UPI Transactions : आता उधारवाले खिसको नाही, ग्राहकांची बल्ले बल्ले! आता युपीआयमार्फत करता येईल हे पण काम

UPI Transactions : युपीआयने भारतातच नाही तर जगात ही डंका वाजवला आहे. डिजिटल पेमेंटच्या युगात युपीआय सध्या लोकप्रिय ठरले आहे. युपीआय सेवांचा आवाका वाढत आहे. आता ही सेवा पण त्यात जोडण्यात आली आहे.

UPI Transactions : आता उधारवाले खिसको नाही, ग्राहकांची बल्ले बल्ले! आता युपीआयमार्फत करता येईल हे पण काम
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 10:15 AM

नवी दिल्ली : युपीआयने भारतातच नाही तर जगात ही डंका वाजवला आहे. डिजिटल पेमेंटच्या युगात युपीआय सध्या लोकप्रिय ठरले आहे. युपीआय सेवांचा आवाका वाढत आहे. ग्राहकांना अधिकाधिक सेवा देता याव्यात यासाठी भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) पेमेंट करणाऱ्या ॲग्रीगेटर्संना याविषयीची सूचना दिल्या आहेत. UPI म्हणजे युनिफाईट पेमेंट्स इंटरफेस एक जलद पेमेंट सेवा आहे. ही सेवा मोबाईल क्रमाकांच्या माध्यमातून काही सेकंदातच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पेमेंट ट्रान्सफर करते. NPCI ने ही पेमेंट पद्धत विकसीत केली आहे. व्हर्चुअल पेमेंट ॲड्रेस (VPA) या माध्यमातून बँक खात्याचा तपशील देण्याची गरज नसते. त्यामुळे ही पद्धत सुरक्षित मानण्यात येते.

काय आहे सुविधा

नियोजनबद्ध पद्धतीने व्यवहार करण्यासाठी युपीआयच्या मार्फत काही सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यात आणखी एक सेवा जोडण्यात आली आहे. वापरकर्त्यांना युपीआय पेमेंट करण्यासाठी अधिक पर्याय देण्यात येत आहे. ऑनलाईन व्यवहारासाठी अनेक ग्राहक क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर करतात. त्यांच्यासाठी ही नवीन सेवा सुरु करण्यात आली आहे. काही दिवसांच्या उधारीवर खरेदी करणाऱ्या लोकांसाठी ही सेवा फायदेशीर ठरेल. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ते युपीआय व्यवहार करु शकतील. हा पर्याय विविध युपीआय पेमेंट ॲपवर मिळेल.

हे सुद्धा वाचा

क्रेडिट कार्डचा लाभ

नवीन निर्णयानुसार, आरबीआयनुसार, रुपे क्रेडिट कार्डची सुविधा युपीआयच्यामार्फत देण्यात येते. एका अहवालानुसार, BharatPe, Cashfree Payments, Google Pay, Razorpay, Paytm, PayU आणि Pine Labs या ॲपवर क्रेडिट कार्डचा उपयोग करुन पेमेंट करता येईल. त्यासाठीची परवानगी देण्यावर सहमती देण्यात आली आहे. क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड लाभ घेण्यासाठी त्याचा उपयोग होईल.

व्यवहाराची सुविधा

आतापर्यंत ग्राहकांना केवळ बँक खाते, ओव्हरड्राफ्ट खाते आणि प्रीपेड खात्याचा वापर करुन व्यवहार करण्याची परवानगी देण्यात आली होती. आता RuPay क्रेडिट कार्ड UPI शी जोडल्यानंतर त्यांना पेमेंट करण्याची सुविधा मिळाली आहे. त्यामुळे त्यांना क्रेडिट कार्ड जवळ बाळगण्याची गरज उरली नाही.युपीआय पेमेंटच्या माध्यमातून कोणत्याही बँकेच विवरण न भरता, तपशील न भरता, त्वरीत रक्कम हस्तांतरीत करण्याची परवानगी मिळते. भारतात ही सुविधा अत्यंत लोकप्रिय झाली आहे. दर महिन्याला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून 8 दशलक्षाहून अधिक व्यवहार करण्यात येतात.

युपीआय हे एक रिअल टाईम पेमेंट सिस्टम आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून बँक खात्यातून झटपट रक्कम हस्तांतरीत करण्यासाठी तिचा वापर होतो. युपीआयच्या माध्यमातून तुम्ही बँक खात्याला युपीआयशी जोडू शकता. तसेच अनेक बँक खातेही युपीआय ॲपच्या माध्यमातून वापरु शकता. डिसेंबर महिन्याच्या युपीआय व्यवहारांनी विक्रम नोंदवला आहे. युपीआय व्यवहारांनी एकट्या डिसेंबर महिन्यात 12.82 लाख कोटी रुपये मूल्यांचे 782.9 कोटी डिजिटल पेमेंट ट्रान्झाक्शनचा नवीन रेकॉर्ड केला आहे.

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.