AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँकेने सांगितली बचत खात्यातील KYC बाबत महत्वाची माहिती

तुम्हालाही KYC अपडेट करायचे असेल आणि काही कारणास्तव तुम्ही होम ब्रँचमध्ये जाऊन हे काम पूर्ण करू शकत नसाल, तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही होम ब्रँचला न जाताही हे काम पूर्ण करू शकता.

SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँकेने सांगितली बचत खात्यातील KYC बाबत महत्वाची माहिती
SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँकेने सांगितली बचत खात्यातील KYC बाबत मोठी गोष्ट
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Nov 19, 2021 | 11:37 AM
Share

नवी दिल्ली : आता बँक, पीएफ खाते प्रत्येक ठिकाणी केवायसी अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे, कारण जर तुम्ही वेळेत केवायसी अपडेट केले नाही, तर अशा परिस्थितीत तुमचे बँकेसोबतचे व्यवहार भविष्यात थांबवले जाऊ शकतात. खरेतर हे ग्राहकांसाठीही खूप महत्त्वाचे आहे, कारण केवायसीद्वारे बँकेला आपल्या ग्राहकांना जाणून घेण्याची संधी मिळते. अशा परिस्थितीत जेव्हा ग्राहकाला केवायसी अपडेट होतो, म्हणजेच पडताळणी होते, तेव्हा ग्राहकाचे सर्व व्यवहार बँकेच्या नजरेत असतात. याशिवाय, व्यवहारात कोणतीही त्रुटी नाही, अशी सर्व माहिती बँकेकडे असते. KYC अपडेट केल्यानंतर, कोणीही तुमच्या बँक खात्याचा गैरवापर करू शकणार नाही.

तुम्हालाही KYC अपडेट करायचे असेल आणि काही कारणास्तव तुम्ही होम ब्रँचमध्ये जाऊन हे काम पूर्ण करू शकत नसाल, तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही होम ब्रँचला न जाताही हे काम पूर्ण करू शकता. तसेच, केवायसी ऑनलाइन देखील अपडेट केले जाऊ शकते. यासाठी SBI ने स्वतः ग्राहकांना KYC कसे अपडेट करायचे ते सांगितले आहे.

होम ब्रँचला न जाता केवायसी अपडेट करा

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ही प्रक्रिया फॉलो केल्यानंतरही ग्राहक केवायसी अपडेट करू शकतात.

– ग्राहकांनी त्यांच्या KYC कागदपत्रांसह कोणत्याही SBI शाखेला भेट द्यावी – SBI च्या कोणत्याही शाखेत जाऊन KYC अपडेट केले जाईल – ग्राहक केवायसी अपडेटसाठी त्यांचा अर्ज ईमेल किंवा पोस्टद्वारे देखील पाठवू शकतात – होम ब्रँचला न जाताही ग्राहक केवायसी अपडेट करू शकतात – तुम्ही SBI च्या कोणत्याही शाखेत जाल, KYC ची मूळ कागदपत्रे तुमच्याकडे ठेवा.

कोणती कागदपत्रे लागतील?

– आधार कार्ड – पासपोर्ट – मतदार ओळखपत्र – चालक परवाना – पेन्शन पेमेंट ऑर्डर (Big news for SBI customers about savings account KYC update)

इतर बातम्या

SIDBI आणि Google चा सामंजस्य करार, लघू उद्योगांना 25 लाख ते 1 कोटींपर्यंत कर्ज मिळणार

IPO मध्ये गुंतवणूक करताय? या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठे नुकसान

Follow Us
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान