बँक खात्यातून रक्कम चोरी झालीये?, चिंता करू नका; ‘या’  हेल्पलाईन क्रमांकावर साधा संपर्क

बँक खात्यातून रक्कम चोरी झालीये?, चिंता करू नका;  'या'  हेल्पलाईन क्रमांकावर साधा संपर्क
cyber crime

सायबर चोरट्यांना पकडण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. ग्राहकांच्या घामाचे पैसे परत मिळविण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर त्यासाठी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. सायबर विंगच्या पोर्टलवर अथवा हेल्पलाईन क्रमांकावर ग्राहकाला फसवणुकीची माहिती देता येईल. 

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 31, 2021 | 10:43 AM

नवी दिल्ली: तुमच्या घामाचा पैसा सायबर चोरटे सहजासहजी पचवू शकणार नाहीत, त्यासाठी तुम्ही जागरुक असणे गरजेचे आहे. सायबर चोरांना त्यांच्या पद्धतीने त्यांच्याच वाटा धुंडाळत सायबर विंग त्यांना पकडणार आहे. तुमच्या खात्यातून रक्कम चोरीला गेल्यास तुम्हाला चिंताग्रस्त होण्याची गरज राहिली नाही, हा थोडा धीर मात्र धरावा लागेल. कारण अशा फसवणूक प्रकरणातील चोरांची

सायबर पोलिसांनी उचलबांगडी तर केलीच आहे, पण त्वरेने कारवाई करत रक्कम ही वाचवली आहे. सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. बँकांनीही खातेदारांना ऑनलाईन पद्धतीनेच सोयी-सुविधा देण्यावर भर दिला आहे. त्यासाठी खास यंत्रणा उभारण्यात आली आहे. परंतू, कमीत-कमी वेळेत सुविधा देण्याच्या या गतीला सायबर  चोरट्यांनी नजर लावली आहे. बँकिंग सुरक्षा भेदत हे चोरटे लोकांच्या जमापुंजीवर डल्ला मारतात. अवघ्या काही मिनिटांत खाते साफ करतात. भाबांवलेल्या अनेक ग्राहकांना अशा परिस्थिती काय करावे याची माहिती नसते.

सायबर विंगने कसली कंबर

आर्थिक क्षेत्रातील या नव्या फसवणुकीविरोधात सायबर विंग विकसीत करण्यात आली आहे. चोरांच्या पायवाटेने जाऊन त्यांच्या मुसक्या आवळण्यात येतात. तसेच त्यांनी चोरलेली रक्कमेचे खाते ही गोठविण्यात येते. त्यामुळे या  चोरट्यांना चोरलेली रक्कम काढता येत नाही वा ती खर्च करता येते नाही. त्यासाठी ग्राहकांनी त्वरेने सायबर विंगशी संपर्क साधणे गरजेचे आहे. त्यासाठी सायबर पोलिसांनी हेल्पलाईन क्रमांक दिला आहे. 155260 या क्रमांकावर तुम्हाला अशा फसवणुकीची तक्रार करता येते. तर https://cybercrime.gov.in या सायबर पोलिसांच्या संकेतस्थळावर तक्रार ही दाखल करता येईल.

सायबर चोरांच्या वाटा अशा अडविल्या जातात

ऑनलाईन फसवणूक झालेले ग्राहक 155260 या क्रमांकावर कॉल करतात. राज्यातील सायबर पोलीस विंगकडे या फसवणुकीसंदर्भातील तक्रारीचे सारथ्य असते. कॉलवर संबंधित पोलीस अधिकारी, फसवणूक झालेल्या ग्राहकाची संपूर्ण तक्रार ऐकून घेतो. कोणत्या व्यवहारासंबंधी ही फसवणूक झाली, त्याची इंत्यभूत माहिती, दिनांक, वेळ, ग्राहकाची माहिती, त्याचा खाते क्रमांक, बँकेचे नाव, शाखा याविषयीची माहिती जाणून घेतो. त्याची नोंद केल्या जाते. यासंबंधीचे एक तिकिट निघते. ते संबंधित बँकेला पाठविले जाते.हे तिकीट संबंधित बँकेला, वॅलेट्स, वित्तीय संस्थांना त्वरीत पाठविण्यात येते.

…तर चोराला खात्यामधून पैसे काढता येत नाहीत

त्यानंतर फसवणूक झालेल्या ग्राहकाला एसएमएस पाठविण्यात येतो. त्यात त्याचा तक्रार क्रमांक नोंदणविण्यात आलेला असतो. त्यानंतर ग्राहकाला या तक्रार क्रमांकाआधारे पुढील 24 तासात  https://cybercrime.gov.in या सायबर पोलिसांच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी लागते. या प्रक्रियेतील संबंधित बँक या पोर्टलच्या डॅशबोर्डवर हे तिकट बघू शकते. बँका त्यांच्या कार्यप्रणालीत फसवणूक व्यवहाराचा पडताळा घेतात.  जर फसवणुकीची रक्कम अजूनही चोराच्या खात्यात दिसत असेल तर ती काढण्यास बँका मज्जाव करतात. त्यामुळे सायबर चोराच्या नशिबी हात चोळत बसण्याशिवाय पर्याय राहत नाही आणि त्यांच्या खात्याआधारे त्यांची कुंडली बाहेर येते. या  चोराला गजाआड करेपर्यंत यंत्रणा कार्य करते.

संबंधित बातम्या

EPFO Update | नोकरदार वर्गासाठी ईपीएफओचा दिलासा, 31 डिसेंबरनंतरही करता येणार ई-नॉमिनेशन प्रक्रिया

नव्या वर्षात जीएसटीमध्ये वाढ; ‘या’ वस्तू महागणार, ग्राहकांना बसणार आर्थिक झळ

अधिक चांगला परतावा पाहिजे?, तर नवीन वर्षात ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें