Short Term Loan | अल्प मुदतीचे कर्ज मिळवा झटपट! इतके मोजावे लागेल व्याज, काय आहे प्रक्रिया?

Short Term Loan | अल्प मुदतीचे कर्ज हवय, व्याज किती मोजावे लागेल, चला तर जाणून घेऊयात

Short Term Loan | अल्प मुदतीचे कर्ज मिळवा झटपट! इतके मोजावे लागेल व्याज, काय आहे प्रक्रिया?
झटपट मिळवा कर्जImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 7:00 AM

Short Term Loan | गरजा भागवण्यासाठी कर्ज (Loan) घेण्याकडे अनेकांचा सध्या कल असतो. घरातील छोटे मोठे कार्य, कार्यक्रम असो वा अत्यावश्यक खर्च मध्येच येऊन टपकला तर त्वरीत कर्ज (Instant Loan) मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतो. हातउसणे भेटले नाही तर अल्पमुदत कर्जासाठी (Short Term Loan) सर्व जण प्रयत्न करतात. 6 महिन्यांचे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) हे देखील अल्प मुदतीचे कर्ज आहे. त्याची संपूर्ण परतफेड 6 महिन्यांत करावी लागते. तुम्हाला तातडीने पैशांची गरज असल्यास, अशा अनेक बँका आहेत ज्या 6 महिन्यांचे अल्प मुदतीचे कर्ज देतात. या कर्जाचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी कागदपत्रांच्याआधारे (Documents) हे कर्ज मंजूर होते. कर्ज मंजुरीची प्रक्रिया ही अगदी पटकन होत असल्याने तुमच्या खात्यात झटपट रक्कम येऊन पडते. 6 महिन्यांचे अल्प मुदतीचे कर्ज कसे घ्यावे आणि या कर्जाचे व्याज काय असेल ते जाणून घेऊयात.

तारण देण्याची गरजच काय

या कर्जाचे वैशिष्ट्य म्हणजे हे कर्ज तारणमुक्त आहे. कर्जासाठी तुम्हाला कुठलीही अनामत रक्कमही द्यावी लागत नाही. अथवा तारण म्हणून कोणतीही वस्तू, मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नसते. पण या सुविधेचा दंडम ही सहन करावा लागतो. तारण न घेतल्याने या कर्जावर ज्यादा व्याजदर मोजावा लागतो. त्यामुळे हे कर्ज महाग मिळते. अल्प मुदतीच्या कर्जामध्ये, किमान 1,000 आणि कमाल 5 लाखांचे कर्ज घेता येते. अल्प मुदतीच्या कर्जाचा कालावधी 7 दिवसांपासून ते 180 दिवसांपर्यंत असतो. म्हणजेच कर्ज मंजूर झाल्यापासून 7 दिवस ते 180 दिवसांच्या आत पैसे परत करता येतात.

हे सुद्धा वाचा

भावा व्याज किती मोजावे लागेल?

अॅक्सिस बँक 10.25 टक्के दराने अल्प मुदतीचे कर्ज देते. याशिवाय SBI 10 ते 13.75 टक्के, इंडिया बुल्स धनी 13.99 टक्क्यांहून अधिक, HSBC बँक 9.50 ते 15.25 टक्के, होम क्रेडिट दरमहा 2 टक्के दराने व्याज आकारते. याशिवाय MoneyTap दरमहा 1.08 टक्के किंवा 13%, Stashfin 11.99 टक्के, Faircent 36%, CreditB 0.2-49 टक्के प्रति महिना, Moneyview 15.96 टक्क्यांपेक्षा जास्त, Pay Sense 16.80 टक्के आणि Cashi 27 टक्क्यांपेक्षा जास्त शुल्क आकारते. paisabazaar संकेतस्थळावरुन व्याजदाराची ही आकडेवारी गोळा केलेली आहे.

हा नियम माहिती आहे का?

ज्या व्यक्तीचे बँकेत खाते आहे केवळ तीच व्यक्ती अल्प मुदतीच्या कर्जासाठी (short term loan) अर्ज करू शकते. कर्ज मिळण्यासाठी किमान सहा महिने सक्रिय असणे आवश्यक आहे. ज्या अर्जदाराकडे उत्पन्नाचा नियमित स्रोत आहे, त्याला कर्ज मिळते. म्हणजे वेतनधारी अथवा पगारदार असेल तर तो या कर्जासाठी पात्र ठरतो. खासगी अथवा सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अल्प मुदतीचे कर्ज मिळते. अर्जदाराने यापूर्वी कोणतेही कर्ज चुकविलेले नसावे, हा नियम ही महत्वाचा आहे. अटींची पूर्तता करणाऱ्या व्यक्तीला झटपट कर्ज मिळते.

हे कर्ज देण्यासाठी बँका किंवा NBFC ग्राहकांकडून कोणत्याही तारण किंवा सुरक्षिततेची मागणी करत नाहीत. जर अचानक पैशाची गरज भासली किंवा मोठी खरेदी झाली तर 6 महिन्यांचे अल्प मुदतीचे कर्ज सहज घेता येते. या कर्जामुळे छोटे-मोठे खर्च सहज सुटतात. या कर्जावर प्रक्रिया करण्यात कोणतीही अडचण येत नाही आणि प्रक्रियेसाठी जास्त कागदपत्रांची ही आवश्यकता पडत नाही. बँका किंवा NBFC 6 महिन्यांचे अल्प मुदतीचे कर्जासाठी क्रेडिट स्कोअर चांगला असावा लागतो. कर्जासाठी अर्ज करताच त्याचे पैसे लगेच खात्यात जमा होतात.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.