AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

E-Rupee UPI Payment : मोठी बातमी, डिजिटल पेमेंट सूसाट! ई-रुपयाने करा UPI Payment

E-Rupee UPI Payment : युपीआय पेमेंटला आता अजून एक सूसाट इंजिन जोडल्या गेले आहे. युपीआय पेमेंटमध्ये हटके प्रयोग सुरु आहे. पेमेंट सुरक्षित आणि झटपट व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारताच्या डिजिटल करन्सीत ई-रुपयात युपीआयद्वारे पेमेंट करता येणार आहे. काय आहे हा प्रयोग?

E-Rupee UPI Payment : मोठी बातमी, डिजिटल पेमेंट सूसाट! ई-रुपयाने करा UPI Payment
| Updated on: Sep 10, 2023 | 5:59 PM
Share

नवी दिल्ली | 10 सप्टेंबर 2023 : भारतातच नाहीतर जगभरात युपीआयचा डंका वाजला आहे. विकसीत देशांना जे जमले नाही, ते भारताने करुन दाखवले आहे. डिजिटल पेमेंट मोडमध्ये (Digital Payment Mode) भारताने क्रांती केली आहे. सुरक्षित आणि झटपट पेमेंट करण्यासाठी भारताने युनिफाईड पेमेंट इंटरफेसची (UPI Payment) निर्मिती केली आहे. त्याआधारे आता गल्ली ते दिल्ली सहज कुठेही समोरच्याला रक्कम पाठवता येते. गल्लीत येणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यापासून ते सेव्हन स्टार हॉटेलपर्यंत सगळीकडे क्यूआर कोडचा जमाना आला आहे. त्यावर स्मार्ट फोनमधील एपच्या माध्यमातून स्कॅन केले तर पेमेंट करता येते. आता या पद्धतीला पण अनेक पर्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भारताने डिजिटल करन्सीवर पण प्रयोग सुरु केला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून हा प्रयोग सुरु आहे. आता ई-रुपयाद्वारे (e Rupee) युपीआय पेमेंट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. काही बँकांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

या बँकांचा पुढाकार

देशातील अनेक मोठ्या बँकांनी ही सुविधा दिली आहे. भारतीय स्टेट बँक (State Bank of India), पंजाब नॅशनल बँक (PNB), HDFC बॅक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा (BOB) या बँकांनी ई-रुपया आधारे युपीआय पेमेंटची सुविधी दिली आहे. त्याला इंटरऑपरेबिलिटी असे नाव देण्यात आले आहे. ही युझर फ्रेंडली सुविधा असल्याचा दावा करण्यात येत आहे. युपीआय क्यूआर कोड स्कॅन करुन (UPI QR Code Scan through Digital Rupee) पेंमेंट करता येणार आहे.

काय आहे ई-रुपया

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प 2022-23 मध्ये ई-रुपया वा डिजिटल रुपया बाजारात उतरवण्याची घोषणा केली होती. म्हणजे आपण खिशात ज्या नोटा ठेवतो, त्याऐवेजी डिजिटल चलनाचा वापर करणे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सेंट्रल बँक ऑफ डिजिटल करन्सीने (CBDC) इलेक्ट्रॉनिक रुपात या चलनाची सुरुवात केली आहे. चलनाचे डिजिटल रुपया ठोक आणि डिजिटल रुपया रिटेल असे दोन प्रकार आहेत. या प्रकारानुसार त्याचा वापर करण्यात येतो.

कसा करतात वापर

  1. सध्या डिजिटल रुपयाचा वापर पथदर्शी प्रकल्पात करण्यात येत आहे.
  2. बँकेने ई-रुपये नेटवर्कच्या माध्यमातून तुम्हाला त्याचा वापर करण्यास निमंत्रण पाठवले असेल तर तुम्ही त्याचा वापर करु शकता.
  3. त्यासाठी ग्राहकांना त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करता येईल.
  4. त्यांना गुगल प्ले स्टोअरवरुन वा Apple iOS मधून डिजिटल रुपया एप डाऊनलोड करावे लागेल.
  5. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी लागेल. ज्या मोबाईलमध्ये एप आहे, त्यातच रजिस्टर मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
  6. त्यानंतर सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट अथवा पिन निवडावा लागेल.
  7. send, collect, load आणि redeem असे चार पर्याय दिसतील.
  8. लोड पर्यायद्वारे खात्यातील रक्कम डिजिटल वॉलेटमध्ये जमा होईल.
  9. तुम्ही पेमेंट करताना ही रक्कम तुमच्या खात्यातून कपात होणार नाही, वॉलेटमधून कपात होईल.
  10. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर युपीआय पेमेंटचा वापर करुन रक्कम पाठवता येईल.

कोणत्या बँकांमध्ये CBDC-UPI इंटरऑपरेबिलिटी सुविधा?

  • बँक ऑफ बड़ौदा (Bank of Baroda)
  • कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank)
  • पंजाब नॅशनल बँक (PNB)
  • एचडीएफसी बँक (HDFC Bank)
  • यस बँक (Yes Bank)
  • एक्सिस बँक (Axis Bank)
  • युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India)
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.