चुकून दुसऱ्याच UPI वर किंवा बँक खात्यात गेले पैसे? टेन्शन नको… फक्त ही ट्रिक वापरा, लगेच…
Money Back From Wrong UPI Number Bank Account : जर एखाद्या चुकीमुळे पैसे चुकीच्या खात्यात किंवा UPIमध्ये गेले तर घाबरायला होतं, पण अशावेळी पॅनिक न होता, काही सोप्या टिप्सचा वापर करावा , त्याने तुमचे ट्रान्सफर झालेले पैसे लगेच परत मिळतील. जाणून घ्या प्रोसेस

Money Back From Wrong UPI Number Bank Account : आधीच्या काळी पैशांचे सगळे व्यवहार हे रोख किंवा कॅशमध्ये व्हायचे. पण बदलता काळ, टेक्नॉलॉजी, सुविधा यामुळे सगळी कामं ऑनलाईन होतात. त्यामुळे बहुतांश लोकं हे त्यांच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरद्वारेच शॉपिंग, बॅकिंग किंवा अगदी पेमेंटही करतात. नेट बँकिंग आणि UPI हे सगळ्यात जास्त वापरले जाणारे डिजीटल ऑप्शन्स आहेत. आता UPI मुळे अवघ्या काही मिनिटांतच पेमेंट पूर्ण होतं. पण यातही कधीकधी चुकीमुळे पेसै हे चुकीच्या खात्यात किंवा UPI आयडीमध्ये ट्रान्सफर होऊ शकतात.
असे दुसऱ्याच खात्यात पैसे गेल्यास लोकं पटकन घाबरतात, पॅनिक होतात. मात्र अशावेळेस ते पैसे परत मिळवण्याचे अनेक ऑप्शन्स असतात. जर तुमचे पैसे चुकीच्या किंवा दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झाले असतील हे एक काम केल्याने तुमचं टेन्शन दूर होईल. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास तुमचे पैसे सहज परत मिळतील. हे कसं करायचं ? सोप्पं आहे.. टेन्शन घेऊ नका.. जाणून घ्या प्रोसेस
चुकीच्या खात्यात पैसे गेल्यास काय करावं ?
जर तुमच्याकडूनही चुकून, एखाद्या चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले असतील, तर ताबडतोब तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा आणि पाठवलेल्या रकमेचा व्यवहार आयडी (transaction id) आणि रकमेचा संपूर्ण तपशील द्या. त्यानंतर बँक अधिकारी प्रकरणाची चौकशी करतील आणि योग्य खात्यातून निधी वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करतील. यासाठी, तुमच्याकडे बँक स्टेटमेंट आणि स्क्रीनशॉटसह आवश्यक कागदपत्रे तयार असली पाहिजेत. यामुळे ती प्रोसेस जलद होते. तुम्ही जितक्या लवकर तक्रार दाखल कराल तितक्या लवकर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतील.
चुकीच्या UPI व्यवहाराची तक्रार कशी कराल?
आजकाल, बहुतांश लोक पेमेंटसाठी UPI वापरतात. पण, कधीकधी ते काळजी घेत नाहीत. यामुळे चुकीच्या UPI आयडीवर पैसे ट्रान्सफर होऊ शकतात. जर तुमचे पैसे चुकीच्या UPI आयडीवर ट्रान्सफर झाले असतील, तर प्रथम त्या UPI ॲपकडे तक्रार दाखल करा. त्यानंतर, ॲपच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा आणि संपूर्ण व्यवहार तपशील द्या.
