AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UAN Number News | UAN क्रमांक विसरलात ? या सोप्या पद्धतीने पुन्हा मिळवा तुमचा युनिव्हर्सल नंबर

AN Number News | UAN क्रमांक विसरलात ? तर मग या सोप्या पद्धतीने तो परत मिळवता येतो, जाणून घ्या ही पद्धत

UAN Number News | UAN क्रमांक विसरलात ? या सोप्या पद्धतीने पुन्हा मिळवा तुमचा युनिव्हर्सल नंबर
UAN क्रमांक मिळवाImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 07, 2022 | 7:34 PM
Share

UAN Number News | पगारदार व्यक्तीसाठी (Salaried Person) आधार कार्ड, पॅन कार्ड इतकाच युनिव्हर्सल अकाऊंट क्रमांक (Universal Account Number-UAN) महत्वाचा आहे. या 12 आकडी क्रमांकावरच त्याच्या बचतीचा ताळमेळ असतो. कंपनीसह त्याच्या मेहनतान्यातून भविष्य निर्वाह निधीची अर्थात पीएफची (PF) रक्कम वळती करण्यात येते. तो जोपर्यंत नोकरी करतो, तोपर्यंत एक निश्चित रक्कम या खात्यात जमा होते. त्यावर सरकार चांगले व्याज ही देते. त्यामुळे या खात्याची किल्ली असलेला UAN क्रमांक अत्यंत आवश्यक असतो. हा क्रमांक कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा (EPF) एक आवश्यक भाग बनला आहे. यूएएनच्या माध्यमातून तुम्ही तुमचं पीएफ खातं ऑनलाईन वापरु शकता. UAN च्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या खात्यातील बॅलन्स कळते. खात्यातील ठराविक रक्कम काढता येते. त्यासाठी सर्व प्रक्रिया ही UAN क्रमांकाच्या आधारे करता येते. UAN हा ईपीएफओने (EPFO) जारी केलेला 12 अंकी क्रमांक आहे. आता हा क्रमांक तुम्ही विसरलात तर तो कसा मिळवायचा? तर एक साधी सोपी पद्धत आहे. ज्याद्वारे तुम्ही तुमचा UAN क्रमांक सहज मिळवू शकता. काय आहे ती पद्धत, चला पाहुयात

UAN च्या माध्यमातून ही कामे करा

UAN क्रमांक हा तुमच्या नोकरीचा एक अविभाज्य भाग आहे. तुम्ही किती ही नोकऱ्या बदला, पण हा क्रमांक तुमच्यासाठी कायम राहणार आहे. प्रत्येक नोकरीच्या ठिकाणी हा क्रमांक एकच राहिल, खाते भले ही बदलेल. UANच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाइन पीएफ ट्रान्सफर, बॅलन्स चेक आणि पैसे काढण्याची सुविधा मिळते. या UAN मध्ये तुमची सर्व जुनी आणि नवी खाती दिसतात. ही खाती विलीन सुद्धा करता येतात. त्यामुळे एकत्रित रक्कम होऊन त्यावर सध्याच्या दरानुसार तुम्हाला भरमसाठ व्याज मिळेल.  तसेच एकत्रित रक्कम ही पाहता येईल.

ही आहे सोपी पद्धत

सर्वात आधी तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत पोर्टलला https://epfindia.gov.in/site_en/ भेट द्या. Services पर्यायावर क्लिक करा त्यानंतर For Employees वर क्लिक करा. आता Member UAN/online Services वर क्लिक करा त्यानंतर UAN पोर्टलवर जा. याठिकाणी तुम्हाला मोबाईल क्रमांक आणि PF Member ID टाकावा लागेल Get Authorization PIN वर क्लिक करा PIN क्रमांक तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकवर पाठवण्यात येईल आता OTP टाका Validate OTP टाकून क्लिक करा तुमचा UAN क्रमांक मिळेल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.