सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी, आठव्या वेतन आयोगात इतका वाढणार पगार?
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाचा फायदा 1.1 कोटी लोकांना होणार आहे. त्यात 44 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत. तसेच 68 लाख पेन्शनर्सधारक आहे. आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना मूळ पगार (बेसिक सॅलरी), भत्ते यांच्यात वाढ होणार आहे.

8th Pay Commission: कोट्यवधी सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांना आठव्या वेतन आयोगाची प्रतिक्षा आहे. आठवा वेतन आयोगात किती पगार वाढणार? यासंदर्भात उत्सुक्ता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा आनंद वाढवणारी बातमी आली आहे. ‘द इकोनॉमिक टाइम्स’च्या रिपोर्टमध्ये आठव्या वेतन आयोगात 30 ते 34 टक्के पगार वाढ होणार असल्याचे म्हटले आहे. त्याचा फायदा 1.1 कोटी लोकांना होणार आहे.
कधीपासून वाढणार वेतन
ब्रोकरेज फर्म एम्बिट कॅपिटलने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, आठव्या वेतन आयोगात पगार आणि पेन्शनमध्ये 30-34 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन वेतन जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी वेतन आयोगाचा अहवाल तयार होईल. तो अहवाल सरकारला पाठवून त्याची मंजुरी घेण्यात येईल. सध्या आठव्या वेतन आयोगाची फक्त घोषणा झाली आहे. आयोगाचा अध्यक्ष कोण असणार? त्याचा कार्यकाळ किती असणार? हे सर्व अजून स्पष्ट झाले नाही.
किती लोकांना होणार फायदा
आठव्या वेतन आयोगाचा फायदा 1.1 कोटी लोकांना होणार आहे. त्यात 44 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत. तसेच 68 लाख पेन्शनर्सधारक आहे. आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना मूळ पगार (बेसिक सॅलरी), भत्ते यांच्यात वाढ होणार आहे.
मागील वेतन आयोगाचा इतिहास पाहिल्यावर पगारात चांगली वाढ दिसून आली. सहावा वेतन आयोग 2006 मध्ये आला होता. त्यात वेतन आणि भत्ते 54% वाढले होते. त्यानंतर 2016 मध्ये सातवा वेतन आयोग आला होता. त्यावेळी बेसिक सॅलरीमध्ये 14.3% आणि इतर भत्ते जोडल्यावर 23 टक्के वाढ झाली होती.
सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात मूळ वेतन, महागाई भत्ता (डीए), घरभाडे भत्ता (एचआरए), वाहतूक भत्ता (टीए) आणि इतर लाभ असतात. काळानुसार मूळ वेतनाचा वाटा एकूण पॅकेजच्या 65% वरून सुमारे 50% पर्यंत कमी झाला आहे. तसेच भत्त्यांचा वाटा आणखी वाढला आहे. या सर्वांची भर घालून मासिक पगार दिला जातो. पेन्शनधारकांसाठीही असेच बदल दिसून येतात. फक्त त्यांना एचआरए किंवा टीए दिले जात नाही.
