GDP मीटर : नव्या व्हेरियंटची मार्केटला धास्ती, अर्थचक्राच्या गतीला ‘ओमिक्रॉन’मुळं ब्रेक?

GDP मीटर : नव्या व्हेरियंटची मार्केटला धास्ती, अर्थचक्राच्या गतीला ‘ओमिक्रॉन’मुळं ब्रेक?

देशांतर्गत रेटिंग एजन्सी इंडिया ‘रेटिंग्स अँड रिसर्च’ने ओमिक्रॉनमुळे जानेवारी-मार्च तिमाहीच्या जीडीपी दरात 0.4 टक्क्यांचा परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तविली आहे. वित्तीय वर्ष 2021-22 च्या विकासदरात मागील वर्तविलेल्या अंदाजासापेक्ष 0.1 टक्क्यांनी घटीचा निष्कर्ष रेटिंग एजन्सीने वर्तविला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Jan 06, 2022 | 9:35 PM

नवी दिल्ली : कोरोनाचा नवा विषाणू ‘ओमिक्रॉन’च्या परिणामांचे ढग भारतीय अर्थव्यवस्थेवर दाटण्यास सुरुवात झाली आहे. वर्तमान वित्तीय वर्षाच्या अखेरच्या तिमाही आकड्यावर कोविडचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. अर्थतज्ज्ञांनी यापूर्वी वर्तविलेल्या देशांतर्गत विकास दराच्या आकड्यात घसरणीची शक्यता वर्तविली आहे. कोविड परिणामामुळे रुळावर येणारी अर्थव्यवस्थेचा वेग ओमिक्रॉनमुळे मंदावणार असून त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या रिकव्हरीवर त्याचा परिणाम दिसून येईल

ओमिक्रॉनचा किती परिणाम?

देशांतर्गत रेटिंग एजन्सी इंडिया ‘रेटिंग्स अँड रिसर्च’ने ओमिक्रॉनमुळे जानेवारी-मार्च तिमाहीच्या जीडीपी दरात 0.4 टक्क्यांचा परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तविली आहे. वित्तीय वर्ष 2021-22 च्या विकासदरात मागील वर्तविलेल्या अंदाजासापेक्ष 0.1 टक्क्यांनी घटीचा निष्कर्ष रेटिंग एजन्सीने वर्तविला आहे.

लॉकडाउन अप, जीडीपी डाउन

कोविडमुळे सार्वजनिक वावरावरील निर्बंध, नाईट कर्फ्यू, आठवड्यासाठीचे कर्फ्यू यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. एजन्सीच्या अहवालानुसार, मागील 15 दिवसांत वाढलेल्या कोविडबाधितांच्या आकड्यांमुळे चौथ्या तिमाहीत विकास दर 5.7 टक्क्यांवर पोहचण्याची शक्यता आहे. अर्थतज्ज्ञांनी यापूर्वी 6.1 टक्के अंदाज वर्तविला होता. संपूर्ण वित्तीय वर्षासाठी जीडीपी दर 9.3 टक्के राहण्याची शक्यता आहे. अर्थतज्ज्ञांनी ओमिक्रॉनच्या सावटापूर्वी 9.4 टक्के जीडीपी अंदाज वर्तविला होता.

रिपोर्टमध्ये दिलासा

रिपोर्टमध्ये जीडीपीच्या घसरणीच्या चिंतेसोबत व्हेरियंट कमी प्रभावशाली ठरण्याचा दिलासाही व्यक्त करण्यात आला आहे. प्राथमिक आकडेवारीवरुन दुसऱ्या लाटेपेक्षा ओमिक्रॉनचा प्रभाव कमी राहणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. ओमिक्रॉनची लक्षणे मध्य व सौम्य स्वरुपाची आहेत. केंद्र तसेच राज्य सरकारकडून पहिल्या व दुसऱ्या लाटेसापेक्ष सौम्य निर्बंध लावले जातील. त्यामुळे अर्थचक्राच्या गतीवर परिणाम जाणवणार नाही. ओमिक्रॉनचा प्रादूर्भाव संपल्यानंतर अर्थव्यवस्था पुन्हा कमी कालावधीत तेजीने उभारी घेईल अशा आशावाद एजन्सीच्या अहवालात वर्तविला आहे.

HDFC चा अहवाल काय म्हणतो?

.सार्वजनिक वित्तीय क्षेत्रातील आघाडीची बँक एचडीएफसीचे मुख्य आर्थिक सल्लागार अभीक बरुआ यांनी ओमिक्रॉनच्या सावटावर भाष्य केलं आहे. ओमिक्रॉनच्या वाढत्या संख्येमुळे मार्च तिमाहीच्या घरगुती देशांतर्गत वाढीच्या दरावर (जीडीपी) परिणाम होण्याचे संकेत बरुआ यांनी दिले आहेत. बरुआ यांच्या मते जीडीपीवर 0.31 टक्क्यांचा परिणाम जाणवू शकतो

रिझर्व्ह बँकेची भूमिका

भारतीय वित्तीय व्यवस्थेतील शीर्ष संस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे अर्थ जगताच्या नजरा लागल्या आहेत. येत्या फेब्रुवारीत रिझर्व्ह बँक द्विमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. रेटिंग एजन्सी व एचडीएफसीच्या आर्थिक सल्लागारांच्या मते रिझर्व्ह बँकेचे पतधोरण ‘जैसे थे’ राहण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

जीवन विमा पॉलिसी 40 टक्क्यांनी झाली महाग, कोणत्या विमा कंपनीने किती वाढविले दर?

शेअर बाजारात या स्टॉकमध्ये कमाईची संधी, या स्टॉकमध्ये आज दिसू शकते तेजी 

ICICI बँकेचं ‘डिजिटल’ पाऊल: कस्टम ड्युटी ऑनलाईन, घरबसल्या करा पेमेंट!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें