भारत पेट्रोलियमकडून डिझेलची होम डिलिव्हरी, ‘या’ राज्यांमध्ये मिळणार FuelKart सेवा

Diesel Home Delivery | ज्यांच्याकडे डिझेलवर चालणाऱ्या मशिन्स आहेत किंवा अवजड वाहने आहेत त्यांना FuelKart सेवेतंर्गत डिझेल घरपोच मिळेल. मोबाईल डिस्पेन्सरच्या माध्यमातून डिझेल घरपोच मिळेल.

भारत पेट्रोलियमकडून डिझेलची होम डिलिव्हरी, 'या' राज्यांमध्ये मिळणार FuelKart सेवा
पेट्रोल-डिझेल
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 10:21 AM

नवी दिल्ली: खासगीकरणाच्या प्रतिक्षेत असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील भारत पेट्रोलियम कंपनीकडून FuelKart सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता देशभरात डिझेलची घरपोच डिलिव्हरी करण्यात येईल. विशेषत: ईशान्य भारतातील राज्यांमध्ये इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे. भारत पेट्रोलियमकडून पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये FuelKart देण्यात येईल. या राज्यांमध्ये भारत पेट्रोलियमकडून 36 पेट्रोल-डिझेल डिस्पेन्सरही सुरु करण्यात आले आहेत.

घरपोच डिझेल कोणाला मिळणार?

ज्यांच्याकडे डिझेलवर चालणाऱ्या मशिन्स आहेत किंवा अवजड वाहने आहेत त्यांना FuelKart सेवेतंर्गत डिझेल घरपोच मिळेल. मोबाईल डिस्पेन्सरच्या माध्यमातून डिझेल घरपोच मिळेल. हे डिस्पेन्सर पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यामुळे ग्राहकांना भेसळमुक्त डिझेल मिळेल. मोबाईल डिस्पेन्सरमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सिस्टम आणि जिओ-फेंसिंग तंत्रज्ञान असेल.

रिलायन्सला टक्कर देणार

भारत पेट्रोलियमची FuelKart सेवा ही रिलायन्सच्या फ्युएल डिस्पेन्सिंग व्यवसायासाठी स्पर्धा मानली जात आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून ब्रिटनच्या BP आणि नायरा एनर्जी यांच्या मदतीने Reliance BP Mobility Ltd ही सेवा चालवली जाते. या माध्यमातून पेट्रोल-डिझेलची घरपोच डिलिव्हरी केली जाते. याशिवाय, Repos Energy, Pepfuels, MyPetrolPump, FuelBuddy आणि Humsafar या कंपन्यांकडूनही इंधनाची घरपोच डिलिव्हरी केली जाते.

मुंबईत इंडियन ऑईलकडून डिझेलची घरपोच डिलिव्हरी

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने नुकतीच हमसफर इंडिया आणि ओकारा फ्युलोजिक्स या कंपन्यांशी भागीदारी केली आहे. त्यामुळे आता इंडियन ऑईल कंपनीला मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात डिझेलची (Diesel) होम डिलिव्हरी करणे शक्य होईल. ही सेवा सुरु झाली असून ग्राहक आता याचा लाभ घेऊ शकतात.

ओकारा फ्युलोजिक्स ही लॉजिस्टिक कंपनी आहे. हमसफर आणि ओकारा फ्युलोजिक्स या दोन्ही कंपन्यांनी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये डिझेलची घरपोच डिलिव्हरी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. आगामी काळात पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नवी मुंबई आणि सोलापूरमध्ये अशाप्रकारे इंधनाची घरपोच डिलिव्हरी करण्याचे उद्दिष्ट या कंपन्यांनी डोळ्यांसमोर ठेवले आहे.

या नव्या सुविधेतंर्गत ग्राहकांना एका कॅनमधून डिझेल घरपोच केले जाते. रहिवाशी सोसायटी, मॉल, हॉस्पिटल, बँक, कन्स्ट्रक्शन साईट, शेतकरी आणि शैक्षणिक संस्थांना या योजनेमुळे फायदा होऊ शकतो. यापूर्वी जास्त प्रमाणात डिझेल खरेदी करणाऱ्यांनाच ही सेवा उपलब्ध होती. मात्र, आता लहान ग्राहकांनाही या सेवेचा लाभ मिळणार आहे.

संबंधित बातम्या:

देशातील पेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्याकडे जाणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

…म्हणून मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक?

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या किंमतीही भडकल्या, पाहा किलोमागे किती रुपयांची वाढ…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.