‘या’ कंपनीकडून लसीकरणाबाबत मोठा निर्णय, नो व्हॅक्सिन नो जॉबच्या धोरणाची अंमलबजावणी

कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत आहे, असे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता देशात अनेक कंपन्यांकडून नो व्हॅक्सिन नो जॉबचे धोरण राबविण्यात येत आहे.

'या' कंपनीकडून लसीकरणाबाबत मोठा निर्णय, नो व्हॅक्सिन नो जॉबच्या धोरणाची अंमलबजावणी
corona vaccination
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 6:45 AM

नवी दिल्ली : कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत आहे, असे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाचा कहर पहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांपासून तब्बल चाळीस हजारांपेक्षा अधिक रुग्ण राज्यात आढळून येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याचे आरोग्य विभागामार्फत वारंवार सांगण्यात येत आहे. दरम्या लसीकरणासाठी एका खासगी कंपनी पुढाकार घेतला असून, त्यांनी आपल्या पॉलिसीमध्ये बदल केला आहे. नो व्हॅक्सिन नो जॉब असे धोरण कंपनीने आता जाहीर केले आहे.

14 जानेवारीपर्यंतची मुदत

सीटीग्रुप असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी बँकिंग क्षेत्रामध्ये काम करते. कंपनीच्या नव्या धोरणानुसार कर्मचाऱ्यांना येत्या 14 जानेवारीपर्यंत लस घेण्यास सांगण्यात आले आहे. जे कर्मचारी 14 जानेवारीपर्यंत लस घेणार नाहीत, त्यांना कामावरून काढून टाकण्यात येईल असा इशार कंपनीच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. देशभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाला आळा घालायचा असेल तर लसीकरण हा एकमेव उपाय आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने देखील वारंवार लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संबंधित कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली.

‘ब्लूमबर्ग’मध्ये देखील लसीकरण सक्तीचे

दरम्यान यापूर्वी ‘ब्लूमबर्ग’ने देखील असाच निर्णय घेतला होता. कंपनीने गेल्याच वर्षी नो व्हॅक्सिन नो जॉब पॉलिसी लागू केली होती. कंपनीने आपल्या या नव्या पॉलिसीची घोषणा गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्येच केली होती. कंपनीच्या नव्या पॉलिसीनुसार कंपनीच्या अमेरिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरण सक्तीचे करण्यात आले होते. मात्र इतर देशातील कर्मचाऱ्यांबाबत अद्याप कंपनीने आपली भूमिक स्पष्ट केलेली नाही. लसीकरण झालेल्या नागरिकांना देखील कोरोनाची लागण होत असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र ज्यांनी लसीचे दोनही डोस घेतले आहेत, अशा कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे आकडेवारीमधून समोर येत आहे.

संबंधित बातम्या

‘क्रिप्टो’ फर्म ईडीच्या रडारवर: कर नियमांसाठी केंद्राकडे धाव, अर्थसंकल्पात स्पष्टीकरणाची मागणी!

‘अनप्लग्ड’ टाटा: चरित्रातून जीवनपट लवकरच जगासमोर, पुस्तकासाठी महागडा लेखन करार!

IPO पूर्वीच LIC च्या कमाई मध्ये मोठी घसरण, डिसेंबर महिन्यामध्ये नवीन योजना विक्रीमध्ये तब्बल 20 टक्‍क्‍यांची पीछेहाट!

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.