AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जाहीर, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

Petrol Diesel | पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी सकाळी जाहीर केलेल्या दरांनुसार, दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 103.97 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 आणि 94.14 रुपये प्रतिलीटर इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.

Petrol Diesel Price:  पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जाहीर, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
झारखंडमध्ये पेट्रोलचे दर 25 रुपयांनी घटवले
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Nov 14, 2021 | 8:10 AM
Share

नवी दिल्ली: देशातील पेट्रोलियम कंपन्यांकडून सामान्य नागरिकांना पुन्हा एकदा दिलासा देण्यात आला आहे. रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर आहेत.

पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी सकाळी जाहीर केलेल्या दरांनुसार, दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 103.97 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 आणि 94.14 रुपये प्रतिलीटर इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.

खनिज तेलाच्या भावात घसरण

आंतरराष्‍ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात पुन्हा घसरण होताना दिसत आहे. इंधन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमतीत शनिवारीही घसरण दिसून आली. कच्च्या तेलाचा वापर फक्त पेट्रोल आणि डिझेल बनवण्यासाठीच नाही तर इतर अनेक उत्पादनांसाठी केला जातो. त्यामुळे खनिज तेलाच्या किंमतीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर कमी होत असूनही भारतात मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विशेष कपात झालेली नाही.

महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करामध्ये कपात केल्यानंतर आता महाराष्ट्रातही इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून पेट्रोलच्या दरात दोन रुपयांची कपात केली जाऊ शकते. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती कपात होणार, याचे चित्र स्पष्ट होईल. इंधन दरात कपात झाल्यास राज्यातील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

यापूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 5 रुपये आणि 10 रुपयांची कपात केली होती. त्यानंतर अनेक राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी करत आपापल्या राज्यातील जनतेला आणखी स्वस्तात इंधन उपलब्ध करुन दिले होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारही इंधन दरकपातीचा निर्णय कधी घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

संबंधित बातम्या:

इलेक्ट्रिक वाहन मालकांचं टेन्शन कमी होणार, BPCL 7000 पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार

मोठी बातमी: महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता, उद्धव ठाकरे आणि अजित पवारांची महत्त्वाची बैठक

Petrol Diesel Price: आजपासून पंजाबमध्ये पेट्रोल 10 आणि डिझेल 5 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

Follow Us
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील.
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल....
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल.....
खरात आधीच गुवाहाटीतील हॉटेलमध्ये... रुपाली चाकणकरांनी स्वतःच सांगितलं
खरात आधीच गुवाहाटीतील हॉटेलमध्ये... रुपाली चाकणकरांनी स्वतःच सांगितलं.
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा....
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा.....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर.....
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....