AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax Return : या भूलथापा करतील कंगाल, आयटीआर भरताना रहा सावधान!

Income Tax Return : प्राप्तिकर भरताना सावध रहा, नाहीतर एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. या भूलथापा तुम्हाला कंगाल करतील.

Income Tax Return : या भूलथापा करतील कंगाल, आयटीआर भरताना रहा सावधान!
| Updated on: Apr 18, 2023 | 5:28 PM
Share

नवी दिल्ली : प्राप्तिकर रिटर्न (Income Tax Return) भरताना सावध रहा, नाहीतर एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. तुमचे बँक खाते (Bank Account) खाली होऊ शकते. कारण सायबर भामट्यांनी करदात्यांना फसवण्यासाठी अजून एक शक्कल लढवली आहे. ऑनलाईन बँक घोटाळे, ऑनलाईन फसवणूक, योजनांच्या नावाखाली बँक खाते साफ करणे या गोष्टी आपल्याला नवीन नाहीत. अर्थव्यवस्था आणि बँका ऑनलाईन आल्यापासून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. फसवणुकीचे ई-मेल आणि मॅसेजला बळी पडून अनेकांचे बँक खाते साफ झाल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. पण आता सायबर भामट्यांनी (Cyber Fraud) आणखी एक पॅटर्न आखला आहे. करदात्यांना यामध्ये लक्ष्य करण्यात येत आहे. तेव्हा सावध रहा, सायबर भामट्यांच्या भूलथापांना बळी पडला तर मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

बोगस मॅसेजचा पाऊस सध्या करदाते आयटी रिटर्न भरण्यात व्यस्त आहेत. त्याचाच फायदा हे भामटे घेत आहेत. या घोटाळ्यात सायबर फसवणूक करणारे आयटी रिटर्न लवकर भरण्यासाठीचे मॅसेज पाठवून त्यात फेक लिंक पाठवून लुबाडणूक करत आहेत. टॅक्स टाईम स्मिशिंग कॅम्पेनच्या माध्यमातून भारतीय खातेदारांना लक्ष्य करत आहेत. भारतीय सरकारी व खासगी बँकांच्या नावे हे मॅसेज पाठवून, ग्राहकांना ऑनलाईन आयटी रिटर्न भरण्यासाठी वैयक्तिक माहिती भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

बँकांचे फेक ॲप टाईम्स ऑफ इंडियाने याविषयीच्या एका अहवालाआधारे बातमी दिली आहे. त्यानुसार, टॅक्स्ट मॅसेज आणि ई-मेलद्वारे हा स्कॅम, घोटाळा करण्यात येत आहे. यामध्ये ग्राहकांना एक तर इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी संबंधित बँकेच्या हुबेहुब ॲपचा अथवा ऑनलाईन वेबसाईटचा वापर करता येईल असे सांगण्यात येते. केवायसी अपडेट केल्याशिवाय करदात्यांना पुढील प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही, अशी थाप मारण्यात येते. त्यासाठी मॅसेजमध्ये एक लिंक पाठविण्यात येते. बँकांचे फेक ॲप या लिंकद्वारे तुम्ही उघडता आणि माहिती अपडेट करतानाच सर्वच माहिती चोरण्यात येते. त्याआधारे तुमचे खाते रिकामे करण्यात येते.

APK फाईलचा वापर या फसवणुकीसाठी सायबर भामटे ॲंड्राईड पॅकेजचा APK फाईलचा उपयोग करत आहेत. हे ॲप डाऊनलोड केल्यास ते हुबेहुब बँकेच्या ॲप सारखे दिसते. त्याआधारे तुम्ही केवायसी अपडेट केल्यास तुमच्या बँकेतील सर्व रक्कम उडवली जाते. बँक खाते साप करण्यात येते. त्यामुळे आयटी रिटर्न भरताना तो थेट प्राप्तिकर खात्याच्या संबंधित संकेतस्थळावरच जमा करा.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.