रेल्वे प्रवासाचे तिकीट बुक करताना फक्त हे बटण क्लिक करा आणि मिळवा AC सीट, जाणून घ्या कसं आणि कुठे?
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक अशी खास योजना सुरू केली आहे, ज्यामुळे तुमचं सामान्य तिकीट कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय थेट उच्च श्रेणीमध्ये म्हणजेच स्लीपरमधून थेट थर्ड एसी किंवा सेकंड एसीमध्ये अपग्रेड होऊ शकतं.

भारतामध्ये दररोज कोट्यवधी लोक ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करतात. लांब पल्ल्याचा प्रवास करताना प्रत्येकाची इच्छा असते की प्रवास आरामदायक, स्वच्छ आणि थकवाविरहित व्हावा. यासाठी अनेक प्रवासी एसी कोचचे तिकीट बुक करतात. मात्र, कधी कधी तिकीट स्लीपर क्लासमध्ये घेतल्यावरही तुम्हाला AC कोचमध्ये विनामूल्य अपग्रेड मिळू शकतो होय, तेही अतिरिक्त पैसा न देता!
भारतीय रेल्वेने यासाठी खास ‘फ्री अपग्रेडेशन स्कीम’ सुरू केली आहे. मात्र, या सुविधेचा लाभ सर्वांना मिळतोच असं नाही. यामध्ये काही अटी असून, केवळ ऑनलाइन तिकीट बुकिंग करणाऱ्यांनाच या सुविधेचा लाभ मिळतो.
कसा मिळतो अपग्रेडेशनचा लाभ?
जर तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा मोबाईल अॅपवरून तिकीट बुक करता, तर तिथे एक पर्याय दिसतो “क्या आप मुफ्त अपग्रेडेशन के लिए इच्छुक हैं?” जर तुम्ही या पर्यायावर ‘हो’ क्लिक करता, तर तुमच्या तिकीटच्या श्रेणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण होते.
उदाहरणार्थ, तुम्ही स्लीपर क्लासमध्ये तिकीट घेतलं आहे, आणि त्याच ट्रेनमध्ये थर्ड एसीमध्ये सीट्स रिकाम्या असतील, तर रेल्वे तुमचं तिकीट ऑटोमॅटिकरी त्या उच्च श्रेणीत अपग्रेड करते. यासाठी कुठलाही अतिरिक्त शुल्क लागत नाही. मात्र, ही सेवा पूर्णपणे सिस्टमद्वारे नियंत्रित केली जाते आणि याची शंभर टक्के हमी दिली जात नाही.
ही प्रक्रिया कशी होते?
रेल्वेचा PRS (Passenger Reservation System) चार्ट तयार झाल्यानंतर तिकीट अपग्रेडेशनचं काम सुरू करतं. जर ट्रेनमध्ये उच्च श्रेणीतील काही सीट्स रिकाम्या असतील, तर सिस्टम त्या प्रवाश्यांना प्राधान्याने अपग्रेड करते ज्यांनी ‘फ्री अपग्रेडेशन’चा पर्याय निवडलेला असतो. ही एक प्रामुख्याने लकी-ड्रॉ पद्धतीवर आधारित प्रक्रिया असते.
कोणते प्रवासी पात्र?
1. फक्त ऑनलाइन तिकीट बुकिंग करणारे प्रवासी.
2. तिकीट बुक करताना अपग्रेडेशनसाठी ‘हो’ निवडणारे.
3. ट्रेनमध्ये उच्च श्रेणीतील रिक्त सीट्स असणं आवश्यक.
याचा फायदा का घ्यावा?
‘फ्री अपग्रेडेशन’ स्कीमचा फायदा घेण्यामागे मुख्य उद्देश म्हणजे अधिक चांगल्या सुविधा मिळवणे तेही कोणताही अतिरिक्त खर्च न करता. जर तुम्ही स्लीपर क्लासमध्ये तिकीट बुक केलं असेल आणि ट्रेनमध्ये उच्च श्रेणीतील म्हणजेच थर्ड एसी किंवा दुसऱ्या कोचमध्ये रिकामी सीट उपलब्ध असेल, तर तुमचं तिकीट त्या श्रेणीत अपग्रेड होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला एसी कोचचा आराम, स्वच्छता आणि शांतता याचा अनुभव घेता येतो. लांब पल्ल्याच्या प्रवासात ही सुविधा खूपच उपयोगी ठरते आणि कोणतीही अतिरिक्त रक्कम न भरता दर्जेदार सेवा मिळते, यामुळे हा पर्याय निवडणं फायद्याचं ठरतं.
शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा
ही सुविधा गॅरंटी नसली तरी ‘प्रयत्नातच यश’ असं मानून पुढील वेळी तुम्ही IRCTC वरून तिकीट बुक करताना ‘फ्री अपग्रेडेशन’चा पर्याय नक्की निवडा. कदाचित पुढचं प्रवास तुमचं AC कोचमध्ये आरामात होईल तेही कोणतीही अतिरिक्त किंमत न देता!
