AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी केंद्र सरकार 6 कोटी नोकरदारांच्या खात्यात जमा करणार पैसे

PF | या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी पीएफवरील वाढीव व्याजदर आणि महागाई भत्ता (DA) असा दुहेरी फायदा मिळेल. त्यामुळे आता केंद्रीय अर्थमंत्रालय हे पैसे नोकदरात आणि पेन्शनधारकांच्या खात्यात जमा करण्यासाठी हिरवा कंदील कधी दाखवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी केंद्र सरकार 6 कोटी नोकरदारांच्या खात्यात जमा करणार पैसे
पीएफ
| Edited By: | Updated on: Sep 06, 2021 | 9:49 AM
Share

नवी दिल्ली: नोकरदारांच्यादृष्टीने भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. दर महिन्याला या खात्यात नोकरदार आणि त्यांच्या कंपनीकडून ठराविक रक्कम जमा केली जाते. ही रक्कम नोकरदारांच्या उतारवयातील आधार मानला जातो. गेल्या बऱ्याच दिवसांपासून नोकरदारांच्या पीएफ खात्यात वाढीव व्याजदराचे पैसे जमा होणार असल्याची चर्चा आहे. (PF interest will be credited into account before Diwali 2021)

ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे समजते. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) दिवाळीपूर्वी नोकरदारांच्या खात्यात वाढीव व्याजदराचे पैसे जमा करेल, असा अंदाज आहे. या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी EPFO केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून परवानगी मिळण्याची वाट पाहत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी पीएफवरील वाढीव व्याजदर आणि महागाई भत्ता (DA) असा दुहेरी फायदा मिळेल. त्यामुळे आता केंद्रीय अर्थमंत्रालय हे पैसे नोकदरात आणि पेन्शनधारकांच्या खात्यात जमा करण्यासाठी हिरवा कंदील कधी दाखवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

गेल्या सात वर्षातील सर्वाधिक कमी व्याजदर

गेल्यावर्षी देशात कोरोनाची साथ आल्यानंतर EPFO कडून पीएफ खात्यावरील व्याजदर 8.5 टक्क्यांपर्यंत घटवण्यात आला होता. हा गेल्या सात वर्षातील सर्वाधिक कमी व्याजदर ठरला होता. यापूर्वी 208-19 या आर्थिक वर्षात पीएफ खात्याचा व्याजदर 8.65 टक्के इतका होता. तर 2017-18 मध्ये हा व्याजदर 8.55 टक्के इतका होता.

पीएफ खात्यामधील बॅलन्स कसा चेक कराल?

तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा झाले आहेत हे माहिती करुन घेणं अगदी सोपं आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन एक कॉल किंवा मेसेज करावा लागेल. आपल्या नोंदणीकृत मोबईल नंबरवरुन “EPFOHO UAN” टाईप करुन 7738299899 या नंबरवर पाठवा. ही सुविधा 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये इंग्रजी आधी निवडलेली भाषा असते. याशिवाय मराठी, हिंदी, पंजाबी, तमिळ, मल्यालम, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगू, बंगाली भाषांचा समावेश आहे.

आपल्या मातृभाषेत माहिती मिळवण्यासाठी हे करा

तुम्हाला तुमच्या प्रादेशिक भाषेमध्ये माहिती हवी असेल तर त्यासाठी नोंदणीकृत मोबाईलनंबरवरुन EPFOHO UAN टाईप करुन आपल्या भाषेतील पहिले तीन अक्षरं टाईप करा. उदाहरणार्थ मराठीत माहिती हवी असेल तर EPFOHO UAN MAR टाईप करुन 7738299899 नंबरवर पाठवा.

मिसकॉल देऊन पीएफ बॅलन्स कसा माहिती करणार?

तुम्हाला आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन मिसकॉल देऊनही पीएफ खात्याचा बॅलन्स चेक करता येतो. आपल्या मोबाईलवरुन 011-22901406 या नंबरवर कॉल करा. दोन रिंग वाजल्या की तुमचा फोन आपोआप कट होईल. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.

UMANG अॅपच्या मदतीने बॅलन्स चेक करा

याशिवाय UMANG अॅपचा वापर करुनही प्रोविडेंट फंडाचा बॅलन्स चेक करता येतो. यासाठी तुम्हाला अॅम्पॉयी-सेंट्रिक सर्विसवर (employee-centric services) क्लिक करावं लागतं. यानंतर व्यू पासबुकवर क्लिक करा. येथे तुमचा यूएएन नंबर आणि OTP टाकून बॅलन्स चेक करा.

हेही वाचा :

1 महिन्यापासून नोकरी नसेल तर पीएफचे हे पैसे उपयोगी येतील, किती पैसे काढता येणार?

कोरोना काळात PF अकाउंटमधून पैसे काढता येतील, तीन दिवसात पैसे मिळतील, पण कसे? ते वाचा

नोकरदारांसाठी मोठी बातमी, पगारातील प्रस्तावित बदल टळला, सरकारचा निर्णय काय?

(PF interest will be credited into account before Diwali 2021)

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.