AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Government Scheme : 5 लाखांपर्यंताचे उपचार मोफत, इतर ही अनेक सुविधा, केंद्र सरकारची कोणती आहे ही योजना..

Government Scheme : आता मोठ्या आजारावर 5 लाखांपर्यंताचे उपचार मोफत होऊ शकतात..केंद्र सरकारची ही योजना माहिती आहे का?

Government Scheme : 5 लाखांपर्यंताचे उपचार मोफत, इतर ही अनेक सुविधा, केंद्र सरकारची कोणती आहे ही योजना..
उपचार मिळवा मोफतImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 09, 2022 | 8:12 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) सर्वसामान्यांना मोठ्या आजारांशी (Illness) लढण्यासाठी एक खास योजना आणली आहे. या योजनेतंर्गत (Health Scheme) 5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च सरकार उचलते. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे मोफत उपचाराशिवाय (Treatment) इतर सुविधाही लाभार्थ्यांना देण्यात येतात. ही खास योजना कोणती ते पाहुयात..

राष्ट्रीय आरोग्य संरक्षण ( National Health Protection) या मिशनतंर्गत ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत लाभार्थ्याला 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराचा खर्च सरकार करेल. तसेच इतर सुविधाही मिळतील.

आयुष्यमान भारत योजना (Ayushman Bharat Scheme) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेतंर्गत गरीब कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देण्यात येते. योजनेतंर्गत देशातील लाखो गरीब कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

देशात मोठ्या प्रमाणात नागरीक या योजनेत सहभागी होत आ हे. लाखो अर्ज या योजनेसाठी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला प्राप्त होत आहेत. या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 2018 साली केली होती. उपचाराअभावी होणाऱ्या मृत्यूचा आकडा कमी करणे हा योजनेचा उद्देश आहे.

प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेतंर्गत लाभार्थ्यांना शस्त्रक्रिया, उपचार, औषधींचा खर्च तसेच 1350 मेडिकल पॅकेजची सुविधा देण्यात येते. या माध्यमातून उपचारापोटी करण्याता येणारा खर्च रुग्णालयांना हस्तांतरीत करण्यात येतो.

या योजनेची तांत्रिक बाजू मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच लाभार्थ्यांना विना कागदपत्र, विना रोख रक्कम या सुविधेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांची आरोग्य हिस्ट्री आणि वैयक्तिक तपशील जतन करण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सार्वजनिक आरोग्य केंद्रावर चौकशी करावी लागेल. तिथे अर्ज भरुन आवश्यक ती कागदपत्रे जमा करुन या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला आधार कार्ड, राशन कार्ड, मोबाईल क्रमांक, रहिवाशी प्रमाणपत्र द्यावे लागेल. या कागदपत्राशिवाय अर्जाची नोंदणी होणार नाही. त्यामुळे आवश्यक ती कागदपत्रे घेऊनच अर्ज भरावा लागेल.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.