AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वत:चं डिजिटल हेल्थ कार्ड तयार करायचय, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

Digital Health Card | हेल्थ आयडी तयार करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग, घराचा पत्ता इत्यादी तपशील भरावे लागतील. तुम्ही आधार, जन्मतारीख, मोबाईल नंबर किंवा आधार नंबर यांच्या साहाय्याने युनिक हेल्थ आयडी निर्माण करु शकता.

स्वत:चं डिजिटल हेल्थ कार्ड तयार करायचय, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
डिजिटल हेल्थ कार्ड
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Sep 27, 2021 | 2:58 PM
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डिजिटल हेल्थ मिशन (PM-DHM) राष्ट्रीय स्तरावर लाँच केले. पंतप्रधान मोदींनी गेल्यावर्षी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या पायलट प्रोजेक्टची घोषणा केली होती. त्यानंतर सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना राबवण्यात आली. आता आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या (AB PM-JAY) तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) द्वारे आयुष्मान भारत डिजिटल मिशनला राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ झाला आहे.

हेल्थ कार्ड म्हणजे काय?

पंतप्रधान डिजिटल आरोग्य मिशनमध्ये प्रत्येक व्यक्तीला 14 क्रमांकांचा एक युनिक हेल्थ आयडी दिला जाईल. हा क्रमांक संबंधित व्यक्तीला हेल्थ आयडी असेल. व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती राष्ट्रीय आरोग्य आयडीमध्ये दिली जाईल. हेल्थ आयडीच्या मदतीने नागरिकांच्या आरोग्य नोंदी त्यांच्या संमतीने मिळवता येतील.

या कार्डमध्ये संबंधित रुग्णाच्या प्रत्येक चाचणीचा, प्रत्येक आजाराचा तपशील, ज्या डॉक्टरांना ते दाखवण्यात आले आहे, घेतलेली औषधे आणि निदान यासंबंधीची सर्व माहिती उपलब्ध असेल. नवीन ठिकाणी रुग्णावर उपचार करताना ही माहिती अत्यंत उपयोगी ठरेल.

डिजिटल हेल्थ कार्ड कसे मिळवाल?

तुम्ही हेल्थ आयडी पोर्टलवर जाऊन स्वत: नोंदणी करु शकता. अथवा मोबाईलवर आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. त्याठिकाणी तुम्ही स्वत:ची नोंदणी करु शकता. याशिवाय, तुम्ही रुग्णालये आणि सामाजिक स्वास्थ्य केंद्रात जाऊनही तुमचा हेल्थ आयडी तयार करु शकता.

हेल्थ आयडी तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज लागणार?

हेल्थ आयडी तयार करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग, घराचा पत्ता इत्यादी तपशील भरावे लागतील. तुम्ही आधार, जन्मतारीख, मोबाईल नंबर किंवा आधार नंबर यांच्या साहाय्याने युनिक हेल्थ आयडी निर्माण करु शकता.

हेल्थ आयडीसाठी आधारकार्ड अनिवार्य आहे का?

हेल्थ आयडीसाठी आधारकार्ड सक्तीचे नाही. तुम्ही स्वत: मोबाईल नंबर आणि वैयक्तिक तपशील देऊनही हेल्थ आयडी निर्माण करु शकता. तुमचा मोबाईल नंबर आधारकार्डाशी लिंक नसेल तर तुम्ही नजीकच्या रुग्णालयात किंवा संबंधित संस्थेत जाऊन हेल्थ आयडीसाठी नोंदणी करु शकता. हेल्थ आयडी तयार करण्यासाठी तुम्हाला सध्या आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांकाची गरज आहे. मात्र, आगामी काळात पॅनकार्ड, वाहनचालक परवाना आणि अन्य कागदपत्रांचा वापर करुनही हेल्थ आयडी तयार करता येईल.

हेल्थ आयडी तयार करण्यासाठी किती वेळ लागतो?

तुमचा हेल्थ आयडी हा युनिक असेल. त्यामुळे तुम्ही आरोग्याशी संबंधित सर्व तपशील या हेल्थ आयडीशी जोडू शकता. हेल्थ आयडीच्या नोंदणी प्रक्रियेसाठी फक्त 10 मिनिटांचा अवधी लागतो. वैयक्तिक तपशील भरल्यानंतर मोबाईल क्रमांक किंवा आधारकार्डाच्या माध्यमातून तुमची पडताळली केली जाईल.

पासवर्ड विसरल्यास काय कराल?

तुम्ही हेल्थ आयडी पोर्टलवर लॉगीन करताना पासवर्ड विसरलात तर मोबाईलवर मिळणाऱ्या ओटीपीच्या साहाय्यानेही लॉग इन करु शकता. तुम्हाला योजनेचा कारभार न पटल्यास तुम्ही केव्हाही आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) योजनेतून बाहेर पडू शकता. नंतरच्या काळात तुम्ही पुन्हा योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यासाठी हेल्थ आयडी परमनंट आणि टेम्पररी डिलीट करणे, असे दोन पर्याय देण्यात आले आहेत.

हेल्थ आयडी कार्डचा नोंदणी अर्ज कसा भराल?

* सर्वप्रथम https://nha.gov.in/ या संकेतस्थळावर जा. * त्याठिकाणी NDHM ID App वर क्लिक करा. त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्मच्या बटणावर क्लिक केल्यास तुम्हाला फॉर्म दिसू लागेल. * या अर्जात नाव, मोबाईल क्रमांक असे वैयक्तिक तपशील भरा. * त्यानंतर रजिस्टर बटणावर क्लिक करा. * यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल, त्या साहाय्याने व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करा. * त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करा.

संबंधित बातम्या:

आधारकार्डाप्रमाणे तयार होणार तुमचे डिजिटल हेल्थ कार्ड, कशाप्रकारे करणार काम, जाणून घ्या सर्वकाही

Ayushman Bharat Digital Mission: देशभरातील सर्व रुग्णालये जोडणार, प्रत्येकाला हेल्थ आयडी देणार, जाणून घ्या मोदींच्या भाषणातील 10 प्रमुख गोष्टी

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल