ITR File : करदात्यांसाठी महत्वाची अपडेट! आयटीआर फाईल करण्यासाठी Form 16 ची गरज नाही

ITR File : करदात्यांसाठी मोठी अपडेट आली आहे. आयटीआर फाईल करण्यासाठी त्यांना Form 16 ची गरज नाही.

ITR File : करदात्यांसाठी महत्वाची अपडेट! आयटीआर फाईल करण्यासाठी Form 16 ची गरज नाही
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 5:12 PM

नवी दिल्ली : आयकर रिटर्न (ITR Return) दाखल करणे हे भारतीय नागरिकाचं महत्वपूर्ण कार्य आहे. देशातील कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 चा टॅक्स रिटर्न दाखल करण्याचा महत्वाचा भाग आहे. फॉर्म 16 हा कंपनी, नियोक्ता कर्मचाऱ्यांना देते. फॉर्म 16 मध्ये कमाई आणि कर कपातीचा लेखाजोखा असतो. कधी-कधी काही कंपन्या कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 देण्यासाठी वेळ लावू शकतात. पण या कागदपत्रासाठी करदात्यांना टॅक्स रिटर्न भरण्यासाठी थांबविण्यात येऊ नये, असे धोरण आहे. करदात्यांसाठी मोठी अपडेट आहे. त्यांना विना Form 16 टॅक्स रिटर्न भरता येईल.

विना Form 16 दाखल करा ITR कर भरण्यासाठी फॉर्म 16 कंपनीने दिला नसेल तर, विना फॉर्म 16 पण आयटीआर दाखल करता येईल. कर्मचाऱ्याला पगार पत्रक(Salary Slip), बँकेचा तपशील, व्याज प्रमाणपत्र, किरायाचे कागदपत्र अशी कागदपत्रे दाखल करुन आयटीआर दाखल करता येईल. या कागदपत्रांआधारे तुम्हाला एकूण किती महसूल मिळाला याचा तपशील मांडता येईल. आर्थिक वर्षातील सर्व कमाईची माहिती सविस्तरपणे मांडावी लागेल.

कर सवलतीची तरतूद भारतीय आयकर अधिनियमानुसार, करदात्यांना कर कपात आणि सवलती मिळतात. या सवलतींमध्ये विमा हप्ता, भविष्य निधीतील योगदान, गृहकर्जावरील हप्ता आणि इतर सवलतींचा समावेश आहे. कर सवलत मिळविण्यासंबंधीची माहिती आयकर विभागाच्या वेबसाईटवर मिळेल.

हे सुद्धा वाचा

ऑनलाईन मिळेल फॉर्म 26एएस फॉर्म 26एएस हा आयकर विभागाच्या ई-फायलिंग संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या फॉर्ममध्ये टॅक्स क्रेडिट आणि हा कर अदा करण्याची सविस्तर माहिती देता येते. कर्मचारी आणि इतर संस्था यांनी कपात केलेल्या करांचा पडताळा करा, त्याची सत्यता तपासा. योग्य माहिती जमा करा.

पोर्टलचा वापर करा टॅक्स रिटर्न फाईल करण्यसााठी आयकर विभागाच्या संकेतस्थळाचा वापर करता. ऑनलाईन टॅक्स फायलिंग पोर्टलाचा वापर करता येईल. ग्राहकांच्या अनुकूल इंटरफेस फॉर्म भरण्याची प्रक्रिया असल्याने ऑनलाईन आयटीआर भरताना अडचणी येणार नाहीत.

अंतिम मुदत काय प्राप्तिकर विभागाने 25 एप्रिल 2023 रोजी आयटीआर फॉर्म 1 आणि 4 साठी ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध करुन दिले आहे. तुम्ही संकेतस्थळावरुन ते डाऊनलोड करुन घेऊ शकता. आर्थिक वर्ष 2022-23 साठी ज्या करदात्यांच्या खात्याचे ऑडिट करण्याची गरज नाही, त्यांच्यासाठी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. त्यानंतर फॉर्म भरल्यास दंड भरावा लागेल.

कोणासाठी कोणता फॉर्म आयटीआर फॉर्म 1 हा नोकरदार,ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी आहे. तर आयटीआर फॉर्म 4 हा कंपन्या आणि व्यावसायिकांसाठी आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही, त्यांच्यासाठी हा अर्ज आहे.

महत्वपूर्ण कागदपत्रे

  • सॅलरी स्लिप, बँकचे विवरण
  • गुंतवणुकीसंबंधीचे दस्तावेज
  • आयटीआरच्या अर्जाची एक कॉपी
  • करदात्यांना सीएची मदत घेता येईल

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.