AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चलनातील 500, 2000 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये दुपटीने वाढ; ‘अशी’ ओळखा खरी-खोटी नोट

आरबीआयच्या एका रिपोर्टनुसार गेल्या वर्षभरात चलनात पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. तर दोन हजार रुपयांच्या नोटाचे प्रमाण दीडपटीने वाढले आहे.

चलनातील 500, 2000 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये दुपटीने वाढ; 'अशी' ओळखा खरी-खोटी नोट
केवळ 15 वर्षाचा मुलगा कमवतोय लाखों रूपयेImage Credit source: Tv9
| Updated on: May 28, 2022 | 1:22 PM
Share

नवी दिल्ली : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नुकताच एक अहवाल (RBI report) सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार गेल्या एका वर्षात चलनात असलेल्या बनावट पाचशे रुपयांच्या नोटांची (Fake notes) संख्या दुप्पट झाली आहे. तर दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा देखील दीडपटीने वाढल्या आहेत. आरबीआयने आपल्या अहवालामध्ये (report) म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये चलनात असलेल्या खोट्या नोटांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये चलनात असलेल्या 500 रुपयांच्या खोट्या नोटांमध्ये 102 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर 2000 रुपयांच्या नोटांमध्ये 54 टक्क्यांची वाढ झाली आहे. चलनात असलेल्या दहा रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 16.4 टक्के, 20 रुपयांच्या नोटांची संख्या 16.5 टक्के तर 200 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 11.7 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र दुसरीकडे 50 आणि 100 रुपयांच्या बनावट नोटांचे चलनातील प्रमाण घटले आहे.

चलनात सर्वाधिक 500 रुपयांच्या नोटांचा समावेश

किमतीच्या आधारे चलनात पाचशे आणि दोन हजार रुपयांचा हिस्सा हा 87.1 टक्के इतका आहे. हा रिपोर्ट 31 मार्च 2022 च्या आकडेवारीवर आधारित आहे. 31 मार्च 2022 रोजी एकूण चलनात पाचशे आणि हजार रुपयांचा हिस्सा हा 87.1 टक्का इतका होता. यामध्ये पाचशे रुपयांच्या नोटाचा हिस्सा सर्वाधिक म्हणजेच 34.9 टक्के इतका आहे. त्यानंतर दहा रुपयांच्या नोटांचा नंबर लागतो. दहा रुपायांच्या नोटाचा चलनातील हिस्सा 21.3 टक्के इतका आहे. चलनात पचशे रुपयांच्या बनावट नोटांची संख्या दुपटीने वाढल्याने आरबीआयच्या चिंतेत भर पडली आहे.

अशी ओळखा खरी नोट

भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयने पाचशे रुपयांची खरी नोट कशी ओळखावी याबाबत गाईडलाईन्स जारी केली आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार 500 रुपयांच्या नोटेला तुम्ही सरळ पाहिल्यानंतर तुम्हाला देवनागरी भाषेत 500 हा आकडा दिसेल. याशिवाय तुम्हाला मध्यभागी महात्मा गांधी यांचे चित्र दिसेल. त्यामध्ये तुम्हाला सुक्ष्म अक्षरात भारत आणि इंडिया असे लिहिलेले दिसेल. भारत आणि इंडिया जिथे लिहिले आहे, तिथेच तुम्हाला एक सिक्योरिटी थ्रेड दिसेल, तो नोट सरळ धरल्यानंतर हिरवा दिसतो, मात्र तुम्ही नोट टिल्ट केल्यावर या सिक्युरिटी थ्रेडचा रंग हा हिरवा दिसेल या सर्व गोष्टींवरू तुम्ही तुमची नोट खोटी आहे की खरी हे तपासू शकतात.

Follow Us
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन, पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह
बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, पण... राम कदमांची टीका
Video : बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, त्यांच्यानंतर मात्र..., राम कदमांची ठाकरे बंधूंवर टीका
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट..
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक!