AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Digital Gold : सोन्याच्या विक्रीत नियमांचा अडसर, मग कामी येईल की डिजिटल गोल्ड!

Digital Gold : हॉलमार्किंगशिवाय तुम्हाला आता सोन्याची विक्री करता येणार नाही. त्यामुळे तुमच्यासमोर सोन्यातील गुंतवणुकीचा अजून एक पर्याय समोर आहे. तुम्हाला डिजिटल गोल्डमध्ये गुंतणूक करता येईल.

Digital Gold : सोन्याच्या विक्रीत नियमांचा अडसर, मग कामी येईल की डिजिटल गोल्ड!
| Updated on: Apr 01, 2023 | 7:50 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) सोन्याच्या शुद्धतेची हमी देण्यासाठी नियम कडक केले आहेत. त्यामुळे ग्राहकांची आता फसवणूक टळणार आहे. पण या नियमांचा काही दिवस ग्राहकांना आणि सराफा व्यापाऱ्यांना अडसर ठरेल. 1 एप्रिलपासून हा नियम लागू झाला आहे. अर्थात त्यांना त्यात सवलत मिळाली आहे. आता 30 जूनपर्यंत जुनी हॉलमार्कचे दागिने (Hallmarking Gold) , आभुषणे विक्री करता येतील. पण आज नाही तर उद्या हा नियम लागू होईल. त्यामुळे सोने खरेदी-विक्री करताना नागरिकांसह व्यापाऱ्यांना अडचण होईल. त्यामुळे अशावेळी ग्राहकांना डिजिटल गोल्डमध्ये (Digital Gold) गुंतवणूक करता येईल. पण ही गुंतवणूक किती फायदेशीर ठरेल?

काय आहे डिजिटल गोल्ड

प्रत्यक्ष सोने खरेदी नुकसानदायक असू शकते. सोन्याच्या शुद्धतेचा प्रश्न असतो. तसेच त्याच्या सुरक्षिततेबाबतही काळजी असते. सोन्याचे दागिने, तुकडे कुठे ठेवणार ही काळजी लागलेली असते. तर डिजिटल गोल्ड तुम्ही ऑनलाईन खरेदी करु शकता. ग्राहकाच्या वतीने इन्शुर्ड वॉल्टसमध्ये हे सोने साठवले जाते. त्यामुळे फिजिकल गोल्डसंबंधीत सर्व अडचणी दूर ठेवण्यात मदत मिळते. यासाठी तुमच्याकडे केवळ इंटरनेट वा मोबाईल बँकिंगची आवश्यकता असते. तुम्ही घरबसल्या, इतर कोणत्याही ठिकाणाहून डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करु शकता.

डिजिटल गोल्ड हे सॉलिड गोल्ड आणि पेपर गोल्ड यांचे मिश्रण आहे. अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि अॅप्स डिजिटल सोन्याचा पर्याय देत आहेत. ज्यांना सोन्यात 100 रुपयांपर्यंत गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी डिजिटल गोल्ड हा योग्य पर्याय आहे. यामध्ये ग्राहकांना आवडीनुसार खरेदी-विक्री करण्याची सोय आहे. डिजिटल गोल्डमध्ये तुम्हाला सोने खरेदी-विक्रीची सुविधा मिळते. गुगल पे, पेटीएम, फोनपे यासारख्या अॅप्सच्या माध्यमातून हे सोने खरेदी करता येते.

डिजिटल गोल्डमधील गुंतवणुकीचे फायदे

  1. घरबसल्या, कुठूनही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करु शकता.
  2. हे सोने तुम्ही घर बसल्या फिजिकल रुपात मागवू शकता
  3. डिजिटल गोल्डमध्ये कमीत कमी रुपयांपासून गुंतवणूक करता येते
  4. ऑनलाईन कर्जासाटी डिजिटल गोल्डचा आधार घेता येतो
  5. डिजिटल गोल्ड अस्सल असते. त्यात भेसळ नसते.
  6. याची शुद्धता सेफ गोल्ड रुपात 99.5 तर MMTC PAMP बाबत 999.9 असते.
  7. डिजिटल गोल्ड सुरक्षितरित्या ठेवल्या जाते. डिजिटल सोन्यावर 100 टक्के विमा मिळतो
  8. तुम्ही डिजिटल गोल्ड आभुषणे, दागिने, सोन्याचे शिक्यात बदलवू शकता.

मग तोटा तरी काय

  1. कोणत्याही प्लॅटफॉर्मवर गुंतवणुकीची मर्यादा 2 लाख रुपये आहे
  2. डिजिटल गोल्डवर नियंत्रणासाठी कोणतेही सरकारी संस्था नाही
  3. डिलिव्हरी आणि मेकिंग चार्ज द्यावे लागतात
  4. काही योजना काही कालावधीसाठीच मिळतात. तेवढ्याच वेळात व्यवहाराचा फायदा होतो.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.