AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात घरात AC लावूनही गरम होतंय? भिंतींना लावा ‘हा’ खास पेंट, घर होईल कूल कूल

घराच्या भिंतींचा रंगच तुमचं घर गरम करत नाही ना? एका छोट्याशा रंगाच्या बदलाने तुम्ही घरात नैसर्गिक थंडावा आणू शकता आणि महागडं वीज बिलही वाचवू शकता. पण कोणता रंग? आणि का? हे जाणून घ्या

उन्हाळ्यात घरात AC लावूनही गरम होतंय? भिंतींना लावा 'हा' खास पेंट, घर होईल कूल कूल
AC Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 02, 2025 | 4:42 PM
Share

उन्हाळ्यात घरात एसी चालू असतानाही तापमान कमी होत नाही, असं अनेकदा जाणवतं का? आणि त्याहूनही मोठी समस्या म्हणजे महिन्याच्या शेवटी येणारं वाढलेलं वीज बिल! पण तुम्हाला माहिती आहे का, की घरातल्या भिंतींवर लावलेला रंगही यामागे एक मोठं कारण ठरू शकतो?

अनेकदा आपण घराची सजावट करताना रंग फक्त सौंदर्याच्या दृष्टीने निवडतो. पण काही रंग घरात उष्णता अडकवतात, तर काही रंग घर नैसर्गिकरित्या थंड ठेवू शकतात. गडद रंग जसे की निळा, काळा, हिरवा हे सूर्यप्रकाश शोषतात, ज्यामुळे भिंती गरम होतात. उलट फिकट रंग उष्णता परावर्तित करतात आणि घर थंड ठेवतात.

आज बाजारात असे काही खास प्रकारचे पेंट्स मिळतात जे ‘थंडावा’ देण्याचं काम करतात. यामध्ये Heat Reflective Paint, Cool Paints, किंवा Solar Reflective Coating यांचा समावेश होतो. हे रंग सूर्यकिरण परत फेकतात आणि भिंती किंवा छप्पर जास्त तापू देत नाहीत. याचा थेट फायदा म्हणजे घराच्या आतचं तापमान कमी राहतं.

जर तुम्हाला खास पेंट्स वापरायचं नसेल, तरी पांढरा, हलका निळा, ऑफ-व्हाईट, पिस्ता अशा रंगांचा पर्याय निवडल्यास उष्णतेपासून काही अंशी बचाव होतो. काही Insulative Paints असेही असतात जे उष्णतेचा थेट भिंतीमधून घरात प्रवेश होऊ देत नाहीत. हे पेंट्स भिंतींना एका थर्मल कवचासारखं संरक्षण देतात.

या पद्धतीमुळे घर नैसर्गिकरित्या थंड राहतं आणि त्यामुळे एसी किंवा कूलरचा वापर कमी करावा लागतो. यामुळे वीजेची बचत होते आणि घरात सतत थंडावा जाणवतो. काही वेळा ही बचत महिन्याला शेकडोंच्या घरात असू शकते.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.