Nagpur Crime | 65 वर्षांचा म्हातारा घ्यायचा निरागस चिमुकलीचा गैरफायदा; दहा वर्षांच्या पोरीला नको त्या अवस्थेत पाहून आई संतापली, नेमकं काय घडलं?

वासना माणसाला कुठून कुठे पोहचवेल काही सांगता येत नाही. एका वासनांध म्हताऱ्याला आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. कारण त्याने दहा वर्षांच्या चिमुकलीलाच आपल्या हौसेची शिकार केली होती.

Nagpur Crime | 65 वर्षांचा म्हातारा घ्यायचा निरागस चिमुकलीचा गैरफायदा; दहा वर्षांच्या पोरीला नको त्या अवस्थेत पाहून आई संतापली, नेमकं काय घडलं?
हुडकेश्वर पोलीस ठाणे

नागपूर : ही घटना जरा विचित्र आहे. दहा वर्षांची मुलगी खेळायला जायची. म्हातारा तिला बोलावून घ्यायचा. आमिष दाखवून तिच्याशी चाळे करायचा. त्यानंतर तर त्यानं माणुसकीच्या सीमाचं पार केल्या. त्यामुळं या म्हताऱ्याला आता जेलमध्ये उरलेले दिवस काढावे लागणार आहेत.

मुलीच्या आईच्या लक्षात आली घटना

हुडकेश्‍वर पोलिस ठाणे हद्दीत एका दहा वर्षांच्या चिमुकलीच्या अपरिपक्वतेचा फायदा ६५ वर्षांचा एक नाराधम घेत होता. या नराधमाने मागील चार वर्षांपासून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. ती वर्ग पहिलीमध्ये असल्यापासून तो तिच्यासोबत असे कृत्य करीत होता. परंतु, एका घटनेनंतर आईच्या लक्षात ही बाब आली आणि हे बिंग फुटले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नरधमाला अटक केली आहे. त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

चार वर्षांपासून सुरू होता अत्याचार

गणेश सीताराम कावळे असे या नरधमाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली ही तिच्या आई-वडिलांना एकुलती एक आहे. तिची आई गृहिणी आहे. त्यांच्या परिसरातच सीताराम कावळे हा राहतो. तो भाजीपाला विक्रीचे काम करतो. पीडित चिमुकली ही घरापुढे असलेल्या काही मुलींशी खेळायला बाहेर यायची. यावेळी आरोपी गणेशच्या घरी कुणी नसल्यावेळी तो तिला घरी बोलवायचा. तिच्यावर जबरी अत्याचार करीत होता. या चिमुकलीला यासंदर्भात काहीही कळतही नव्हते. परंतु, वर्ग पहिलीपासून तिच्यावर हा प्रकार सलग वर्ग पाचव्या वर्गापर्यंत होत होता. त्यामुळे हे कृत्य योग्य की अयोग्य हे ठरविण्याची तिची परिपक्वता आणि तसे वयही नव्हते.

अशी आली घटना उघडकीस

दरम्यान, ४ जानेवारी रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास पीडिता ही तिच्या मैत्रिणीशी खेळत होती. यावेळी पीडितेची आई त्या ठिकाणी पोहोचली. यावेळी पीडिता आणि तिची मैत्रीण हे दोघेही विचित्र अवस्थेत दिसून आले. याबाबत तिच्या आईने हा काय प्रकार आहे? असा जाब विचारला. यावेळी मुलीने आपल्या घरासमोरील काकाजी असेच करतात, असे सांगितले. त्यानंतर आईचा राग अनावर झाला. त्यानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली.

Nagpur RSS | रेकी प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा, एटीएस, एनआयए करणार; कोण होता रेकी करणारा रईस?

ZP Corona | नागपुरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ अन् कोविड केअर सेंटर बंद; जिल्हा प्रशासन करणार काय?

Transportation | नागपुरात साकारलीय एकाच ठिकाण चारस्तरीय वाहतूक व्यवस्था!; नेमका काय आहे प्रकार?

 

Published On - 9:57 am, Sun, 9 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI