आता कोंबड्यांच्या विष्ठेपासून तयार होणार बायोडिझेल, एका लीटरमध्ये 38 किलोमीटर मायलेज

Chicken Waste | केरळ पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान विद्यापीठातंर्गत येणाऱ्या एका महाविद्यालयात जॉन अब्राहम प्राध्यापक आहेत. गेल्या सात वर्षांपासून ते चिकन वेस्टपासून बायोडिझेल तयार करण्यासाठी तंत्र विकसित करत होते. त्यांच्या या प्रयोगाला अखेर यश आले असून त्यांना या शोधासाठीचे पेटंटही देण्यात आले आहे.

आता कोंबड्यांच्या विष्ठेपासून तयार होणार बायोडिझेल, एका लीटरमध्ये 38 किलोमीटर मायलेज
पेट्रोल-डिझेल दर
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Jul 26, 2021 | 8:20 AM

नवी दिल्ली: केरळमधील पशुवैद्यक जॉन अब्राहम यांनी कोंबड्यांच्या विष्ठेपासून बायोडिझेल तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे. यासाठी त्यांना पेटंटही मिळाले आहे. या पद्धतीने तयार झालेल्या एक लीटर इंधनावर कोणतीही गाडी 38 किलोमीटर प्रवास करु शकते. पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत या बायोडिझेलची किंमत कमीही असेल आणि त्यामुळे प्रदूषणही कमी होईल.

केरळ पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान विद्यापीठातंर्गत येणाऱ्या एका महाविद्यालयात जॉन अब्राहम प्राध्यापक आहेत. गेल्या सात वर्षांपासून ते चिकन वेस्टपासून बायोडिझेल तयार करण्यासाठी तंत्र विकसित करत होते. त्यांच्या या प्रयोगाला अखेर यश आले असून त्यांना या शोधासाठीचे पेटंटही देण्यात आले आहे.

18 लाख रुपयांचा प्लांट

जॉन अब्राहम यांनी वायनाड परिसरातील कलपेट्टा येथील महाविद्यालयात 18 लाख रुपये खर्च करुन एक संयंत्र विकसित केले. अब्राहम यांनी तयार केलेल्या बायोडिझेलला भारत पेट्रोलियमकडून गुणवत्ता प्रमाणपत्रही देण्यात आले होते. तेव्हापासून अब्राहम यांच्या महाविद्यालयातील वाहने याच इंधनावर चालतात.

100 किलो चिकन वेस्टपासून 1 लीटर बायोडिझेल

कोंबड्या आणि डुकरांच्या विष्ठेत असणाऱ्या विशिष्ट घटकांमुळे त्यापासून सामान्य तापमाला तेल काढणे सोपे असते. आता जॉन अब्राहम यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील छात्र डुकराच्या विष्ठेपासून बायोडिझेल तयार करण्यासाठी संशोधन करत आहेत. 100 किलो चिकन वेस्टपासून एक लीटर बायोडिझेलची निर्मिती होते.

फ्लेक्स-फ्यूएल इंजिनमुळे काय होणार?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, मी एक आदेश जारी करणार आहे. त्यानुसार देशातील वाहनांमध्ये केवळ पेट्रोल इंजिन नव्हे तर फ्लेक्स-फ्यूएल इंजिन असेल. त्यामुळे लोकांना इंधन म्हणून 100 टक्के कच्च्या तेलाचा वापर करता येईल. येत्या आठ ते दहा दिवसांत यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. त्यानंतर देशभरात वाहननिर्मिती उद्योगासाठी फ्लेक्स-फ्यूएल इंजिन अनिवार्य होईल.

कोणत्या देशात वापरले जाते फ्लेक्स-फ्यूएल इंजिन?

सध्याच्या घडीला ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत फ्लेक्स-फ्यूएल इंजिनाची निर्मिती केली जाते. त्यामुळे वाहनचालकांना 100 टक्के पेट्रोल किंवा 100 टक्के बायो-इथेनॉल वापरण्याचा पर्याय उपलब्ध होतो.

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचा समावेश

केंद्र सरकारने येत्या दोन वर्षात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल ब्लेडिंगचे लक्ष्य ठेवले आहे. जेणेकरून भारताला खनिज तेलाची आयात कमीप्रमाणात करावी लागेल. 2015 मध्ये पेट्रोलमध्ये एक ते दीड टक्के इथेनॉलची मात्रा होती. सध्या हे प्रमाण 8.5 टक्के इतके आहे. पेट्रोल आणि इथेनॉलच्या मिश्रणामुळे इंधनाची गुणवत्ता सुधारते. तसेच उत्पादनासाठी कमी खर्च लागत असून प्रदूषणही कमी होते, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

Petrol and diesel price: देशभरात इंधन दरवाढीची ‘साथ’; मुंबईनंतर आणखी एक मेट्रो सिटीत पेट्रोल शंभरीपार

पेट्रोल-डिझेलचं ‘शतक’, मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात सरकारला अधिकचे पैसे पाहिजे म्हणून जास्तीचा कर

Inflation: ‘कॉमन मॅन’चा खिसा कापला जाणार; महागाईने तोडला आजवरचा रेकॉर्ड

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें