AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railways : हवेशी मारा गप्पा! ताशी 200 किलोमीटर वेगाने झरझर धावणार ट्रेन, रेल्वेचा असा आहे मेगा प्लॅन

Indian Railways : भारतीय रेल्वेने आता कात टाकली आहे. अनेक स्थानकात बदल झाला आहे. विद्युतवाहिणीवर रेल्वे धावत आहे. आता झुकझुक आगीनगाडीचं रुपडं पालटणार आहे. ताशी 200 किलोमीटर वेगाने पापणी लवते न लवते तोच रेल्वे झरकन समोरुन जाणार आहे.

Indian Railways : हवेशी मारा गप्पा! ताशी 200 किलोमीटर वेगाने झरझर धावणार ट्रेन, रेल्वेचा असा आहे मेगा प्लॅन
गतिमान युगाची नांदी
| Updated on: Apr 13, 2023 | 7:18 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने (Indian Railway) आता कात टाकली आहे. अनेक स्थानकात बदल झाला आहे. विद्युतवाहिणीवर रेल्वे धावत आहे. आता झुकझुक आगीनगाडीचं रुपडं पालटणार आहे. ताशी 200 किलोमीटर वेगाने पापणी लवते न लवते तोच रेल्वे झरकन समोरुन जाणार आहे. रेल्वे आता एक अतिजलद चाचणीसाठी रुळाची (High Speed Test Track) चाचणी करत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार, ताशी 220 किलोमीटरपर्यंत रेल्वे धावण्यासाठी चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात प्रवाशांचे मोठा वेळ वाचणार आहे. तसेच त्यासाठी त्याला विमान प्रवास खर्चा इतका खर्च ही करावा लागणार नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी नवीन मेगा प्लॅन तयार करण्यात येत आहे.

काय होईल फायदा अहवालानुसार, भारतीय रेल्वेने दावा केला आहे की, हा फास्ट ट्रॅक प्रकल्प पूर्ण झाल्यावर भारत जगाच्या इतिहास नाव कोरेल. रॉलिंग स्टॉक्ससाठी आंतरराष्ट्रीय मापदंड पूर्ण करणारी चाचणीची सुविधा देणार भारत हा पहिला देश असेल.

हाय स्पीड रेल्वे ट्रॅक हायस्पीड रेल्वे ट्रॅक 23 किलोमीटर लांबीचा आहे. गोदा येथील हायस्पीड लूप 13 किलोमीटर लांब आहे. नावा येथे तीन किलोमीटरचा एक्लरेटेड टेस्टिंग लूप आणि 20 किलोमीटरचा कर्व्ह टेस्टिंग लूप याचा यामध्ये समावेश आहे.

डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण नॉर्थ वेस्ट रेल्वे झोनच्या सीपीआरओच्या दाव्यानुसार, हाय स्पीड टेस्ट ट्रॅकचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. रेल्वे अधिकाऱ्यानुसार, हा प्रकल्प जोरात सुरु आहे. या प्रकल्पाने गती पकडली आहे. डिसेंबर 2024 पर्यंत या प्रकल्पाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यात येईल.

वर्षाच्या अखेरीस अनेक सुविधा भारतीय रेल्वेच्या दाव्यानुसार, हायस्पीड टेस्ट ट्रॅकच्या मदतीने रेल्वेला सविस्तर चाचणीची सुविधा मिळेल. रॉलिंग स्टॉक कंपोनेंट आणि वाहनांच्या स्टॅटिक असेस्मेंटसाठी याचा फायदा होईल. रेल्वे व्हील इंटरेक्शन फॉर्सेज, क्रॅश टेस्टिंग, स्टॅबिलिटी टेस्टिंग, ट्विस्ट आणि यॉ टेस्टिंग, व्हील ऑफलॉडिंग टेस्ट आणि कंपोनेंटची टेस्टिंग, या चाचण्या करता येतील. त्यासाठी प्रकल्प हा विकसीत करण्यात येत आहे.

कुठे सुरु आहे काम ताशी 220 किलोमीटरपर्यंत रेल्वे धावण्यासाठी चाचणीचा प्रकल्प राजस्थानमध्ये आकार घेत आहे. जोधपूर विभागातंर्गत 59 किलोमीटरचा लांब ट्रॅक तयार करण्यात येत आहे. एलिव्हेटेड टेस्ट ट्रॅकला येत्या काही वर्षात वंदे भारत एक्सप्रेसच्या चाचणीसाठी वापरण्यात येईल.

4.5 किलोमीटरचा ट्रॅक तयार रिपोर्टनुसार, 4.5 किलोमीटरचा ट्रॅक तयार करण्यात आला आहे. भारतीय रेल्वेने याविषयीची माहिती दिली. 31.5 किलोमीटरचे काम आणि तीन किलोमीटरचे एक्सलरेटेड टेस्टिंग लूपचे काम मोठ्या गतीने सुरु आहे. डिसेंबर 2023 पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. याच आर्थिक वर्षात टेस्टिंग ट्रॅकचे काम पूर्णत्वास जाण्याची आशा आहे. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस त्यावरुन धाऊ शकेल. तसेच देशात लवकर गतिमान दळणवळणात रेल्वेचा सहभाग असेल.

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.