AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO : ई-नॉमिनेशन न केल्यास असा होईल तोटा

केंद्र सरकारने ई-नॉमिनेशन करणे अत्यावश्यक केले आहे. यापूर्वी वारसाची नोंदणी करण्याची गरज नव्हती. परंतू, आता ई-नॉमिनेशन शिवाय गत्यंतर नाही. तुम्हाला ईपीएफ खात्यात वारसदाराचे नाव नोंद करावे लागेल. ईपीएफमध्ये कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला वारस म्हणून नेमता येते.

EPFO : ई-नॉमिनेशन न केल्यास असा होईल तोटा
केंद्र सरकारने ई-नॉमिनेशन करणे अत्यावश्यक केले आहे. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 23, 2022 | 8:42 AM
Share

आता 31 मार्चच्या अगोदर तुमच्या प्रोव्हिडंट फंडात (Providend Fund) कुुटुंबातील सदस्याची वारसदार (Nominee) म्हणून नोंद करणे आवश्यक आहे. यापूर्वी दोन वेळा वारस नोंदणीला मुदत वाढ देण्यात आली होती. आता वारददाराची नोंद न केल्यास पुन्हा संधी देण्यात येणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ई-नॉमिनेशनसाठी (E-Nomination) 31 मार्च ही शेवटची तारीख ठेवली आहे. जर खातेदाराने ही संधी गमावली तर त्याला अनेक महत्वाच्या सुविधांपासून वंचित रहावे लागेल.

ईपीएफ खाते ज्या उद्देशाने सुरु करण्यात आले आहे. तोच उद्देश पूर्ण होत नसेल तर त्याचा फायदा काय. त्यामुळे तुम्ही मुदतीपूर्वीच म्हणजे 31 मार्चपूर्वीच तुमच्या खात्यात ई-नॉमिनेशन पूर्ण करा. ई-नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण न केल्यास काय नुकसान होऊ शकते, याची माहिती ईपीएफओने दिली आहे. ई-नॉमिनेशन करतात, त्याची प्रक्रिया काय आहे, याची माहिती आणि ई-नॉमिनेशन न केल्यास काय नुकसान होऊ शकते, याची माहिती आपण घेऊयात.

वारसदार जोडण्याची प्रक्रिया

  1. ईपीएफओच्या www.epfindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या
  2. त्यानंतर ‘Service’ हा पर्याय निवडा
  3. पुढे ‘For Employees’ या पर्यायवर क्लिक करा
  4. आता तुमचा UAN हा क्रमांक तयार ठेवा. सॅलरी स्लीप (Salary Slip) वरही हा क्रमांक असतो.
  5. ‘Member UAN/Online Service (OCS/OTCP)’ येथे क्लिक करुन तुम्ही लॉगिन करा
  6. नॉमिनी जोडण्यासाठी ‘Manage’ पर्याय निवडा
  7. त्यात ‘E-Nomination’ पर्याय निवडून पुढील प्रक्रिया करा
  8. family declaration या पर्यायावर या
  9. ‘Add Family Details’ संपूर्ण कुटुंबाची माहिती काळजीपूर्वक, विचारपूर्वक भरा
  10. ‘Nomination Details’ हा कॉलम तर अधिक काळजीपूर्वक भरा
  11. ‘Save EPF Nomination’ हा पर्याय अंतिम टप्प्यातील आहे. सर्व माहिती भरुन झाल्यानंतर हा पर्याय समोर येतो.
  12. ‘E-sign’ निवडीनंतर ओटीपी (OTP) येईल.
  13. हा ओटीपी आधार कार्डशी लिंक असेल.
  14. ओटीपी क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या नॉमिनीचे रजिस्ट्रेशन पूर्ण होते.

चला तर आता नुकसान काय होईल ते पाहुयात…

EPFO नुसार, तुम्ही वारसदाराचे नाव जोडले नसेल तर पीएफ रक्कम खात्यात अडकू शकते

खातेदाराने ई-नॉमिनेशन फॉर्म भरला नसेल तर खातेधारक पीएफ खात्यातून रक्कम काढू शकणार नाही.

दावा दाखल करण्यापूर्वी ई-नॉमिनेशन करणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास दाव्याचा ही निपटारा (Claim Settlement) होणार नाही.

आणि मग वकिलाची मदत घेऊन न्यायालयात दावा दाखल करावा लागेल. त्यात पैसा आणि वेळ वाया जाईल आणि मनस्ताप होईल तो वेगळा.

खात्यातील शिल्लकी तपासता येणार नाही

ई-नॉमिनेशन न केल्यास पीएफ खात्यातून रक्कम काढण्याची गोष्ट दूरच राहिली, तुम्हाला पासबूकमध्ये किती रक्कम शिल्लक आहे, हे तपासता येणार नाही. पीएफ खात्याचे विवरणपत्र बघता येणार नाही. त्यामुळे 31 मार्चपूर्वी तुम्ही ई-नॉमिनेशन पूर्ण करुन घ्या.

संबंधित बातम्या : 

सोन्यात गुंतवणुकीचा विचार करताय? तर मग या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करु नका, या तीन ठिकाणची गुंतवणूक ठरु शकते फायद्याची

Bank holidays : बँकांशी संबंधित कामे पटापट पूर्ण करा; एप्रिल महिन्यात तब्बल 15 दिवस बँकांना सुटी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.