इलेक्ट्रिक वाहनांसाठी पेट्रोलपंपावरच चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार का?

Electric Vehicles | कन्वर्जेन्स एनर्जी सर्विसेज लिमिटेड आणि HPCL संयुक्तपणे मुंबई, दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि पुणे या शहरांमध्ये EV चार्जिंग पॉईंटसची उभारणी करेल. तीव्र, मध्यम आणि कमी अशा तीन स्वरुपांमध्ये हे चार्जिंग पॉईंटस असतील.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी पेट्रोलपंपावरच चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार का?
इलेक्ट्रॉनिक कार खरेदी करताना काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. तुमचे कार्यालय घरापासून किती दूर आहे किंवा इलेक्ट्रिक कारमधून बाहेरगावी किती अंतरापर्यंत प्रवास होऊ शकतो? चार्जिंगसाठी किती खर्च येणार, अशा सर्व घटकांचा विचार झाला पाहिजे.

मुंबई: कन्वर्जेन्स एनर्जी सर्विसेज लिमिटेडने देशातील प्रमुख महानगरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनशी (HPCL) हातमिळवणी केली आहे. उर्जेचा कार्यक्षम आणि योग्य वापर करण्यासाठी हा करार करण्यात आल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे आता HPCLच्या पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग पॉईंट उभारण्यात येतील.

हा करार दहा वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आला आहे. त्यानुसार कन्वर्जेन्स एनर्जी सर्विसेज लिमिटेड आणि HPCL संयुक्तपणे मुंबई, दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि पुणे या शहरांमध्ये EV चार्जिंग पॉईंटसची उभारणी करेल. तीव्र, मध्यम आणि कमी अशा तीन स्वरुपांमध्ये हे चार्जिंग पॉईंटस असतील.

या चार्जिंग स्टेशन्सचा कारभार सीईएसएल APP द्वारे हाताळला जाईल. जेणेकरून या चार्जिंग स्टेशन्सचे नियंत्रण आणि नियमन योग्य पद्धतीने होईल. महानगरातील प्रमुख महामार्गांच्यालगत ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी कमी खर्च

दिल्ली इलेक्ट्रिसिटी रेग्युलिटी कमीशनने (DERC) यापूर्वीच चार्जिंग स्टेशन्ससाठी लागणाऱ्या वीजेचे दर कमी केले आहेत. त्यामुळे वाहन चार्ज करण्यासाठी कमी पैसे लागतील. DERC च्या माहितीनुसार, तुम्हाला घरीच गाडी चार्ज करायची असेल तर प्रतिकिलो वॅट 4.5 रुपयांचे शुल्क आकारले जाईल. तर चार्जिंग स्टेशनवर 4 रुपये प्रतिकिलोवॅट रुपये दराने पैसे द्यावे लागतील. दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर आगामी काळात चांगले अनुदानही मिळू शकते.

संबंधित बातम्या:

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल एकाच किंमतीने विकणार का, पेट्रोलियम मंत्री म्हणाले…

आता कोंबड्यांच्या विष्ठेपासून तयार होणार बायोडिझेल, एका लीटरमध्ये 38 किलोमीटर मायलेज

पेट्रोल-डिझेलचं ‘शतक’, मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात सरकारला अधिकचे पैसे पाहिजे म्हणून जास्तीचा कर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI