ICICI, पीएनबीसह इतर बँकांच्या व्याज दरात मोठी वाढ; सर्वच प्रकारची कर्ज महागणार, रेपो रेट वाढीचा परिणाम

आरबीआयकडून बुधवारी पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली. रेपो रेट वाढल्याने बँकांनी आपल्या व्याज दरात वाढ केली आहे. त्यामुळे आता होम लोनसह सर्वच प्रकारची कर्ज महाग होणार आहेत.

ICICI, पीएनबीसह इतर बँकांच्या व्याज दरात मोठी वाढ; सर्वच प्रकारची कर्ज महागणार, रेपो रेट वाढीचा परिणाम
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 2:54 PM

नवी दिल्ली : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून (Reserve Bank of India) बुधवारी पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये (Repo Rate) वाढ करण्यात आली. आरबीआयने बुधवारी रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. नव्या वाढीसह आता रेपो रेट 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान आरबीआयने रेपो रेट वाढवताच बँकांनी देखील आपल्या व्याज दरात वाढ करण्यात सुरुवात केली आहे. आयसीआयसीआय बँकेने आपल्या एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) मध्ये 50 बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. त्यामुळे आता आयसीआयसीआय बँकेचा ईबीएलआर 8.10 टक्क्यांवरून 8.60 टक्क्यांवर पोहोचला आहे. याबाबत बँकेच्या वतीने आपल्या वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्याने बँकेकडून ईबीएलआरमध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे.

बँक ऑफ बडोदाच्या ‘बीआरएलएलआर’मध्ये वाढ

आयसीआयसीआय बँकेने आपल्या ‘ईबीएलआर’मध्ये पन्नास बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. आयसीआयसीआय पाठोपाठ बँक ऑफ बडोदाकडून आपल्या ‘बीआरएलएलआर’मध्ये वाढ करण्यात आली आहे. नव्या वाढीसह बँक ऑफ बडोदाचा ‘बीआरएलएलआर’ 7.40 टक्क्यांवर पोहोचला आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून देखील आपल्या आरएलएलआरमध्ये वाढ करण्यात आली आहे. पंजब नॅशन बँकेचा आरएलएलआर आता 7.40 टक्क्यांवर पोहोचला असून, आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. बँक ऑफ इंडियाने आपल्या ‘आरबीएलआर’मध्ये वाढ केली असून, तो 7.75 टक्क्यांवर पोहोचला आहे.

हे सुद्धा वाचा

आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ

दरम्यान बुधवारी आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. नव्या वाढीसह आरबीआयचा रेपो रेट 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात चार मे रोजी आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा जूनमध्ये रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या अंदाजनुसार चालू आर्थिक वर्षांत रेपो रेटमध्ये वाढ सुरूच राहण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या शेवटी रेपो रेट कोव्हिडपूर्व काळातील पातळीवर पोहोचू शकतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.