मिनिमम बॅलन्सशिवाय बँक तुमच्याकडून कोणता चार्ज घेते, जाणून घ्या सर्वकाही

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Rohit Dhamnaskar

Updated on: Aug 02, 2021 | 6:30 AM

Bank Charge | तुम्ही बँकेचे एटीएम कार्ड वापरता त्यासाठी अनेकप्रकारचे शुल्क आकारले जाते. तुम्ही ठराविक मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केलेत तर शुल्क भरावे लागते. प्रत्येक बँकेनुसार हे शुल्क वेगवेगळे असते. याशिवाय, एटीएम कार्ड मेंटेनन्ससाठीही वार्षिक शुल्क आकारले जाते

मिनिमम बॅलन्सशिवाय बँक तुमच्याकडून कोणता चार्ज घेते, जाणून घ्या सर्वकाही
बँकेचे व्यवहार

मुंबई: एखाद्या बँकेत खाते उघडल्यानंतर तुम्हाला अनेक आर्थिक सुविधा मिळतात. सरकारी बँकाच्या तुलनेत मिळणाऱ्या झटपट सेवा आणि सुविधांमुळे अनेकजण भारावून जातात. मात्र, यासाठी त्यांच्याकडून बँक पैसे आकारत असल्याची बाब अनेकांना ठाऊकही नसते. ठराविक काळानंतर बँक हे पैसे तुमच्या खात्यातून कापून घेत असते.

बँकेत तुम्हाला रोख रक्कमेचा व्यवहार करायचा असल्यास सुरुवातीची चार ते पाच ट्रान्झेक्शन्स मोफत असतात. मात्र, त्यानंतरही बँकेत किंवा एटीएममध्ये जाऊन पैसे काढल्यास तुमच्याकडून शुल्क आकारले जाते. हे शुल्क 20 ते 100 रुपयांपर्यंत असू शकते.

तुम्ही बँकेचे एटीएम कार्ड वापरता त्यासाठी अनेकप्रकारचे शुल्क आकारले जाते. तुम्ही ठराविक मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केलेत तर शुल्क भरावे लागते. प्रत्येक बँकेनुसार हे शुल्क वेगवेगळे असते. याशिवाय, एटीएम कार्ड मेंटेनन्ससाठीही वार्षिक शुल्क आकारले जाते.

तसेच तुम्ही बँक खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास तुमच्याकडून दंड आकारला जातो. मेट्रो, सेमी अर्बन आणि ग्रामीण भागातील शाखांमध्ये मिनिमम बॅलन्सची मर्यादा वेगवेगळी आहे. खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर साधारण 100 रुपये आणि जीएसटी इतक्या रक्कमेचा दंड आकारला जातो.

तुम्ही एटीएममध्ये गेलात आणि त्याठिकाणी एखादे ट्रान्झेक्शन फेल झाल्यानंतर तुम्हाला दंड भरावा लागतो. यासाठी साधारण 25 रुपयांचा दंड आकारला जातो. त्यामुळे एटीएममधून पैसे काढताना कधीही आपला बॅलन्स चेक करुन घ्यावा. NEFT आणि RTGS या सेवा आता निशुल्क उपलब्ध आहेत. मात्र, IMPS व्यवहारासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागते. हे शुल्क ट्रान्सफर करण्यात येणाऱ्या रक्कमेवर अवलंबून असते.

संबंधित बातम्या:

20 वर्षांचे कर्ज 10 वर्षांत कसे फेडायचे? जाणून घ्या ‘स्मार्ट सेव्हिंग्स’मधून पैशांची बचत करण्याची सोपी माहिती

Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स

एका वर्षात या बँकिंग इक्विटी म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले श्रीमंत, सरासरी 50 टक्क्यांहून अधिक उत्पन्न

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI