लोकल ट्रेनने प्रवास करायचाय, कोरोना लसीकरणाचे सर्टिफिकेट WhatsApp वरून झटपट कसे मिळवाल?

Covid Vaccine | देशभरात आतापर्यंत 50 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. मात्र, कोविन अॅपवरून लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळवण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत. मात्र, आता तुम्हाला WhatsApp वरून झटपट हे प्रमाणपत्र मिळवता येईल.

लोकल ट्रेनने प्रवास करायचाय, कोरोना लसीकरणाचे सर्टिफिकेट WhatsApp वरून झटपट कसे मिळवाल?
WhatsApp

मुंबई: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागल्यानंतर प्रत्येक राज्यात निर्बंध शिथील होऊ लागले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध शिथील केले जाणार आहेत. 15 ऑगस्टपासून मुंबईतील लोकल ट्रेन सामान्य लोकांसाठी खुली होणार आहे. त्यामुळे आता लसीकरणासाठी लोकांनी रांगा लावायला सुरुवात केली आहे. लवकरात लवकर लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिक आता धडपड करत आहेत.

देशभरात आतापर्यंत 50 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. मात्र, कोविन अॅपवरून लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळवण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत. मात्र, आता तुम्हाला WhatsApp वरून झटपट हे प्रमाणपत्र मिळवता येईल.

WhatsApp वरून कोरोना लसीकरण प्रमाणपत्र कसे मिळवाल?

* +91 9013151515 हा मोबाईल क्रमांक तुमच्या फोनध्ये सेव्ह करा. * WhatsApp वर कोविड सर्टिफिकेट टाईप करा आणि मेसेज सेंड करा. * तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सबमिट करा * मोबाईलवर आलेले कोरोना प्रमाणपत्र डाऊनलोड करा.

मुंबई लोकल प्रवास करण्यासाठी केवळ दोन डोसच नव्हे, आणखी एक अट

लोकल प्रवासासाठी (Mumbai Local) दोन डोस घेतलेल्यांना महापालिका किंवा राज्य सरकारकडून फोटो पास देण्यात येईल. हे एकप्रकारचे इम्युनिटी सर्टिफिकेट असेल, या फोटो पासच्या आधारावरच तुम्हाला रेल्वेचा पास मिळेल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे (BMC commissioner) आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Chahal) यांनी दिली. महत्त्वाचं म्हणजे जरी दुसरा डोस घेतला असला, तरी डोस घेऊन 14 दिवस झाल्यानंतरच ओळखपत्र दिलं जाईल. त्यानंतरच लोकल प्रवासाचा पास मिळणार आहे. म्हणेज 14 दिवसांची अट पूर्ण करावी लागणार आहे.

14 दिवसांची अट 

याबाबत इक्बालसिंह चहल म्हणाले, “काल संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत. ज्यांनी दोन डोस घेतले आहेत, त्यांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येईल, मात्र दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवस व्हावे लागतील, त्यानंतरच हा पास मिळेल”

येत्या काळात शिथील झालेल्या निर्बंधाचा लाभ घेण्यासाठी हा फोटोपास आत्यावश्यक असेल. रेस्टॉरंट, जीम, मॉल अशाठिकाणी देखील अशा पासची गरज पडेल. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर लस घेणे गरजेचे असेल. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत मुंबईतील 18 वर्षावरील 90 लाख लोकांचे दोन्ही डोस पूर्ण होतील, असा विश्वास आयुक्त इक्बाल चहल यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या  

मुख्यमंत्र्यांनी लोकलचा सोपा प्रश्न अवघड केला, परवानगी देताना नवे अडथळे निर्माण केल्याचा भाजपचा आरोप

‘ज्यांना अधिकार नाही ते फक्त बोलण्यासाठी मंत्री’, लोकलच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचा रावसाहेब दानवेंवर निशाणा

Mumbai Local Train : सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा मिळणार; लोकल प्रवासाच्या निर्णयासह मुख्यमंत्र्यांचं महत्वाचं आवाहन, वाचा सविस्तर

Published On - 11:38 am, Tue, 10 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI