Indian Railway | अरे देवा, तिकीट हरवलं? मग प्रवास करता येतो का राजे हो..

Indian Railway | आता धावपळत येऊन, रांगेत उभं राहून तुम्ही तिकीट काढलं. रेल्वेची वाट पाहत घाम पुसला. थोड्यावेळानं तुमच्या लक्षात आलं, बाबो, तिकीट तर हरवलं. मग अशावेळी प्रवास करता येणार का? ममता बॅनर्जी यांनी रेल्वेमंत्री असताना तिकीटासंबंधीचा नियम बदलला, तुम्हाला फायदा होईल की तोटा?

Indian Railway | अरे देवा, तिकीट हरवलं? मग प्रवास करता येतो का राजे हो..
रेल्वे तिकीट हरवल्यास काय करावेImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 7:07 AM

Indian Railway | आता धावपळत येऊन, रांगेत उभं राहून तुम्ही तिकीट (Railway Ticket) काढलं. रेल्वेची वाट पाहत घाम पुसला. थोड्यावेळानं तुमच्या लक्षात आलं, बाबो, तिकीट तर हरवलं. मग अशावेळी प्रवास (Long Journey) करता येणार का? बऱ्याचदा आपण घाई गडबडीत तिकीट कुठे तरी ठेऊन देतो. वेंधळेपणाचा त्यावेळी आपल्याला राग आलेला असतो. पण करणार काय, कारण प्लॅटफॉर्मवर (Railway Platform) रेल्वेगाडी धडधड करत येते आणि आपण विचारात गुंग असतो की आता प्रवास कसा करणार? तिकीट तपासणीसाने (Ticket Collector) पकडलं तर कितीचा दंड बसेल. आपण तिकीट काढल्याचं, पण ते हरवल्यावर तो कितपत विश्वास ठेवेल. अनेक प्रश्न तुमच्या मनात पिंगा घालतील. तुमचा प्रवासाचा उत्साहावर पाणी फिरेल. पण खरंच तिकीट नसेल तर प्रवास करता येतो का? ममता बॅनर्जी यांनी रेल्वेमंत्री असताना तिकीटासंबंधीचा नियम बदलला, तुम्हाला फायदा होईल की तोटा?

बॅनर्जी यांचा निर्णय काय?

तिकीट खरेदी केल्यानंतर ते हरवलं, विसरलं तर मोठं संकट पडायचं. कारण नियमचं तसे होते. विना तिकीट प्रवास हा कायदेशीर गुन्हाच मानण्यात येत होता. त्यासाठी रितसर तिकीट रक्कम आणि दंडाची रक्कम टीटी वसूल करायचे. पण ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री झाल्या आणि त्यांनी हा नियम बदलून टाकला. प्रवासादरम्यान तिकीट जवळ बाळगण्याची गरज नसल्याचा नियम त्यांनी केला. जर तिकीट काढले असेल तर त्याची क्रमांक अथवा मोबाईलवर आलेला बुकिंग एसएमएस त्यांनी महत्वाचा मानला.

रेल्वे तिकीटासाठी एसएमएस वैध!

आता ऑनलाईन, मोबाईल, अॅपवर बुकिंगची सोय झाली आहे. त्याद्वारे मोबाईल क्रमांकावर सीट आणि बर्थ नंबरचा मेसेज आला असेल. तिकीटही कन्फर्म असेल. तर रेल्वे या एसएमएसला वैध मानते. पण त्यासाठी एक अट घालण्यात आली आहे. तुम्ही ऑनलाईन ‘आयआरसीटीसी’कडून (IRCTC) तिकीट बुक केले असेल तर तुम्हाला आलेला एसएमएस (Railway Ticket SMS) वैध मानण्यात येतो. पण काऊंटरवरुन तिकीट खरेदी करताना एसएमएसचा प्रश्नच येत नसल्याने तिकीट हरवल्यास तुम्हाला दुसरा पर्याय राहत नाही.

हे सुद्धा वाचा

मग प्रवास करता येईल का नाही?

जर तुम्ही काऊंटर तिकीट घेतले असेल आणि तिकीट तुमच्याकडे नसेल तर प्रवाशाला काही अटींची पूर्तता करून प्रवास करण्याची मुभा दिली जाते. सर्वप्रथम त्या व्यक्तीला टीटीला त्याने तिकीट घेतले पण हरवल्याचे सांगावे लागेल. तसेच तिकीटाचा दर आणि दंडही भरावा लागेल. तुम्ही कोणत्या डब्यातून प्रवास करत आहात, त्यावर तिकीटाचा दर निश्चित असतो. त्यामुळे त्याआधारे रक्कम अदा करत तुम्हाला प्रवास करता येईल.

रेल्वेचे होऊ शकते नुकसान

काऊंटरवरून खरेदी केलेले तिकीट प्रवाशाने संभाळून ठेवणे आवश्यक आहे. बऱ्याचदा तिकीट रद्द करुन प्रवाशी रक्कम परत घेतात आणि पुन्हा तिकीट असल्याच्या अविर्भावात रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेचे मोठे नुकसान होते. त्यामुळे काऊंटरवरचे तिकीट असल्यास तुम्हाला ते सांभाळून ठेवणे गरजेचे आहे.

ई-तिकीट वैध

ई-तिकीट (E Ticket) असेल तर तुम्ही फक्त टीटीईला मेसेज दाखवा अथवा तिकिटाचा स्क्रीनशॉट दाखवा. काही वर्षांपूर्वी रेल्वे ई-तिकिटांसाठीही प्रिंट आऊटची मागणी करत असे. जर प्रिंट नसेल तर हा प्रवासही अवैध मानण्यात येत होता. परंतु, हा जेव्हा  ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री झाल्या. त्यांनी हा नियम बदलला. 2012 मध्ये ई-तिकीटधारकांना तिकिटाची प्रिंट आऊट ठेवण्याचे बंधन रद्द केले.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.