क्रेडिट कार्ड नसेल तरीही हप्त्यांवर खरेदी करु शकता; जाणून घ्या सर्वकाही

Credit Card | क्रेडिट कार्डाप्रमाणे डेबिट कार्डाचीही एक लिमीट असते. त्यानुसार तुम्ही ईएमआयवर शॉपिंग करु शकता. डेबिट कार्डाद्वारे ईएमआय सुविधेचा वापर करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम दुकानदाराशी संपर्क करावा लागेल.

क्रेडिट कार्ड नसेल तरीही हप्त्यांवर खरेदी करु शकता; जाणून घ्या सर्वकाही
डेबिट कार्ड

मुंबई: खरेदी करताना एखादी वस्तू हप्त्यावर खरेदी करायची सुविधा असेल तर क्रेडिट कार्ड गरजेचे आहे. मात्र, पुरेशा उत्पनाअभावी अनेकांना बँका क्रेडिट कार्ड देत नाहीत. अशावेळी एखाद्या ऑनलाईन ऑफरचा किंवा कॅशबॅकचा लाभ उठवण्यासाठी अनेकजण दुसऱ्याच्या क्रेडिट कार्डावरुन खरेदी करतात. मात्र, आता तुमच्यावर अशाप्रकारे इतरांच्या मिनतवाऱ्या करण्याची वेळ येणार नाही. कारण, तुमच्याकडे असलेल्या डेबिट कार्डवरूनही तुम्ही खरेदीचे पैसे हप्त्याने भरू शकता.

क्रेडिट कार्डाप्रमाणे डेबिट कार्डाचीही एक लिमीट असते. त्यानुसार तुम्ही ईएमआयवर शॉपिंग करु शकता. डेबिट कार्डाद्वारे ईएमआय सुविधेचा वापर करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम दुकानदाराशी संपर्क करावा लागेल. त्यानुसार दुकानदाराकडून पुढील सोपस्कार पार पाडले जातात. तुम्ही ऑनलाईन खरेदी करत असाल तर ईएमआयमध्ये डेबिट कार्डाचा पर्याय निवडावा.

तुम्ही डेबिट कार्डावरुन किती खरेदी करु शकता?

तुम्ही एकावेळी किती खरेदी करु शकता हे तुमच्या डेबिट कार्डावर अवलंबून असते. ही लिमीट जाणून घेण्यासाठी तुम्हाला DCEMI<space><last 4 digits of Debit Card number> to <5676766> असा मेसेज 5676766 या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला डेबिट कार्डची लिमीट समजेल. याशिवाय, तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नसतानाही ऑनलाईन शॉपिंग करु शकता. यामध्ये तुमच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करुन ईएमआय व्यवहार पार पडतो.

संबंधित बातम्या:

फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे असतील तर तुम्हालाही मिळू शकते क्रेडिट कार्ड

PHOTO | एसबीआय ग्राहक स्मार्टफोनला असे बनवू शकता क्रेडिट कार्ड! फोन दाखवताच कापले जातील पैसे

एसबीआय कार्डने फॅबइंडियासोबत लाँच केले कॉन्टॅक्टलेस को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड, गिफ्ट व्हाउचरसह मिळतील हे फायदे

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI