Financial Work : झटपट उरकून घ्या ही कामे, नाहीतर होईल नुकसान

Financial Work : आत केवळ तीन दिवस उरले आहेत. या काळात ही कामं लवकर उरकून घ्या. गुलाबी नोटा बदलण्यासाठी आता कमी कालावधी उरला आहे. 30 सप्टेंबर 2023 रोजीपर्यंत ही काम झटपट उरकून घ्या. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. इतरही अनेक गोष्टी अपडेट करणे आवश्यक आहे.

Financial Work : झटपट उरकून घ्या ही कामे, नाहीतर होईल नुकसान
Follow us
| Updated on: Sep 27, 2023 | 10:24 AM

नवी दिल्ली | 27 सप्टेंबर 2023 : सप्टेंबर महिना लवकरच संपणार आहे. त्यासाठी आता केवळ तीन दिवस (Financial Work Deadline) उरले आहेत. त्यामुळे काही आर्थिक कामे झटपट उरकून घ्या. त्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ही डेडलाईन आहे. या निश्चित कालावधीत तुम्ही ही कामे पूर्ण केली नाही तर तुम्हाला नाहक फटका बसेल. 2000 रुपयांच्या गुलाबी नोटा बदलवून घेण्यासाठी आता केवळ तीनच दिवस उरले आहेत. ग्राहकांसाठी एसबीआयने एक योजना पण आणली आहे. या गुलाबी नोटा (2000 Rupees Note) तुम्ही एसबीआयच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूकीसाठी वापरु शकता. तर इतर काही अल्पबचत योजनांमध्ये काही अपडेट करण्यासाठी कमी कालावधी उरला आहे. ही कामे या तीन दिवसात पटकन उरकून घ्या.

2000 रुपयांच्या नोटा

2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अजूनही काही लपविलेल्या गुलाबी नोटा सापडल्या असतील अथवा आठवल्या असतील तर त्या झटपट बदलून घ्या. त्यानंतर या नोटा चलनात नसतील. त्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ही डेडलाईन आहे. म्हणजे अवघे तीन दिवस उरले आहेत. नाहीतर त्यांचा वापर करता येणार नाही. 19 मे 2023 रोजी या गुलाबी नोटा वितरणातून बाहेर करण्याचा निर्णय झाला. या नोटा बदलण्याची प्रक्रिया लागलीच सुरु करण्यात आली. आता ही अंतिम मुदत अगदी तोंडाशी आली आहे. बाजारातील सध्याच्या 93 टक्के नोटा या 31 ऑगस्ट 2023 रोजीपर्यंत परत आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

अल्पबचत योजना

सप्टेंबर महिन्यात पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनांमध्ये (Post Office Small Saving Schemes) गुंतवणुकीसाठी खास आहेत. यामध्ये पब्लिक प्रोव्हिडंट फंड आणि सुकन्या समृद्धी योजनांसह इतर योजनांमध्ये गुंतवणूक करता येते. या योजनांमध्ये या तीन दिवसांमध्ये आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. असे न केल्यास तुमचे खाते काही काळासाठी गोठविण्यात येईल. केंद्रीय अर्थमंत्रालयाने याविषयीची अधिसूचना काढली आहे.

बँक लॉकर

एसबीआय, बँक ऑफ बडोदासह अन्य बँकांमध्ये लॉकर असलेल्या ग्राहकांना अलर्ट येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक लॉकर ग्राहकांना नवीन करार करणे आवश्यक आहे. जर तुमचे पण बँकेत लॉकर असेल तर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत हा करार करुन घ्या. तुम्ही नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला बँकेचे लॉकर हाताळता येणार नाही. बँकांनी अशा ग्राहकांना एसएमएस पाठवला आहे. अंतर्गत 30 जून पर्यंत 50 टक्के, 30 सप्टेंबरपर्यंत 75 टक्के तर 31 डिसेंबरपर्यंत 100 टक्के ग्राहकांना हे काम पूर्ण करायचे आहे. तर डीमॅट खाते आणि इतर योजनांमध्ये केवायसीची पूर्तता करणे आवश्यक आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.