवती महिलांनी बाळाला जन्म देण्यास नकार दिला होता. प्रसूती वेदना तीव्र असूनही त्यांनी ऑपरेशन रूममध्ये जाण्यास नकार दिला. त्यांनी अशी मागणी केली की, दुसऱ्या दिवशी चंद्रग्रहण संपेपर्यंत त्यांची प्रसूती पुढे ढकलावी.
बाळाला जन्म देण्यास नकार
वैद्यकीय सल्ल्याकडे दुर्लक्ष करत गर्भवती महिलांनी बाळाला जन्म देण्यास नकार दिला. या महिलांचे म्हणणे होते की चंद्रग्रहणाच्या वेळी बाळाला जन्म दिल्यास नवजात आणि आई दोघांनाही धोका होऊ शकतो. नंतर गर्भवती महिलांमधील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागली, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला आपत्कालीन उपाययोजना कराव्या लागल्या. एक वरिष्ठ डॉक्टर वॉर्डमध्ये पोहोचले आणि त्यांनी महिलांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना धोक्याविषयी सांगितले. त्यानंतर रुग्णालयात महिलांना प्रसूतीसाठी तयार करण्यात आले.
