Friends : कोण असतो खरा मित्र ? मैत्री करण्यापूर्वी जाणून घ्या या 5 गोष्टी
मैत्री हे जगातलं सर्वात सुंदर नातं मानलं जातं, जे कोणत्याही स्वार्थाशिवाय असतं. जेव्हा संपूर्ण जग आपल्याविरोधात उभं असतं, तेव्हा मित्रच आपल्यासोबत असतात.

आयुष्यात प्रत्येक व्यक्ती खऱ्या मित्राच्या शोधात असते, जो मित्र/मैत्रीण (True Friends) आपल्या सुख-दु:खात नेहमी आपल्यासोबत असेल. सर्वांनाच जीवनात असा एक मित्र हवा असतो जो एखाद्या कठीण परिस्थितीत आपल्याला रस्ता दाखवेल (friend who stands with us in bad times) किंवा आपण चुकल्यास कोणतीही भीडभाड न बाळगता आपली चूक दाखवून देईल. आपल्याला फक्त श्रीकृष्णासारखा मित्र नको असतो जो आपण बरोबर असताना आपल्यासोबत असतो. तर आपण चुकीचे असतानाही आपली साथ सोडत नाही, असा कर्णासारखाही मित्र आपल्याला आयुष्यात हवा असतो. आपण नेहमीच चांगला मित्र शोधत असतो. इतर कोणत्याही नात्यांपेक्षा महत्वाच्या असलेल्या मैत्रीसंदर्भातील (Friendship) पाच गोष्टी जाणून घेऊया.
– मैत्री ही काही एखाद्या शाळेत जाऊन शिकण्यासारखी गोष्ट नाही. पण मैत्री काय याचा अर्थ जर तुम्हाला समजला नाही तर तुम्ही आयुष्यात काहीच शिकला नाहीत, असं समजा.
– तुम्ही एखाद्या मित्राला किती काळापासून ओळखता, तुमची मैत्री किती वर्षांपासून आहे, हे जास्त महत्वाचं नाही. पण कोणता मित्र तुमच्या आयुष्यात आल्यानंतर कधीच परत गेला नाही, हे जास्त महत्वाचे ठरते.
– असं म्हणतात की बोलता न येणाऱ्या प्राण्यांना घाबरू नका, पण दगाबाज मित्रांपासून नेहमी सावध रहावे. कारण प्राणी तर केवळ तुमच्या शरीरावर जखम देू शकतात पण धोकेबाज मित्र तर तुमच्या मनाला वेदना आणि जखमा देतात, ज्या आयुष्यभर भरत नाहीत.
– आयुष्यात तुमच्या शत्रूला तुमचा मित्र बनण्यासाठी हजार वेळा संध दिलीत तरी चालेल. पण तुमच्या मित्राला तुमचा शत्रू बनण्याची संधी कधीही देऊ नये.
– खरा मित्र तोच असतो, जो तुमचा भूतकाळ समजून घेतो, तुमच्या भविष्याकाळावर विश्वास ठेवतो. आणि तुम्ही जसे आहात, तसाच तुमचा स्वीकार करतो.
असा खरा मित्र तुम्हाला सापडला असेल, तर त्याची अनमोल मैत्री जपून ठेवा.
