Aadhar Card | फसवणुकीपासून वाचायचे असेल, तर आधार करा लॉक, हे आहेत फायदे

Aadhar Card | फसवणुकीपासून वाचायचे असेल, तर आधार करा लॉक, हे आहेत फायदे
आधार कार्ड
Image Credit source: टीव्ही9

आधार लॉक करण्याचा मुख्य उद्देश नागरिकांच्या बायोमेट्रिक्स डेटाच्या गोपनीयतेची देखभाल आणि संरक्षण प्रदान करणे हा आहे. तुम्हाला तुमचा आधार लॉक करायचा असेल तर तुम्ही आधारच्या संकेतस्थळावर किंवा एमएआधार मोबाईल अॅपवरून लॉक किंवा अनलॉक करू शकता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 31, 2022 | 12:59 PM

मुंबई : आपल्या देशात आधार कार्डचं (Aadhar Card) महत्त्व अधोरेखित झाले आहे. आधार कार्डवरुन रणकंदन माजले होते. फार सर्वोच्च न्यायालयात झगडा झाला होता. त्यामुळे इतर सर्व आवश्यक कागदपत्रांपेक्षा आधार कार्ड अधिक महत्त्वाचे बनले आहे. आधारशिवाय आपल्या अनेक आवश्यक कामांना मुहूर्त लागत नाही. इतकंच नाही तर आधारशिवाय आपल्याला कोणत्याही सरकारी योजनांचा (Government Policies) लाभही मिळू शकत नाही. केवळ प्रौढांसाठीच नव्हे तर लहान मुलांसाठीही हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज बनला आहे. हे आधारचे महत्त्व ठसवणारेच आहे, साधारणपणे आधार कार्डद्वारे कोणत्याही प्रकारची फसवणूक करणे खूप कठीण असते, परंतु जर तुम्हाला तुमच्या आधारशी संबंधित कोणत्याही प्रकारची जोखीम दिसली तर तुम्ही भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (UIDAI) अत्यंत खास वैशिष्ट्याचा वापर करून तुमच्या आधारला जबरदस्त सुरक्षा देऊ शकता. होय, आपण आपले आधार कार्ड लॉक किंवा अनलॉक देखील करू शकता.जर तुम्ही तुमचा आधार लॉक केले तर तुमच्या आधारचा कुणीही गैरवापर करू शकत नाही.

आधार लॉक करण्याचा मुख्य उद्देश नागरिकांच्या बायोमेट्रिक्स डेटाच्या गोपनीयतेची देखभाल आणि संरक्षण प्रदान करणे हा आहे. जर तुम्हाला तुमचा आधार लॉक करायचा असेल तर तुम्ही आधारच्या संकेतस्थळावर किंवा एमएआधार मोबाईल अॅपवरून लॉक किंवा अनलॉक करू शकता. तर संकेतस्थळावरुन आधार लॉक करण्याच्या प्रक्रियेबद्दल आपण जाणून घेऊयात.

आधार लॉक करण्याचे फायदे

यूआयडीएआयच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, सर्व आधार कार्डधारक सुरक्षेच्या दृष्टीने गरजेनुसार आपले आधार कार्ड लॉक किंवा अनलॉक करू शकतात. वास्तविक, 12 अंकी आधार क्रमांकाच्या आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक्स माहितीची नोंद असते.

आपला मोबाइल नंबर कसा अपडेट करावा

आधारमध्ये मोबाइल नंबर अपडेटसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या जवळच्या नावनोंदणी केंद्रात जावं लागतं. आपले जवळचे केंद्र शोधण्यासाठी – https://uidai.gov.in वर क्लिक करा. या सेवेसाठी 30 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

आधार लॉक कसे करावे

  1. आधार लॉक करण्यासाठी सर्वात आधी UIDAI च्या वेबसाईटवर जा.
  2. UIDAI ची वेबसाइट उघडल्यानंतर लॉक/अनलॉक बायोमेट्रिक्सवर क्लिक करा.
  3. लॉक/अनलॉक बायोमेट्रिक्सवर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल, जिथे लॉक/अनलॉक बायोमेट्रिक्सवर क्लिक करावं लागेल.
  4. आता तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून ओटीपी मागवायचा आहे.
  5. ओटीपी आल्यानंतर ओटीपी टाकून सबमिट करा.
  6. आता एक नवीन पेज ओपन होईल जिथे तुम्हाला इनेबल लॉकिंग फीचरवर क्लिक करावे लागेल. आता तुमचा आधार लॉक झाला आहे.

संबंधित बातम्या :

आधार- पॅन लिंकिंगची मुदत वाढली, एका वर्षाची मुदतवाढ; मात्र मोफत सेवा बंद

नव्या आर्थिक वर्षात होणार मोठे फेरबदल; घरे, औषधांच्या दरामध्ये होणार वाढ; PF चे नियम देखील बदलणार

मुलांचे Aadhaar Card तयार करणे झाले सोपे, ओळखीचा पुरावा म्हणून ‘युआयडीएआय’कडून शाळेच्या आयकार्डला मान्यता

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें