CNG, PNG Price Hike : सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमती तीन आठवड्यात दुसऱ्यांदा वाढल्या, नवीन किमती पहा

एमजीएलच्या प्रवक्त्याने सांगितले की, वाहनांना इंधन देणार्‍या सीएनजीच्या सुधारित सर्वसमावेशक किमती 63.50 रुपये प्रति किलोवरून 66 रुपये प्रती किलोपर्यंत वाढतील.

CNG, PNG Price Hike : सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमती तीन आठवड्यात दुसऱ्यांदा वाढल्या, नवीन किमती पहा
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 2:27 PM

महानगर गॅस लिमिटेड (MGL- Mahanagar Gas Limited) ने शनिवारी मध्यरात्रीपासून CNG आणि PNG च्या दरात वाढ केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, तीन आठवड्यांपूर्वीच कंपनीने सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढवल्या होत्या. शनिवारी सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन (MMR) साठी CNG ची मूळ किंमत 2.50 रुपये प्रति किलो आणि घरगुती PNG साठी 1.50 रुपये प्रती scm ने वाढवण्यात आली आहे. कंपनीने गेल्या महिन्याच्या 18 तारखेला म्हणजे डिसेंबर 2021 मध्येच सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढवल्या होत्या.

एक किलो सीएनजीची किंमत 63.50 वरून 66 रुपयांपर्यंत वाढली

एमजीएलच्या प्रवक्त्याने शनिवारी सांगितले की, दरवाढीनंतर सीएनजीच्या नवीन किमती 63.50 रुपये प्रती किलोवरून 66 रुपये प्रती किलोपर्यंत वाढतील. पीएनजीच्या किमती 38 रुपये एससीएमवरून 39.50 रुपये एससीएमपर्यंत वाढतील. देशांतर्गत गॅस वाटपातील कमतरता भरून काढण्यासाठी, सीएनजी आणि घरगुती पीएनजी विभागांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त बाजार मूल्यासह नैसर्गिक वायूची पूर्तता करत आहे. बाजारभावापेक्षा नैसर्गिक वायूच्या किमतीत भरीव वाढ झाल्यामुळे, MGLच्या इनपुट गॅसच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. ग्राहकांसाठी ताज्या दरवाढीमुळे त्याची किंमत अंशतः भरून निघेल अशी अपेक्षा आहे.

18 डिसेंबरलाच वाढवण्यात आल्या होत्या किमती

CNG आणि PNG किमतींमध्ये या या वाढीपूर्वी, कंपनीने 18 डिसेंबर 2021 रोजी CNG चे दर प्रती किलो 2 रुपये आणि PNG चे दर 1.50 रुपये प्रति SCM ने वाढवले ​​होते. त्यामुळे 16 लाख पीएनजी ग्राहक आणि 8 लाखांहून अधिक सीएनजी ग्राहकांना मोठा फटका बसला. MGL द्वारा सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढवण्याच्या निर्णयाचा एकूण 25 लाख ग्राहकांवर वाईट परिणाम झाला आहे. योगायोगाने, एमजीएलने सणासुदीच्या आधी ऑक्टोबरमध्ये सीएनजी-पीएनजीच्या किमती दोनदा वाढवल्या होत्या. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये आणि पुन्हा डिसेंबरमध्ये किमती वाढविल्या. एमजीएलने असे आश्वासन दिले आहे की, नवीनतम दरवाढ असूनही, सीएनजी सध्याच्या किमतींवर पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अनुक्रमे सुमारे 59 टक्के आणि 30 टक्के आणि PNG किमतींच्या तुलनेत सुमारे 22 टक्के आकर्षक बचत देते.

(पीटीआय इनपुट)

Nagpur | रेल्वे रुळाचे काम करत होत्या महिला; धडधड येणाऱ्या ट्रेनने उडविले, दोन महिला मजूर ठार

Nagpur Crime | 65 वर्षांचा म्हातारा घ्यायचा निरागस चिमुकलीचा गैरफायदा; दहा वर्षांच्या पोरीला नको त्या अवस्थेत पाहून आई संतापली, नेमकं काय घडलं?

Non Stop LIVE Update
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.