जिद्द, चिकाटी आणि रागीट, कोण आहेत अशनीर ग्रोवर, ज्यांना स्वत:च्याच कंपनीतून निघावं लागलं?

फिनटेक कंपनी 'भारत पे'चे सह संस्थापक (BharatPe) अशनीर ग्रोवर (Ashneer Grover) यांनी सोमवारी कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर (MD) पदाचा राजीनामा दिला आणि ते पुन्हा एकदा चर्चेत आले. अशनीर ग्रोवर हे रियालिटी शो शार्क टॅंक इंडियाच्या माध्यमातून कायमच चर्चेत होते.

जिद्द, चिकाटी आणि रागीट, कोण आहेत अशनीर ग्रोवर, ज्यांना स्वत:च्याच कंपनीतून निघावं लागलं?
अशनीर ग्रोवर
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 12:14 PM

फिनटेक कंपनी ‘भारत पे’चे सह संस्थापक (BharatPe) अशनीर ग्रोवर (Ashneer Grover) यांनी सोमवारी कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदाचा (MD) राजीनामा दिला आणि ते पुन्हा एकदा चर्चेत आले. अशनीर ग्रोवर हे रियालिटी शो शार्क टॅंक इंडियाच्या माध्यमातून कायमच चर्चेत होते. ग्रोवर यांच्या रागीट स्वभावामुळे ते कायमच वादात असायचे. अखेर अशनीर ग्रोवर यांनी एमडीपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान ग्रोवर यांना एमडीपदावरून हटवण्याआधीच त्यांच्या पत्नीला कंपनीच्या नियंत्रण प्रमुखपदावरून काढून टाकण्यात आले होते. ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन यांनी स्किनकेअर उत्पादने, इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि इतर देशांच्या सहलींसाठी कंपनीचा निधी वापरल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. पत्नीने राजीनामा दिल्यानंतर ग्रोवर यांनी देखील आता कंपनीच्या एमडीपदाचा राजीनामा दिला आहे.

पत्नीच्या राजीनाम्यानंतर दबाव

गैरव्यवहार आणि कंपनीतील अनियमितते प्रकरणात पत्नी माधुरी जैन यांना कामावरून काढून टाकल्यानंतर ग्रोवर हे देखील दबावाखाली होते. शेवटी त्यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अशनीर ग्रोवर यांनी आपले शिक्षण आयाआयटी, आयआयएम सारख्या नामंकित संस्थामधून पूर्ण केले आहे. ग्रोवर यांच्या लिक्डइन प्रोफाईनुसार त्यांनी 2000-2004 दरम्यान आयआयटी दिल्लीमधून बी टेकेचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2004-2006 दरम्यान त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून फायनान्समध्ये एमबीए पूर्ण केले.

अनेक कंपन्यात मोठ्या पदावर केले काम

लिक्डइन प्रोफाईनुसार ते कोटक इनव्हेस्टमेंट बँकिंगमध्ये उच्चपदावर कार्यरत होते. त्यांना तीथे तब्बल सात लाख रुपये प्रति महिन्याचे पॅकेज होते. मात्र त्यांनी तिथे केवळ एकच महिना काम केले. त्यानंतर ग्रोवर यांनी अमेरिकन एक्सप्रेसमध्ये अकरा महिने कॉरपोरेट डेव्हलपमेंटचे डायरेक्टर म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी अडीच वर्ष ‘ग्रोफर्स’मध्ये चीफ फायनांशियल ऑफिसर म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी पीसी ज्वेलर्स लिमिटेडमध्ये देखील काम केले आहे.

ग्रोवर यांची एकूण संपत्ती

मीडिया रिपोर्टनुसार ग्रोवर यांची एकूण संपत्ती 90 मिलियन डॉलर इतकी आहे. साऊथ दिल्लीमधील पंचशील पार्क सारख्या पंचतारांकित परिसरात त्यांचे मोठे घर आहे. जवळपास 18 हजार स्केअर फुटामध्ये त्यांचे हे घर असल्याचे बोलले जाते. या घराची किंमत तीस कोटींच्या जवळपास आहे.

संबंधित बातम्या

रशिया-युक्रेन युद्धाचे ढग LIC IPO वर?  लाँचबद्दल नेमकं काय म्हणाल्या अर्थमंत्री

रिटायरमेंटसाठी म्युच्युअल फंड… ‘सही है बॉस’, जाणून घ्या या महत्वपूर्ण गोष्टी…

मारुती सुझुकीच्या वाहन विक्रित घट, टाटा मोटर्सची विक्री 27 टक्क्यांनी वाढली

Non Stop LIVE Update
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.