आता कुलरला गवत लावण्याचा काळ संपला, या कागदाचा उपयोग केल्यानं AC सारखी हवा

कुलरमध्ये हवा थंड करण्यासाठी हमखास गवताचा वापर केलेला असतो. मात्र, आता या गवताचा काळ संपला आहे. आता त्याऐवजी कुलरमध्ये खास प्रकारचा कागद वापरला जातोय.

आता कुलरला गवत लावण्याचा काळ संपला, या कागदाचा उपयोग केल्यानं AC सारखी हवा
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 17, 2021 | 5:21 AM

मुंबई : उन्हाळाचा भडका झालेला असताना अनेकजण थंड हवा मिळवण्यासाठी कुलर वापरतात. त्यात हवा थंड करण्यासाठी हमखास गवताचा वापर केलेला असतो. मात्र, आता या गवताचा काळ संपला आहे. आता त्याऐवजी कुलरमध्ये खास प्रकारचा कागद वापरला जातोय. हा कागद म्हणजे विशेष प्रकारचे पॅड आहे. ते कागदापासून बनवलेले असते. त्याची रचना मधमाशांच्या पोळीप्रमाणे असते. म्हणूनच त्याला हनीकॉम्ब पॅड म्हणतात. त्याचा उपयोग कुलरचं पाणी थंड होण्यासाठी करतात (Honey comb pad best alternative for cooler grass pad for cold air).

हे कागदी हनीकॉम्ब पॅड वेगवेगळ्या जाडीत मिळते. जितकं हे पॅड जाड तितकी थंड हवा कुलरमधून येते. हा कागद गवताप्रमाणेच काम करतो. पाण्याच्या पंपामुळे हा कागद ओला होतो. त्यानंतर पंप सुरु झाला की तो हवा थंड करतो. यामागील तंत्र बाष्पीभवनाचं आहे. एकदा का हे हनीकॉम्ब पॅड कुलरला लावले की अनेक वर्षे विना अडचण थंड हवा देते. केवळ काही काळानंतर त्याची साफसफाई करावी लागते.

कोणतं हनीकॉम्ब पॅड चांगलं?

जर चांगल्या गुणवत्तेचं जाड हनीकॉम्ब पॅड कुलरमध्ये टाकलं तर ते गवतापेक्षा कितीतरी अधिक चांगलं ठरतं. गवतापेक्षा अधिक काळ ते थंड हवा देतं. बाजारात अनेक प्रकारचे हनीकॉम्ब पॅड भेटतात. त्यामुळे तुम्हाला गुणवत्तेशी तडजोड करायला नको. सामान्यपणे गवताला प्रत्येक वर्षी बदलावं लागतं. मात्र, हनीकॉम्ब 5 वर्षांपर्यंत टिकतं.

हनीकॉम्ब पॅडची किंमत किती?

गवताच्या तुलनेत हनीकॉम्ब पॅडची किंमत जास्त असते. चांगल्या गुणवत्तेचं हनीकॉम्ब पॅड घेतलं तर त्याची किंमत 1000 रुपयांपर्यंत असते. त्या तुलनेत गवताची (वुडवुल पॅड) किंमत केवळ 150-200 रुपये असते.

हेही वाचा :

PHOTO : उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फाॅलो करा

Mango Myths : आंबा कुणी खावा कुणी खाऊ नये? आंब्याशी संबंधित ‘या’ खास गोष्टी वाचा…

Health Tips : उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी आहारात समाविष्ट करा

व्हिडीओ पाहा :

Honey comb pad best alternative for cooler grass pad for cold air

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें