Bank : तुमच्या मोबाईलमध्येच लपलाय चोर, वेळीच करा हा उपाय नाहीतर बँक खाते होईल साफ..

Bank : तुमच्या मोबाईलमध्येच चोर लपलाय आहे, तेव्हा वेळीच सावध व्हा..

Bank : तुमच्या मोबाईलमध्येच लपलाय चोर, वेळीच करा हा उपाय नाहीतर बँक खाते होईल साफ..
मोबाईलमध्ये दडलाय चोरImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 30, 2022 | 8:41 PM

नवी दिल्ली : स्मार्टफोन्सचा (Smartphone) जसा फायदा आहे, तसेच तोटेही आहेत. पण तुम्ही त्याचा वापर कसा करता यावर हे सर्व अवलंबून आहे. सायबर सिक्युरिटीच्या (Cyber Security) दृष्टीने काही काळजी घेणे आवश्यक आहे. काळजी घेतली नाही तर तुमचे बँक खातेही (Bank Account) साफ होऊ शकते. नेमका काय आहे हा प्रकार समजून घेऊयात..

स्मार्टफोनमध्ये अॅप्स डाऊनलोड (Apps Download) करताना अथवा ई-मेलवर (E-mail) आलेली एखादी लिंक डाऊनलोड करताना, त्याची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय ते डाऊनलोड करु नका. अनेक अॅप्स तुमचा डाटा चोरतात, तुमची खासगी माहिती, बँक तपशीलवर त्यांचा डोळा असतो. तेव्हा सावध व्हा..

Google ने Play Store मधून अशी काही अॅप्स हटवली होती. कारण ही अॅप्स युझर्सच्या परवानगी विना त्यांचा डाटा चोरत होती. Meta (Facebook) ने दावा केला आहे. त्यानुसार, 10 लाख युझर्संनी मोबाईलमध्ये चोर लपवला आहे.

हे सुद्धा वाचा

Meta (Facebook) च्या दाव्यानुसार, 10 लाख युझर्संनी स्मार्टफोनमध्ये अशी अॅप्स डाऊनलोड केली आहेत. जी त्यांचा डाटा चोरत आहेत. त्यांचा वैयक्तिक तपशील चोरत आहेत. त्याचा गैरवापर करत आहेत.

वापरकर्त्यांचा वैयक्तिक तपशीलच नाही तर त्यांचा बँकेविषयीचा तपशीलही या अॅप्सनी चोरला आहे. त्यामुळे या युझर्सची बँकिंग माहिती चोरट्यांच्या हाती लागली आहे. त्याचा वापर ते कसा करतात हा प्रश्न आहे.

Android Users वापरकर्त्यांना अशी अॅप शोधणे कठिण नाही. कारण अनेक सॉफ्टवेअर असे आहेत, जे मेलवेअर शोधून ते हटवू शकतात. त्याचा वापर लगेच थांबविणेच नाही तर त्यांची तक्रार करणेही आवश्यक आहे.

सध्या Joker Malware ची चर्चा सुरु आहे. या मेलवेअरने टेक कंपन्यांची चिंता वाढवली आहे. तसेच वापरकर्त्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी ‘Optimizing’ आणि ‘Cleaning’ आवश्यक आहे.

त्यामुळे अॅप डाऊनलोड करताना, त्याबद्दल प्ले स्टोअरवर त्याची माहिती जाणून घ्या. नवखं अॅप डाऊनलोड करताना, त्याचे रेटिंग ही चेक करा, कोणत्याही लिंकवरुन शक्यतोवर अॅप डाऊनलोड करुच नका.

Non Stop LIVE Update
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?.
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?.
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा.
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?.
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब.
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय.
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव.
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल.
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?.