AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO: PF अकाऊंटशी आधार लिंक करणे गरजेचे, जर केले नसेल तर होईल नुकसान

EPFO ने आता आधारशी जुळलेली माहिती बदल्यासाठी जॉईंट डिक्लरेशनला आणखी सोपे करण्यात आले आहे. आतापर्यंत आधार लिंक झालेले नाहीए, वा ज्यांचा आधार अपडेट करायचे आहे, ते या सोप्या प्रक्रियेने हे करु शकतात.

EPFO: PF अकाऊंटशी आधार लिंक करणे गरजेचे, जर केले नसेल तर होईल नुकसान
EPFO AADHAR LINK
| Updated on: Aug 14, 2025 | 3:51 PM
Share

आपल्या पीएफ अकाऊंटशी आधार लिंक करणे गरजेचे आहे.युनिव्हर्सल अकाऊंट नंबर ( UAN )सोबत आधार लिंक करण्याचा हेतू हा आहे की व्यक्ती काम करत असलेल्या कंपनीच्या अनुमती शिवाय पीएफशी संबंधीत सुविधा कर्मचाऱ्यांना मिळावी. जर सदस्य कर्मचाऱ्याचा आधार UIDAI शी व्हेरीफाय झाला असेल तर तो स्वत:आपले प्रोफाईल अपडेट करु शकतो. परंतू ज्यांचा आधार लिंक किंवा व्हेरीफाईड झालेले नाही त्यांना बदलासाठी Employer किंवा EPFO कडून मंजूरी घ्यावी लागेल.

EPFO ने 13 ऑगस्ट 2025 पासून सुरु केली सुविधा

जर UAN मध्ये नावाची नोंद, जेंडर आणि जन्मतारीख, आधारमध्ये नोंदवलेल्या माहिती तंतोतंत जुळली तर सदस्य आपल्या कंपनी (Employer) कडे जाऊन आधारला UAN शी लिंक करु शकतो. यासाठी एम्पॉयलरच्या पोर्टलवर उपलब्ध KYC फिचरचा वापर केला जाईल आणि EPFO कडून स्वतंत्र मंजूरी घेण्याची गरज लागणार नाही. आधी नाव, जेंडर वा जन्मतिथीशी जराही बदल असेल तर अनेक पातळ्यांवर मंजूरी आणि कागदोपत्री प्रक्रीयेला सामोरे जावे लागत होते.

UAN का आहे?

UAN एक 12 आकड्यांचा यूनिक नंबर आहे, ज्यास EPFO (कर्मचारी भविष्य निधी संघटना) देते. हा क्रमांक नोकरी बदलली तरी कायम राहातो.

आधार अपडेटसाठी जॉईंट डिक्लरेशन (JD)

EPFO ने आता आधारशी संबंधित माहिती बदलण्यासाठी जॉईंट डिक्लरेशन प्रक्रियेला आणखी सोपे केले आहे. आता ज्यांचा आधारलिंक नाही, वा ज्यांचा आधार अपडेट करायचे आहे. ते आता नवीन सोप्या पद्धतीने हे करु शकतात. जर आधार आणि युएएनमध्ये नाव, जेंडर वा जन्मतारीखमध्ये फरक असेल तर एम्प्लॉयर जॉईंट डिक्लरेशन फॉर्मद्वारे बदलासाठी रिक्वेस्ट करु शकतो.

आधारमध्ये दुरुस्ती

जर युएएनसोबत ( UAN ) चुकीने चुकीचे आधार लिंक झाले असेल तर एम्प्लॉयर योग्य आधार क्रमांक जॉईंट डिक्लरेशन फॉर्म भरुन ऑनलाईन पाठवू शकतो, ज्यास अधिकारी मंजूर करतील.

बंद कंपनी वा एम्प्लॉयर उपलब्ध नसल्यावर

जर एम्प्लॉयर उपलब्ध नसेल वा कंपनी बंद झाली असेल कर तो सदस्य संबंधित EPFO रीजनल ऑफिसच्या PRO काऊंटरवर फिजिकल जॉईंट डिक्लरेशन फॉर्म भरु शकतो. या फॉर्मवर कोणा अधिकृत व्यक्तीचे सही गरजेची आहे. तपासानंतर PRO हा रिक्वेस्ट सिस्टीममध्ये घालू शकतो

UMANG एपने आधारला UAN शी लिंक कसे कराल ?

UMANG एप खोलून आपला UAN नंबर टाकावा

UAN शी रजिस्टर्ड मोबाईलवर OTP येईल

OTP व्हेरीफाय केल्यानंतर आधार डिटेल भरावेत

आधारशी रजिस्टर्ड मोबाईल आणि ईमेलवर दूसरा OTP येईल

OTP व्हेरीफाय होताच हा आधार UAN शी लिंक होईल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.