AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्ता देण्यास अर्थ मंत्रालायाचा नकार?

सरकारने महागाई भत्त्याचे 34 हजार कोटी रुपये सद्यस्थितीत परत करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे DA आणि DR ची रक्कम सरकार परत करणार नाही. सध्या 34 हजार कोटी असलेली रक्कम व्याजासह 36,000 कोटींच्या वर जाऊ शकते.

निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्ता देण्यास अर्थ मंत्रालायाचा नकार?
Nirmala Sitharaman
| Updated on: Apr 15, 2022 | 1:55 PM
Share

मुंबई : डीआरचे (महागाई रिलीफ) तीन हप्त्यांची मागणी करणाऱ्या सर्व पेन्शनधारकांना (Pensioners) वित्त मंत्रालयाने सोमवारी झटका दिला. आवश्यक मदत कार्यांसाठी सरकारने कोरोनाच्या काळात पेन्शनधारकांना दिलेले DA (Dearness Allowance – महागाई भत्ता) चे तीन हप्ते मागे घेतल्याची घोषणा वित्त मंत्रालयाने (Ministry of Finance) केली. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, सरकारकडे पेन्शनधारकांचे डीए आणि डीआरचे एकूण 34 हजार कोटी रुपये जमा आहेत. केंद्र सरकार आपल्या कर्मचार्‍यांना चांगल्या जीवनासाठी DA आणि DR देते. DA ला महागाई भत्ता म्हणतात आणि DR ला महागाई रीलीफ म्हणून दिलेली रक्कम म्हणतात.

भत्ता तीन पटीने वाढला

खर्च विभाग ही वित्त मंत्रालयाची एक शाखा असून, अहवालानुसार जेव्हा पेन्शनधारकांनी DR आणि DA च्या पैशांसाठी वित्त मंत्रालय आणि DoE यांना मेल केले तेव्हा त्यांना कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. 2021 मध्ये, DR आणि DA वरील गोठवलेली रक्कम (फ्रीझ) काढून टाकल्यावर, हे भत्ते तीन पट वाढवले गेले, त्यामुळे पेन्शनधारकांची डीआर आणि डीएची ही रक्कम दुप्पट झाली.

व्याज जोडून 36 हजार कोटीच्या वर जाणार रक्कम

मार्च 2022 मध्ये, जेव्हा कोरोना विषाणूने भारतात कहर करायला सुरुवात केली, तेव्हा सरकारने DA आणि DR एका महिन्यानंतर म्हणजे एप्रिलपासून गोठवले. अहवालानुसार, सरकारने कर्मचाऱ्यांचे तीन हप्ते 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 साठी गोठवले आहेत. 2021 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या DA आणि DR च्या रोखलेल्या तीन हप्त्यांमधून 34,402 कोटी रुपये वाचले आहेत. भारत पेन्शनर्स समाजाचे सरचिटणीस एससी माहेश्वरी यांनी दावा केला आहे की सरकारने जमा केलेले पैसे व्याजासह 36,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतात.

इतर बातम्या

वरळीतील अलिशान अपार्टमेंटची 144 कोटींना विक्री; आयनॉक्स समूहाचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन यांनी केली खरेदी

GST स्लॅबमध्ये लवकरच मोठ्या बदलाची शक्यता; ‘अशी’ असेल नवी रचना

Textile | कापड उद्योगाला सरकारचे पाठ’बळ’ ! प्रोत्साहन योजनेत 61 प्रस्तावांना मंजुरी; 2.4 लाख नोकऱ्यांचा राजमार्ग तयार

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.