खुषखबर EPFO च्या 24 कोटी खातेदारांना सुखद धक्का, कर्मचा-यांच्या ठेवीवरील व्याजदरात सरकार वाढ करण्याची शक्यता

ईपीएफओ खातेदारांना येत्या महिन्यात सुखद धक्का बसण्याची शक्यता आहे. सरकार 24 कोटो खातेदारांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवीवरील व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. सध्या व्याजदर निचांकी अर्थात 8.5 टक्क्यांवर आहे. यापूर्वी 2014-15 व्याजदर 8.75 टक्के होते.

खुषखबर EPFO च्या  24 कोटी खातेदारांना सुखद धक्का, कर्मचा-यांच्या ठेवीवरील व्याजदरात सरकार वाढ करण्याची शक्यता
फाईल फोटो
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 7:43 AM

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सुमारे 24 कोटी खातेदारांना हे आर्थिक वर्ष (financial Year) संपत असताना मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. मोदी सरकारच्या दोन कार्यकाळात (Modi Government-Two Term) ठेवीवरील व्याजदर घसरणीच्या मार्गावर होता. सध्या तो 8.5 टक्के या निचांकी स्तरावर आहे. 2014-15 मध्ये व्याजदर 8.75 टक्के होता. हा या सरकारच्या सुरुवातीच्या काळातील सर्वाधिक व्याजदर होता. त्यानंतर व्याजदर सातत्याने कमी-कमी होत तो सध्या 8.5 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गात सरकारी धोरणांविषयी नाराजीचा सूर आहे. आता ही नाराजी दूर करण्याचा सरकार प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच देशातील सुमारे 24 कोटी खातेदारांना ही आनंदाची बातमी मिळणार आहे. यावेळी सरकार व्याजदरात वाढ करू शकेल, अशी आशा लोकांना आहे. वास्तविक, आर्थिक वर्ष 2021-22 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवीवरील व्याजदर पुढील महिन्यात निश्चित केले जाईल. या बैठकीकडे EPFO च्या सर्व खातेदारांचे लक्ष लागले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची निर्णय घेणारी संस्था असलेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची (CBT) पुढील बैठक होणार असून, त्यात चालू आर्थिक वर्षातील व्याजाचा निर्णय घेतला जाणार आहे. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, ‘ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक मार्चमध्ये गुवाहाटी येथे होणार असून, त्यात 2021-22 साठी व्याजदर निश्चित करण्याचा प्रस्ताव सूचिबद्ध करण्यात आला आहे.

व्याजदर कायम राहणार की वाढणार 2020-21 च्या धर्तीवर ईपीएफओ 2021-22 साठी 8.5 टक्के व्याजदर कायम ठेवणार का, पुढील आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाच्या अंदाजा आधारे कर्मचा-यांच्या ठेवीवर व्याजदर वाढीचा निर्णय घेण्यात येईल याचा निर्णय बैठकीत करण्यात येईल असे सीबीटीचे प्रमुख भूपेंद्र यादव यांनी सांगितले. मार्च 2021 मध्ये सीबीटीने 2020-21 साठी EPF ठेवींसाठी 8.5 टक्के व्याजदर(Interest Rate) निश्चित केला होता. ऑक्टोबर 2021 मध्ये अर्थमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली. त्यानंतर ईपीएफओने आपल्या क्षेत्रीय कार्यालयांना भागधारकांच्या खात्यात 2020-21 साठी 8.5 टक्के व्याज लागू करण्याचे निर्देश दिले होते.

सात वर्षांच्या निच्चांकीवर व्याजदर सीबीटीने व्याजदर ठरवल्यानंतर तो अर्थमंत्रालयाकडे परवानगीसाठी पाठवला जातो. मार्च 2020 मध्ये ईपीएफओने 2019-20 साठी प्रॉव्हिडंट फंड ठेवींवरील व्याज दर 8.5 टक्क्यांवर आणला. हा व्याजदर सात वर्षांच्या निचांकी पातळीवर होता. 2018-19 मध्ये ईपीएफओवर 8.65 टक्के व्याज देण्यात आले होते.

ईपीएफओने 2016-17 आणि 2017-18 मध्ये 8.65 टक्के व्याजही दिले होते. 2015-16 मध्ये हा व्याजदर 8.8 टक्के होता. त्याचबरोबर 2013-14 मध्ये 8.75 टक्के व्याज आणि 2014-15 मध्ये 8.75 टक्के व्याज देण्यात आले होते. मात्र, 2012-13 मध्ये हा व्याजदर 8.5 टक्के होता. 2011-12 मध्ये हे प्रमाण 8.25 टक्के होते. आर्थिक वर्ष 2020-21 साठी 24 कोटी पीएफ खात्यांमध्ये 8.5 टक्क्यांनी व्याज जमा केल्याचे ट्विट ईपीएफओने त्यांच्या अधिकृत टि्वटर हँडलवरुन केले आहे.

बाजारभावापेक्षा कमी किंमतीतलं घरं तुमची वाट पाहतंय… ‘पीएनबी’कडून मालमत्तांचा ‘मेगा ई-लिलाव’

एअर इंडिया आणि एअर एशिया देणार एकमेकांच्या प्रवाशांनाही विमानात ‘एंट्री’

‘या’ स्टॉकने केले गुंतवणूकदारांना मालामाल, पाच वर्षांत 1 लाखाचे झाले 82 लाख

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.