AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिसेंबर महिन्यात बंपर धमाका, कार खरेदीवर मिळवा घसघशीत डिस्काऊंट; अवघ्या 3.14 लाखांपासून सुरुवात

नवीन वर्षात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करताय, तर या जबरदस्त ऑफर तुम्हाला कार खरेदीवर घसघशीत सूट मिळवून देतील. डिसेंबर महिन्यात कार उत्पादक कंपन्या कार विक्री वाढविण्यासाठी आणि स्टॉक संपविण्यासाठी जबरदस्त ऑफर देतात. तेव्हा कार खरेदीवर घसघशीत डिस्काऊंट मिळवा. स्वस्तात पहिली कार खरेदी करा आणि रुबाबात घरी चालवत आणा. तुमच्या ड्रीम कारवर काय बंपर ऑफर आहेत. ते जाणून घेऊयात. 

डिसेंबर महिन्यात बंपर धमाका, कार खरेदीवर मिळवा घसघशीत डिस्काऊंट; अवघ्या 3.14 लाखांपासून सुरुवात
| Edited By: | Updated on: Dec 25, 2021 | 7:41 AM
Share

मुंबई:  नवीन वर्ष सुरू व्हायला आता फक्त काही दिवस उरले आहेत आणि स्वस्तात कार खरेदी करण्यासाठी ही फारच कमी दिवस राहिले आहेत. कारण जानेवारी महिन्यात कार उत्पादक कंपन्या कारच्या किंमतीमध्ये वाढ करतात. परंतु त्या पूर्वी स्टॉक कमी करण्यासाठी डिसेंबरमध्ये तुमच्यासाठी घेऊन येत असतात बंपर ऑफर.   चला तर जाणून घेऊ या,  देशातील सर्वाधिक कार विक्री करणाऱ्या कंपन्यांनी या डिसेंबर महिन्यात कोणती तगडी ऑफर दिली आहे ते..

मारुती सुझुकी अल्टो 800 

सर्वात कमी बजेट मधली ही मारुतीची लोकप्रिय कार आहे  या कारवर डिसेंबर महिन्यात 48 हजारांपर्यंतचा डिस्काउंट देण्यात येत आहे या कारची एक्स शोरूम किंमत 3.14 ते 4.5 लाख रुपये अशी आहे. या कार वर डिसेंबर महिन्यामध्ये 48 हजार रुपयां पर्यंत तुम्हाला सूट देण्यात येत आहे.  यामध्ये 30 हजार रुपयांचा क्रश डिस्काउंट 15 हजार रुपयांचा एक्सचेंज आणि 3 हजार रुपयांचा कॉर्पोरेट बेनिफिट यांचा समावेश आहे. मारुती सुझुकीची ऑल्टो ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार असून सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या टॉप 5 यादीत तिचा समावेश आहे. यामध्ये पेट्रोलचे 799 सीसीचं इंजिन देण्यात आले आहे. तर 22 ते 31 किलोमीटर प्रतिलिटरचा मायलेज ही कार देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

हुंडाई i20

हुंडाई  कंपनी डिसेंबर महिन्यामध्ये  i20 वर  40 हजार रुपये पर्यंतचा डिस्काउंट देत आहे.  या कारची किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होत आहे. हुंदाई त्यांच्या  प्रिमियम हॅचबॅक टर्बो वर्जन साठी 40 हजार रुपयांपर्यंतची सूट देत आहे.  तर डिझेल वर्जन वर ही सूट 15 हजार रुपयांपर्यंत देण्यात आली आहे. कारला 83 HP च इंजिन आहे 1.2 लिटर नॅचरली स्पिरिट पेट्रोल 120 HP सह 1.0 लिटर पेट्रोल आणि 100HP सह 1.5 लीटर डिझेल इंजिन अशा श्रेणीत तुम्ही कार खरेदी करु शकता. ही कार 25 किलोमीटर प्रति लिटर असे मायलेज देण्याचा कंपनीचा दावा आहे.

रेनो क्विड

रेनोची सर्वाधिक विक्री होणा-या कार क्विड वर कंपनीने डिसेंबर महिन्यात जबरदस्त ऑफर दिली आहे या कारवर 35 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. 4.12 लाख रुपयांपासून सुरुवात होणा-या क्विडवर  10 हजारांचा डिस्काउंट, 15 हजार रुपयांचा बोनस आणि 10 हजार रुपयांचा कॉर्पोरेट बेनिफिट देण्यात येत आहे. कंपनी MY 2020 या योजनेत 10 हजार रुपयांचा ऍडिशनल कॅश डिस्काउंट देत आहे. ग्राहकांसाठी कंपनी 10 हजार रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस ही देत आहे.   ही कार 800 सीसी आणि 1000 सीसी या दोन पेट्रोल इंजिन  पर्यायामध्ये उपलब्ध आहे.

रेनो ट्राइबर

कंपनी ची सर्वाधिक विक्री होणारी कार ट्राइबरवर कंपनीने 60 हजार रुपये पर्यंतचा डिस्काउंट दिला आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 5.55 लाख रुपये आहे. तर 7 सीटरसाठी 10 हजार रुपयांपर्यंताचा कॅश बॅक 20 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, तसेच 10 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. कॅश डिस्काऊंट आणि एक्सचेंज बोनसला कंपनी 25 हजार रुपयांपर्यंत वाढवू शकते. एकूण या कारवर 60 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. या कारमध्ये 72 HP पावर आणि  96 Nm टॉर्कचे 1.0 लीटर थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या 

अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राला अच्छे दिन, 2022 पर्यंत 15 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची शक्याता, रोजगार वाढणार

EPFO अलर्ट: नॉमिनी अपडेटसाठी अवघे काही दिवस, अन्यथा 7 लाखांवर पाणी!

यंदाच वर्ष आयपीओचं: पेटीएम टॉप, 2022 मध्ये 2 लाख कोटींचे उद्दिष्ट

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.