महिन्याभरात 21 पटीने वाढले कॉफीचे दर; जाणून घ्या काय आहेत भाव वाढीमागील कारणे?

महिन्याभरात 21 पटीने वाढले कॉफीचे दर; जाणून घ्या काय आहेत भाव वाढीमागील कारणे?

कॉफीचे भाव गगनाला भिडले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये कॉफीच्या किमतीत मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याची पहायला मिळत आहे. बुधवारी कॉफीचे दर उच्चस्थरावर पोहोचले. गेल्या दहा वर्षांच्या तुलनमध्ये सध्या कॉफी सर्वाधिक महाग झाली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 10, 2021 | 1:26 PM

नवी दिल्ली :  कॉफीचे भाव गगनाला भिडले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये कॉफीच्या किमतीत मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याची पहायला मिळत आहे. बुधवारी कॉफीचे दर उच्चस्थरावर पोहोचले. गेल्या दहा वर्षांच्या तुलनमध्ये सध्या कॉफी सर्वाधिक महाग झाली आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील वर्षी देखील कॉफीच्या किमतीमध्ये तेजी कायम राहणार आहे. ब्राझिल, कोलंबिया, व्हिएतनाम आणि इथोपिया हे कॉफीचे प्रमुख उत्पादक देश मानले जातात. मात्र या देशातील खराब हवामानाचा फटका हा कॉफीच्या पिकाला बसला आहे. त्यामुळे कॉफीच्या पिकात मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. एकीकडे उत्पादनामध्ये घट होत असताना दुसरीकडे मात्र गेल्या वर्षभरापासून कॉपीच्या मागणीमध्ये मोठ्याप्रमाणत वाढ झाली आहे. पुरवठ्यापेक्षा मागमी वाढल्याने कॉफीच्या दर सातत्याने वाढत आहेत.

पुरवठा साखळी विस्कळीत

गेल्या दोन वर्षांपासून जगावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जगभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे पुरवठा साखळी विस्कळती झाली आहे. जे देश कॉफीसाठी इतर देशांवर अवलंबून आहेत, त्या देशांमध्ये अद्यापही कॉफीचा पुरवठा सुरळीत सुरू झालेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे मोठ्याप्रमाणात कॉफीचा तुटवडा आहे. त्यातच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा देखील इशारा देण्यात येत आहे. त्यामुळे कॉफीचे भाव वाढले आहेत. 2022 मध्ये देखील कॉफीच्या दरात तेजी राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 2020-21 मध्ये कॉफीचे जागतिक उत्पादन 164.8 मिलियन  बँग इतके झाले आहे. मात्र कॉफीची मागणी 165 मिलियन इतकी राहिली त्यामुळे पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याचे पहायला मिळत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये दारात शंभरपटीने वाढ

व्यवसायिक कॉफीच्या किमतीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये शंभरपटीने वाढ झाली आहे. तर स्पेशल कॉफीचे दर देखील 30 ते 40 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या महिन्यामध्ये तर सर्वच प्रकारच्या कॉफीचे दर हे 21  पटीने वाढले आहेत. भरमसाठ दरवाढीमुळे कॉफीची खरदी करणे सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

संबंधित बातम्या 

गुड न्यूज! पुढील वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 9 टक्के राहण्याचा अंदाज

‘टाटा’ची वाहाने महागणार; एक जानेवारीपासून नवे दर लागू

पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा व्हिडीओ होतोय व्हायरल; व्हिडीओमधील दावा खरा आहे का?, आरबीआयने दिले स्पष्टीकरण

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें