पीएफ खातेधारकांना घरबसल्या भरता येणार ई नॉमिनेशन; जाणून घ्या काय फायदा होणार?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 10, 2021 | 8:35 AM

EPFO | भविष्यात ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण झालेल्या पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास पीएफ, पेन्शन आणि विम्याचे पैसे सहजपणे वारसदाराला मिळतात.

पीएफ खातेधारकांना घरबसल्या भरता येणार ई नॉमिनेशन; जाणून घ्या काय फायदा होणार?
ईपीएफओ

Follow us on

मुंबई: नोकरदारांसाठी भविष्य निर्वाह निधी (PF) हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. दर महिन्याला नोकरदारांच्या पगारातील ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा होत असते. भविष्यात एखादा आर्थिक अडचणीचा प्रसंग उद्भवल्यास किंवा आयुष्याच्या उतारवयात पीएफ खात्यातील साठवलेले पैसे कामाला येतात.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नोकरदारांसाठी अनेक सुविधा सुरु केल्या आहेत. यापैकीच एक म्हणजे ई नॉमिनेशन. त्यामुळे पीएफ खातेधारक घरबसल्याही ई-नॉमिनेशन फाईल करु शकतात. ईपीएफओ सदस्य https://www.epfindia.gov.in/site_en/index.php या पोर्टलवर जाऊन हा फॉर्म भरू शकतात. भविष्यात ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण झालेल्या पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास पीएफ, पेन्शन आणि विम्याचे पैसे सहजपणे वारसदाराला मिळतात.

ऑनलाईन ई-नॉमिनेशची प्रक्रिया कशी पूर्ण कराल?

* सर्वप्रथम https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकवर जाऊन तुमचे अकाऊंट लॉगिन करावे. * तुम्ही नॉमिनेशन केले नसेल तर अकाऊंट लॉगिन केल्यानंतर तुम्हाला एक अलर्ट येईल. * त्यानंतर Manage या पर्यायावर क्लिक करावे. नंतर स्क्रॉलडाऊनमधील e-nomination हा पर्याय निवडावा. * नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला कुटुंबाविषयीची माहिती विचारली जाईल. * त्यानंतर तुम्हाला नॉमिनीचा आधार, नाव, जन्मतारीख, बँक अकाऊंट असा तपशील भरावा लागेल. * त्यानंतर सेव्ह फॅमिली डिटेल्स या पर्यायावर क्लिक करावे. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Save EPF Nomination या पर्यायावर क्लिक करावे.

संबंधित बातम्या:

PF withdrawal rule: पीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; जाणून घ्या कसे मिळवाल पैसे?

PF मधून पैसे काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आधार-पॅन, असे करा अपडेट

आता यूएएनशिवाय जाणून घ्या पीएफ खात्यातील शिल्लक, ही आहे स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI