EPFO Alert: पीएफ खातेधारकांनो ‘हा’ लाभ हवा असेल तर तात्काळ ई-नॉमिनेशन करा

EPFO | कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांना आता पीएफ, निवृत्तीवेतन आणि विम्याचा ऑनलाईन घेता येणार आहे. यासाठी पीएफधारकांना ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

EPFO Alert: पीएफ खातेधारकांनो 'हा' लाभ हवा असेल तर तात्काळ ई-नॉमिनेशन करा
पीएफ

मुंबई: नोकरदारांसाठी भविष्य निर्वाह निधी (PF) हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. दर महिन्याला नोकरदारांच्या पगारातील ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा होत असते. भविष्यात एखादा आर्थिक अडचणीचा प्रसंग उद्भवल्यास किंवा आयुष्याच्या उतारवयात पीएफ खात्यातील साठवलेले पैसे कामाला येतात.

कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांना आता पीएफ, निवृत्तीवेतन आणि विम्याचा ऑनलाईन घेता येणार आहे. यासाठी पीएफधारकांना ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. EPFOच्या epfindia.gov.in या संकेतस्थळावर लॉग इन करुन तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करु शकता. पीएफधारकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली तर त्यांच्या कुटुंबाला जवळपास सात लाख रुपयांचा लाभ मिळू शकतो.

ई- नॉमिनेशचे काय फायदे?

ई- नॉमिनेशमुळे पीएफधारकांना अनेक फायदे मिळतात. नोकरी सोडल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतर तुम्ही ऑनलाईन क्लेम करु शकता. ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण झालेल्या पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास पीएफ, पेन्शन आणि विम्याचे पैसे सहजपणे वारसदाराला मिळतात. एखाद्या पीएफधारकाचे लग्न झाल्यानंतर वारसदाराची माहिती अपडेट करणे गरजेचे आहे.

ऑनलाईन ई-नॉमिनेशची प्रक्रिया कशी पूर्ण कराल?

* सर्वप्रथम https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकवर जाऊन तुमचे अकाऊंट लॉगिन करावे.
* तुम्ही नॉमिनेशन केले नसेल तर अकाऊंट लॉगिन केल्यानंतर तुम्हाला एक अलर्ट येईल.
* त्यानंतर Manage या पर्यायावर क्लिक करावे. नंतर स्क्रॉलडाऊनमधील e-nomination हा पर्याय निवडावा.
* नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला कुटुंबाविषयीची माहिती विचारली जाईल.
* त्यानंतर तुम्हाला नॉमिनीचा आधार, नाव, जन्मतारीख, बँक अकाऊंट असा तपशील भरावा लागेल.
* त्यानंतर सेव्ह फॅमिली डिटेल्स या पर्यायावर क्लिक करावे. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Save EPF Nomination या पर्यायावर क्लिक करावे.

पीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; जाणून घ्या कसे मिळवाल पैसे?

कोरोना संकटामुळे सध्या अनेकांची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. नोकऱ्या कशाबशा वाचलेले कर्मचारीही वाढीव खर्चामुळे मेटाकुटीस आले आहेत. अशावेळी कोरोना किंवा अन्य कोणत्या आजारामुळे रुग्णालयात दाखल व्हायची वेळ आली तर हा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न उभा राहतो. यासाठी आता भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून आली आहे. त्यामुळे पीएफधारक कोणत्याही कागदपत्रांशिवाय आपल्या खात्यातून एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतो.

संबंधित बातम्या:

PF withdrawal rule: पीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; जाणून घ्या कसे मिळवाल पैसे?

PF मधून पैसे काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आधार-पॅन, असे करा अपडेट

आता यूएएनशिवाय जाणून घ्या पीएफ खात्यातील शिल्लक, ही आहे स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI