AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही तारीख हुकली की प्राप्तिकर परतावा विसरा,जाणून घ्या काय आहेत कारणे

प्राप्तिकर परतावा : कर चुकवेगिरी केल्यास प्राप्तिकर विभाग कलम 276 सीसी अंतर्गत खटलाही दाखल करू शकतो, ज्यामध्ये त्याला किमान तीन महिने ते दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. याबरोबरच कर कमी किंवा लपविल्याचे दाखविलेल्या रकमेच्या आधारे दंडही भरावा लागणार आहे.

ही तारीख हुकली की प्राप्तिकर परतावा विसरा,जाणून घ्या काय आहेत कारणे
Income tax
| Updated on: Mar 29, 2022 | 10:16 AM
Share

मुंबई : आर्थिक वर्ष 202-21 साठी प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर होती. परंतु, पोर्टलच्या तक्रारी आणि इंटरनेटच्या कारणामुळे ही मुदत तीन महिने वाढवून देण्यात आली होती. विवरणपत्र भरण्यासाठी 31 मार्च 2022 ही अंतिम तारीख देण्यात आली होती. म्हणजे यापूर्वीचे दोन महिने 28 दिवस वगळता साधारणतः दोन दिवसांचा अवधी करदात्यांच्या हाती उरला आहे. या कर भरण्याला विलंबित परतावा भरणे (Belated ITR Filling) बेलेटेड आयटीआर फाइलिंग असे नाव देण्यात आले आहे.यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) सरकारने ही घोषणा केली होती. विलंबासाठीचा दंड भरून करविवरण पत्र भरता येते. परंतु, आवश्यक कागदपत्रांची पुर्ततेसाठी तुम्हाला अजून वेळ हवा असेल आणि या गडबडीत येती 31 मार्च ही तारीख ही हातची निघून गेली तर प्राप्तिकर परताव्याला तुम्ही मुकाल कारण तुम्ही प्राप्तिकरच भरला नाही. उलट तुम्हाला दंड आणि कारावासाची ही शिक्षा होऊ शकते.

गोष्ट अगदी साधी आहे. सरकारने 31 मार्च 2022 ही अंतिम किंवा बिलप्राप्त कर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ठेवली आहे. नंगिया अँडरसन एलएलपीचे भागीदार नीरज अग्रवाल यांनी बिझिनेस टुडेला सांगितले की, “जर तुम्ही उशीरा रिटर्न भरण्याची योग्य तारीख चुकवलीत, तर तुम्ही स्वेच्छेने आयटीआर भरण्याची संधी गमावून बसाल. अशा परिस्थितीत कर विभागाने सुरू केलेल्या छाननीच्या बाबतीतच आयटीआर दाखल करता येईल. म्हणजे मग आयटीआर फाइल करणं तुमच्या हातात नसेल तर ते कर विभागावर अवलंबून असेल.”

आता प्रश्न असा आहे की, रिफंडचं काय होणार, कारण आयटीआर भरला नाही तर परतावा कसा मिळणार? कर परतावा मिळवायचा असेल तर रिटर्न न भरल्यामुळे तुम्हाला रिफंड मिळणार नाही. करदात्याने उत्पन्न कमी लेखले आहे, हे ठरवल्यावर विवरणपत्रे न भरणे गृहीत धरण्यात येते, अशा परिस्थितीत तुम्ही कायद्याच्या कचाट्यात अडकू शकता.

अशा परिस्थितीत करदात्याने विवरणपत्र न भरल्यामुळे उत्पन्नाच्या कमी अहवालामुळे 270 अ अंतर्गत दंड आकारण्याचा अधिकार कर विभागाला आहे, जो करदायित्वाच्या 50 टक्के इतका असेल. कर विभाग कलम 276 सीसी अंतर्गत खटलाही दाखल करू शकतो, ज्यामध्ये त्याला किमान तीन महिने ते दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर कराच्या रकमेच्या आधारे जो दंड कमी किंवा लपविला गेला आहे तोही त्याला भरावा लागतो.

आयटीआर दाखल करण्याची आधीची शेवटची तारीख गेल्यावर्षी 31 जुलै होती, जी 30 सप्टेंबरपर्यंत आणि नंतर 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली. ही तारीख दोनदा वाढवण्यात आली. 31 मार्चपूर्वी आयटीआर फाइल केल्यास पाच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असल्यास पाच हजार रुपये दंड होणार आहे. पाच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

इतर बातम्या

Beed : धमक असेल तर गावात रस्ता आणाच, नाईकवाडेंचं संदीप क्षीरसागरांना आव्हान, जयदत्त क्षीरसागरांची शेरोशायरीतून टीका

भाजपमध्ये विखेंना मान मिळतो की नाही याबाबत मला माहीत नाही – Chhagan Bhujbal

Nashik | सासूचा अंत्यसंस्कार करून आलेल्या नवविवाहितेला विजेचा शॉक; अर्ध्यावरती डाव मोडिला…!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.