करदात्यांना मोठा दिलासा; या सहा फॉर्म आणि स्टेटमेंटसाठी सरकारने मुदत वाढवली

30 जून, 2021 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अधिकृत डीलरने सादर केलेल्या फॉर्म क्रमांक 15सीसीमध्ये त्रैमासिक विवरण 15 जुलै रोजी किंवा त्यापूर्वी दाखल करावे लागेल, परंतु सीबीडीटीने यात दिलासा देत 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली आहे.

करदात्यांना मोठा दिलासा; या सहा फॉर्म आणि स्टेटमेंटसाठी सरकारने मुदत वाढवली
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 11:44 PM

नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) प्राप्तिकर कायदा 1961 अंतर्गत काही फॉर्म भरण्याची मुदत वाढवली आहे. मंगळवार, 3 ऑगस्ट रोजी म्हणजे आजच, सीबीडीटीने एक परिपत्रक जारी करून याची घोषणा केली. यामध्ये 15सीसी, इक्वलायझेशन लेव्ही स्टेटमेंट यांसारख्या फॉर्मचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हे फॉर्म भरताना करदाते आणि इतर भागधारकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. सीबीडीटीने याआधीही करदात्यांना दिलासा दिला आहे. सरकारने यापूर्वी अधिकृत डीलर्ससाठी आयकर फॉर्म 15सी आणि 15सीबी सादर करण्याची मुदत वाढवली होती. हे दोन्ही फॉर्म इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरणे आवश्यक आहेत. (Great relief to taxpayers; The government extended the deadline for these six forms and statements)

कोणत्या फॉर्मसाठी मुदत वाढवण्यात आली आहे?

1. 30 जून, 2021 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अधिकृत डीलरने सादर केलेल्या फॉर्म क्रमांक 15सीसीमध्ये त्रैमासिक विवरण 15 जुलै रोजी किंवा त्यापूर्वी दाखल करावे लागेल, परंतु सीबीडीटीने यात दिलासा देत 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली आहे.

2. आर्थिक वर्ष 2020-21 साठी फॉर्म क्रमांक 1 मध्ये इक्वलायझेशन लेव्ही स्टेटमेंट दाखल करण्याची अंतिम तारीख 30 जून होती. सीबीडीटीने 25 जून रोजी एक परिपत्रक जारी केले आणि त्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली. आता पुन्हा एकदा त्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

3. आर्थिक वर्ष 2020-21 साठी फॉर्म क्रमांक 64-डीमध्ये गुंतवणूक निधीद्वारे जमा किंवा भरलेल्या उत्पन्नाचा तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 15 जून होती. ही मुदत आता 15 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ते आयकर नियम 12 सीबीअंतर्गत सादर करावे लागेल. आता ते 15 सप्टेंबरपर्यंत सादर करता येईल.

4. 2020-21 या आर्थिक वर्षांसाठी फॉर्म क्रमांक 64-सीची अंतिम मुदत आधी 30 जूनपर्यंत निश्चित करण्यात आली होती. ती 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

5. 30 जून 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत भारतात केलेल्या प्रत्येक गुंतवणुकीसंदर्भात पेन्शन फंडाने केलेले स्टेटमेंट 31 जुलै 2021 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करायचे होते. आता त्याची मुदत 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

6. 30 जून, 2021 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी फॉर्म 2 एसडब्ल्यूएफमध्ये एक सार्वभौम संपत्ती निधीद्वारे केलेल्या गुंतवणुकीसंदर्भात 31 जुलै 2021 रोजी किंवा त्यापूर्वी स्टेटमेंट सादर करणे आवश्यक होते. आता सीबीडीटीने दिलासा देत त्याची मुदत 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे.

वेबसाइटच्या तांत्रिक अडचणींमुळे त्रास

आयकर विभागाने गेल्या महिन्यात आपले नवीन पोर्टल लॉन्च केले होते. ही वेबसाइट आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसने तयार केली आहे. मात्र, अगदी सुरुवातीपासूनच या पोर्टलमध्ये अनेक तांत्रिक बिघाडांच्या तक्रारी होत्या. 7 जून रोजी www.incometax.gov.in डोमेनपासून सुरू झालेल्या या पोर्टलवरील तांत्रिक बिघाडामुळे लोकांना सुविधांचा लाभ घेता आला नाही. तथापि, 29 जुलै रोजी प्राप्तिकर विभागाकडून सांगण्यात आले की वेबसाइटची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली आहे आणि ती योग्यरित्या कार्यरत आहे. (Great relief to taxpayers; The government extended the deadline for these six forms and statements)

इतर बातम्या

मनसेचे एकमेव आमदार तळीये गावात, 11 लाखांची मदत, राजू पाटलांमधील संवेदनशील माणसाचं दर्शन

RS Virus : कोरोना संकटात आता अमेरिकेत RS विषाणूची धडक, मुलांमध्ये वेगाने प्रादुर्भाव, जाणून घ्या लक्षणं

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.