AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Air India | विमान प्रवाशांसाठी गुड न्यूज! सणासुदीत आरामशीर करा टेक ऑफ, एअर इंडिया देशातंर्गत सेवा वाढवणार , या शहरांसाठी नवीन फ्लाईट्स

Air India | एअर इंडिया सणासुदीच्या काळात फ्लाइट्सची संख्या वाढवणार आहे. आगामी काळात विमानांची संख्या वाढल्याने उड्डाणांची संख्याही वाढवण्यात येणार आहे.

Air India | विमान प्रवाशांसाठी गुड न्यूज! सणासुदीत आरामशीर करा टेक ऑफ, एअर इंडिया देशातंर्गत सेवा वाढवणार , या शहरांसाठी नवीन फ्लाईट्स
सणासुदीत नवीन फ्लाईट्सImage Credit source: सोशल मीडिया
Updated on: Aug 11, 2022 | 6:29 PM
Share

Air India | विमान प्रवाशांसाठी गुड न्यूज आहे. त्यांना आता सणासुदीच्या काळात विमान बुकिंगसाठी (Flight Booking) नाहकची धावपळ उडणार नाही. त्यांना वेटिंग ही करावं लागणार नाही. कारण एअर इंडिया (Air India) पुढील आठवड्यापासून देशांतर्गत उड्डाणांची संख्या वाढवणार आहे. एअरलाइन्स एअर इंडियाने गुरुवारी, 11 ऑगस्ट रोजी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, 20 ऑगस्टपासून एअरलाईन्स देशांतर्गत 24 अतिरिक्त उड्डाणे (Additional Service) घेईल. या फ्लाइट्सच्या मदतीने ते देशातील महत्त्वाच्या शहरांना त्वरीत सेवा देण्याचा प्रयत्न या सणासुदीच्या काळात करण्यात येणार आहे. टाटा समूहाने (Tata Group) एअर इंडियाचा ताबा घेतल्यानंतर उड्डाणांचा हा पहिलाच मोठा विस्तार आहे. एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनात, सणासुदीच्या काळात लोकांना या नवीन फ्लाइट्सचा खूप फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. नवी उड्डाणे दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि अहमदाबाद या शहरांसाठी सुरु करण्यात येणार आहे.

अशी आहे सेवा

एअर इंडियाने याविषयीचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यानुसार, जे 24 अतिरिक्त उड्डाणे घेण्यात येणार आहे. त्यात दोन दिल्ली ते मुंबई, बेंगळुरू आणि अहमदाबाद आणि मुंबई ते चेन्नई आणि हैदराबाद असे असतील. याशिवाय मुंबई-बेंगळुरू आणि अहमदाबाद-पुणे या हवाई मार्गावरही नवीन उड्डाणे सुरू होणार आहेत. एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कॅम्पबेल विल्सन यांनी सेवेविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार विमान सेवेला पुन्हा गती देण्यासाठी सहा महिन्यांपासून भागीदारांसोबत काम सुरु आहे. या प्रयत्नांना आता यश आले आहे. उड्डाणांची संख्या वाढवण्यासाठी विमानांची ही उपलब्धता वाढवण्यात येत आहे. एअरलाइनच्या नॅरोबॉडी फ्लीटमध्ये 70 विमाने आहेत, त्यापैकी 54 सध्या उड्डाणासाठी उपलब्ध आहेत. एअरलाइननुसार, उर्वरित 16 विमाने 2023 च्या सुरूवातीस उड्डाणासाठी वापरली जाऊ शकतात. त्यामुळे आगामी काळात एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये आणखी वाढ होणार आहे.

प्रवाशांना दिलासा

एअरलाइनच्या म्हणण्यानुसार, या अतिरिक्त फ्लाइट्समुळे देशातंर्गत प्रवाशांना सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांना आता प्रवासासाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. या सेवेमुळे रोज दिल्ली आणि मुंबई दरम्यान दोन्ही दिशांना 10-10, दिल्ली आणि बंगळुरू दरम्यान दोन्ही दिशांना 7-7, मुंबई आणि बंगळुरू आणि मुंबई चेन्नई दरम्यान आणि मुंबई हैदराबाद आणि दिल्ली अहमदाबाद दरम्यान दोन्ही दिशांना 4-4 उड्डाणे होतील. दोन्ही दिशांना 3-3 फ्लाइटचे पर्याय असतील. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.

एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?
एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?.
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर.
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा.
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले..
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले...
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा.
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?.
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले.
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार.
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी.